कविता

पद्मश्री बा. भ. बोरकर सादर अभिवादन......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
30 Nov 2021 - 7:39 pm

सेवानिवृत्ती नंतरच्या गोष्टी ज्यांनी माझे मन प्रफुल्लित ठेवलं त्यांपैकी एक म्हणजे मराठी कवीता. शाळेत असताना कवीता फक्त टक्के वाढवण्यासाठी वाचल्या. त्यातील थोड्या लक्षात राहील्या बाकी आयुष्यात टक्के टोणपे खाताना विस्मृतीत गेल्या.

कविताविचार

पद्याव्हान १ - लिमरिक्

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जे न देखे रवी...
26 Nov 2021 - 11:36 pm

लिमरिक् हा इंग्रजीतला प्रख्यात विनोदी आकृतिबंध पाचच ओळींचा असतो म्हणून पहिल्यांदा घेतला.

हा बऱ्याचदा भलताच चावट असतो, पण एक साधं उदा:
There was a young woman named Bright, (A)
Whose speed was much faster than light.(A)
She set out one day, (B)
In a relative way, (B)
And returned on the previous night. (A)

कविता

पद्याव्हान - आकृतिबद्ध पद्य

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जे न देखे रवी...
26 Nov 2021 - 10:07 am

सहज डोक्यात विचार आला. मिसळपाववर अनेकांनी वृत्तविषयक लेख लिहिले आहेत. पण साधारणत: वृत्त हे पद्याच्या ओळीशी निगडीत असतं, पूर्ण कवितेच्या आकृतिबंधाशी नाही.

.

गझलचा आकृतिबंध (poetic form) बर्‍यापैकी परिचयाचा आहे. हायकू आहे. पूर्वी लोक सुनीत लिहायचे (मुख्यत्वे शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये). पण याव्यतिरिक्त आकृतिबद्ध कविता मराठीत विशेष दिसत नाहीत.

कविता

राजवंशी

राहत's picture
राहत in जे न देखे रवी...
25 Nov 2021 - 7:13 pm

राजवंशी

वणव्यात भार गवताचे ते टाकुन गेले
वाहत्या गंगेत कसे हात धुऊन गेले

अंधार शोधण्या ते दीप घेऊन आले
आसवांच्या गावाला हुल देऊन गेले

रिक्त तर्कांची मते हाती घेऊन आले
भाट अर्थहीन शब्दांचा ढोल बडवुन गेले

घेऊनी विजय मनीषा हात जोडून आले
आणीबाणीत सारे कसे पांगुन गेले

उदकाहूनी निराळे तरंग मानून गेले
राजवंशी थाटात दिंडित राहुन गेले

- राहत

कविता

उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जनातलं, मनातलं
21 Nov 2021 - 12:57 pm

आतापर्यंत भूलचुकीमुळे काही काव्यशास्त्रविषयक लेख "जे न देखे रवी" मध्ये लिहीत होतो. कालचा लेख इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. क्षमस्व!

---

मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.

या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो

---

कवितालेख

उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जे न देखे रवी...
20 Nov 2021 - 1:14 pm

मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो

कविता

तुझ्या घरातले अनारसे

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in जे न देखे रवी...
19 Nov 2021 - 6:02 pm

तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?

माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!

तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील

आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील

तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील

माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील

तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील

उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील...

प्रेम कविताकविता

उतरत्या संध्याकाळी....

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
15 Nov 2021 - 8:53 am

उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये.
हरवल्या नजरेला काही काही दिसू नये.
चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची,
धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये.

उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू,
उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.
सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी.
हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी.

उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती.
जपताना धागा धागा धर थोडी राख हाती.
मिटुनिया डोळे हळू लाव दिवा अंगणात,
इडा पिडा टळो सारी समईच्या प्रकाशात..

कविता

खंत

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जे न देखे रवी...
13 Nov 2021 - 11:11 pm

बोलणं होतंय, कळणं नाही.
पाहणं होतंय, रमणं नाही.
ऐकणं होतंय, समजणं नाही.
धावणं होतंय, थांबणं नाही.
भेटणं होतंय, मिसळणं नाही.
फिरणं होतंय, शोधणं नाही.
आठवणं होतंय, विसरणं नाही.
वाचणं होतंय, उमगणं नाही.

कविता

किनखापी आभाळाने

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Nov 2021 - 4:30 pm

किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र

मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र

थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र

रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र

जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?

मुक्त कविताकविता