कविता

मीर तकी मीरची एक गझल

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जे न देखे रवी...
27 Feb 2022 - 4:53 pm

#मीर_तकी_मीरची_एक_गझल
खूप दिवसापूर्वी एक चित्रपट पहिला होता ‘काली सलवार’ नावाचा . साsदत हसन मंटोच्या ह्याच नावाच्या लघु कथेवर बेतलेला. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एका पूर्वी कधीही न ऐकलेल्या गझलचे शेर होते. गायकाचा आवाज आणि शब्द अतिशय वजनदार वाटत होते पण अर्थ अजिबात समजत नव्हता. कवीचे नाव ‘मीर तकी मीर’ चित्रपटाच्या श्रेय नामावली मध्ये सापडले. बरीच शोधाशोध करून शेवटी ही पूर्ण गझल सापडली.

gazalकविता

जगत् त्राही माम्

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
26 Feb 2022 - 2:59 pm

त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटी sssssल

म्हातारा बायडन अन्
कागदी घोडे नाटो
जिसकी लाठी उसकी भैस
जुनी कागदपत्रे फाटो

त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटील

निर्भयपणे अध्यक्ष झेलीन्स्की
नाही पळणार मी झेलीन की
लढणार प्रतिकार करणार स्वाभीमानी
ते नव्हे अफगाणी ,घर दिले तालीबानी

धमकी जर नाही आलात शरण
तर हजारोंचे अटळ आहे मरण
इमरान वीटला कर्जबाजारा
समोर जावून घातला मुजरा

कविता

तुझी वाट पाहत.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
23 Feb 2022 - 9:33 am

अवखळ वारा
रिमझिम धारा
हळूहळू सांजावता
वाटतं ... तू येशील आता.

पावसानं झालंय
ओलंचिंब रान
मातीलाही सुचलंय
दरवळणारं गाणं.

मन माझं हेलकावतंय
विरहाच्या लाटेवर
नजर लावून बसलंय
तुझ्या नेहमीच्या वाटेवर.

असेच एकदा आठवणींचे
मेघ भरून आलेले
नकळत डोळ्यातून
झरुन गेलेले.

तुझी वाट पाहत तिथे
भिजलो होतो चिंब
म्हणून कुणा दिसले नाहीत
आसवांचे थेंब.

नाहीतर मित्रांना
हे गुपित कळलं असतं
खरं सांगतो त्यांनी मला
खूप-खूप छळलं असतं.

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

एकाकी

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
21 Feb 2022 - 4:26 pm

एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे
शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे.

कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा
आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे.

दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे
आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे.

स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे
दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे.

आपले आपले करता हात रिक्त होती
दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे.

आनंदाने जगताना जपले ही पाहिजे
जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे.

मुक्त कविताकविता

राजकारणाचा ढासळला दर्जा

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
21 Feb 2022 - 9:27 am

कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे.
काळ बदलला,
"वोह बुराई करे,
हम भलाई करे,
नही बदले की हो भावना,
ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम "
हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता..

कविता

निघाले किरीट सोमय्या....

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
19 Feb 2022 - 10:53 am

१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या

https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-inves...

रेवदंडा पोलिसांत FIR
19 बंगले चोरीला गेले...

| निघाले किरीट सोमय्या |
|राऊत करी ता था थैय्या ||

| त्यांच्या हाती पावती |
|मिरच्या झोंबती राऊती ||

|चालले पनवेल, पेण, पेझारी |
|शोधायला शुक्राचार्य अन झारी ||

|पोचले गाव कोरलई |
|म्हणाले बंगले चोर लई ||

कविता

तुझ्याचमुळे

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
18 Feb 2022 - 5:49 pm

सारे तुझेच होते,
सारे तुझेच आहे
तू आहेस म्हणून
स्वप्नांचे येणे-जाणे आहे.

शब्द तुझेच होते
भाव तुझेच आहेत
तुझ्या मुळे इथे
कवितेचे व्यक्त होणे आहे.

गीत तुझेच होते
सूर तुझेच आहेत
तुझ्याच मुळे आयुष्यात
संगीताचे लेणे आहे.

रुप तुझे होते
रंग तुझेच आहेत
तुझ्याच मुळे सदा
रंगपंचमी आहे.

अभय-काव्यकविता

शब्दचित्र

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
17 Feb 2022 - 5:12 pm

संपले का रंग सारे
का कुंचले मोडले
दोन रंगात सारे
विश्व का रे रेखले

नीळा सावळया निर्झराचा
रंग कोठे लपवीला
काय ठावे तुझ्या मानसी
शुभ्र धवल का रे भावला

अंथरुन कालीन धवल
लपवले रंग सारे
उजळून विश्व सारे
दीप तेज मंदावले

नील गगन ,धवल तारे
वाहती उष्ण वारे
शोषून धवल रंग
हळूच फुटती धुमारे

येता ऋतुराज यौवनाचा
उघडेल मूठ त्याची
आशा हीच उद्याची
उधळून रंग सारे
उमटतील चित्रं नव पल्लवांची

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीनिसर्गकविताछायाचित्रणरेखाटन

रिमझिमत्या धारातून आलीस.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
17 Feb 2022 - 8:55 am

रिमझिमत्या धारातून
आलीस होऊनिया चिंब
मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब.

मातीस स्पर्शती धारा
गंधात नाहते धरा
तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध.

पापण्या मिटून दूर
लाजून जाहली चूर
थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब.

दाटले मनी काहूर
डोळ्यात साठला पूर
उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?

गाणेकविताप्रेमकाव्य

आशा

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
16 Feb 2022 - 2:19 pm

नौका ही बांधलेली
राहील का बांधलेली

उरात भरूनी वारे
ही पाहतो निघालेली

वादळे येती तरी
लाटा फोडून ती गेली

थांबलो तेथेच मी
ती निघून गेलेली

मी असेन येथेच
वेळ नाही गेलेली

परत कधी येईल ती
आशा न विझलेली

आशादायककविता