शिवजयंती विशेष लेख - शिवकालीन शस्त्रभांडार
शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले...मोगल,आदिलशहा हे उच्च प्रतीचा दारुगोळा मिळवण्यासाठी इंग्रज,पोर्तुगीज,डच यांच्यावर अवलंबून होते,ती वेळ येऊ नये म्हणून वेळीच दूरदृष्टी दोन्ही छत्रपतींनी दाखवली.पायदळ,घोडदळ,आरमार यांच्यासाठी वेगवेगळी शस्त्रे निर्मिली गेली किंवा त्यात बदल केले गेले.