सांज फुले
सांज फुलांनी भरू दे
काळोखा रंग सावल्यांत उतरू दे
धूसर झाली मावळतीची वाट
मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट
पंखात घेऊन भोवतीची वारे
परतू लागली चुकार पाखरे
सूर्य मिटून राने अंधारली
प्रकाशज्योत अलगद विजून गेली
अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर
रात्र पावलाने पुढे येई हळुवार