सध्या ह्या मांजरांनी फार धुमाकूळ घातलाय रावं. चेपुवर, मेल मधून आणि आता इथेही.
तमाम मांजर प्रेमींची नाराजी ओढवत म्हणतो या सगळ्यांना* गोणपाटात टाकून पार उत्तर नायतर दक्षिण ध्रुवावर नेऊन सोडलं पाहिजे.
श्री, संपादकांपासून सगळ्यांना बस बस झालीत मांजरं.
आणि तू अगदी प्रेमाने लिंका द्यायलास. :(
१५-२० खरीखुर्री मांजरे धरुन त्यांना तुझ्या घराची लिंक देईन. ;)
फोटो आवडले. प्राण्यांच्या फोटोंमधेही डोळ्यांच्या प्रतलातून काढलेले फोटो जिवंत होतात.
मांजराची पिल्लं कॅमेर्याकडे बघताना साधारणतः भेदरलेली किंवा भेदरून हल्ला करण्याच्या तयारीत दिसतात. त्यांचे फोटो आईच्या शेपटाशी किंवा आपसांत खेळताना त्यांचं लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने काढलेले छान वाटतात.बहुतांशी मोठी मांजरं पक्की डांबिस, माजुर्डी आणि मालकीभाव दाखवणारी असतात. ती ओळखीच्या आणि लळा लावू पहाणार्या माणसांकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे मोठ्या मांजरांचे फोटो मस्तच येतात. तुमच्या शेवटच्या फोटोतली मांजर आणि पिल्लं पहा, मांजर कशी "हा काय क्षुद्र प्रकार आहे!" अशा माजुर्ड्या नजरेने बघते आहे आणि तिची पिल्लं मात्र भेदरलेली आहेत.
जमलं तर एखाद्या मांजराला पोटभर खायला घाला. मग ती स्वतःचं ग्रूमिंग करेल, तेव्हा तिचे डोळे फोटोत मिळतात का पहा. असे फोटो बघायला मज्जा येते. आमच्या घरावर मांजराने हक्क सांगितला होता तेव्हा फोटोग्राफी मला परवडण्यातली नव्हती.
तसंच माणसांचंही. कॅमेरा कॉशस (नर्व्हस होणारे आणि पोझ घेणारे दोन्ही) लोकांचे फोटो त्यांचं लक्ष नसताना काढले तर अधिक चांगले दिसतात.
गणपा वेताळाने जरा धागे थांबत थांबत टाका असे सांगूनही हुमी एक्याने आपला हट्ट सोडला नाही. आठवड्याला रोज एक धागा तो सुद्धा फोटोचाच व ५२ आठवड्यानंतर त्याच सर्व फोटोचा एक धागा करून ५३ चा आठवड्यात उद्यापन करावे
असे हुक्का ला कोणीतरी अघोरी शक्तीने सांगितले असावे. तो पुन्हा मिपा ची वाट चालू लागला. मांजरे, मग कुत्री, मग ससे मग खारूताई असे धागे टाकायचे मनात पक्के करून त्याने गणपा वेताळात परत उचकाविण्यासाठी........
तुमचे धागे म्हणजे एक पर्वणीच असते. तुमच्यामुळे कळलं की मांजर असं दिसतं, नाहीतर आम्हाला कुठे मिळणार मांजर बघायला !! धाग्यात क्रमशः न दिसल्यामुळे अंमळ निराशा झाली. उद्याचा धाग्यात कोणता प्राणी टाकणार ते सांगत चला. तेवढीच उत्सुकता वाढेल. बाकी पुढील धाग्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
@घुशींचे आणि उंदरांचे फोटो असे काढुन दाखवु शकता काय ??>>> =)) ते काढलेले आहेतच,फक्त ते त्याच मांजरांच्या पोटांमधे आहेत, ;-) एक्स-रे काढला तर(च) दिसतील. हुक्कू एक्स-रे टाका हो =))
मी वैयक्तिक कुठे होतोय . . . इथे बरेच सदस्य खोडकर आहेत तर मी पण खोडकर बनतोय . . . आपले ते प्रेम दुसर्याचे ते पाप....असे कसे चालेल....माझी चेष्टा केल्यावर जर मी पण कोणाची चेष्टा केली तर त्याला डोक्यात राख घालणे म्हणत नाहीत...
खोड्या करतांना काही संकेत पाळा एवढेच म्हणायचे होते बाकी आपली इच्छा. शिवाय तुम्ही हे फोटो दुबार इथे टाकल्यामुळे backfoot वर आहात हे लक्षात घ्या. मग असे चिडून दिलेले प्रतिसाद येणार नाहीत.
असतील देखील बहुदा. पण काम धंदे असल्याने असल्या भिकार शोधांकरता आणि त्यांचे फटू काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात डकवत बसायला आपल्याला वेळा नाय. त्यामुळे काय कल्पना नाय.
अर्थात "तुमच्यासारखा" राजकुमार असल्यावर त्यांचे जगणे मुश्किल झाले असेल नाही ??
आता ते मी कसे सांगणार ? राजकुमाराच्या राज्यात जगणे अवघड आहे, का एखाद्या टिनपाट फोटोग्राफरच्या ते मांजरांनाच माहिती असेल ना.
४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे नवरा लग्नाच्या / बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी (तो आहे हे विसरुन) हापिसातुन पार्टी करुन आलाय आणि बायकोचं लेक्चर ऐकतोय अशा पोज मध्ये उभा आहे.
कुठुन शिकलं असेल ते पिल्लु. :D
पिल्लांच्या चेहर्यावरील भाव छानच टिपले आहेत. मी एकदा एका पाळलेल्या मांजराचे फोटो काढायचा प्रयत्न केला तर जमतील तेवढे मख्ख भाव त्याने चेहर्यावर आणले होते.
बाकी एखाद्या चित्रलेखाला शब्दांची जोड कशी द्यावी याचे सुगम मार्गदर्शन येथे मिळेल.
>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा' विकणे मूर्खपणाचे आहे . . .
अगदी अगदी !! बा द वे पुढला आरसा....आपलं ते पुढला धागा कोणत्या प्राण्यावर म्हणे ? घोरपडींचे फोटो टाका, ते पाह्यल्याचं आठवत नाहीये.
मला वाटते या चांगल्या फोटोंचे श्रेय मांजराचे आहे त्यांचा exif data देता काय ? म्हणजे त्यांची जात , आईवडील , ती कोणत्या घरांत डोळे मिटून दूध पितात, उंदीर कितपत खातात . की पूर्ण शाकाहारी आहेत ई.
प्रतिक्रिया
11 Dec 2012 - 11:33 pm | गणपा
सध्या ह्या मांजरांनी फार धुमाकूळ घातलाय रावं. चेपुवर, मेल मधून आणि आता इथेही.
तमाम मांजर प्रेमींची नाराजी ओढवत म्हणतो या सगळ्यांना* गोणपाटात टाकून पार उत्तर नायतर दक्षिण ध्रुवावर नेऊन सोडलं पाहिजे.
* मांजरांना (मांजर प्रेमींना नेण्यासही आमची हरकत नाही.)
11 Dec 2012 - 11:58 pm | मालोजीराव
शेवटच्या फोटूतला तो मोठा प्राणी 'ससा' आहे का?
12 Dec 2012 - 12:17 am | जेनी...
हेच फोटो मी मिपावर या आधी पाहिलेले आठवतायत .
कुणाचे चोरले ओ??
12 Dec 2012 - 12:38 am | संजय क्षीरसागर
होतीस. मला नक्की आठवतय!
12 Dec 2012 - 12:47 am | अभ्या..
अरारारा म्हणून एवढी मांजरे आणलीत होय? ;)
बघ गं पूजा. आता तरी दिसतय का एखादं तुझ्यासारखं?
12 Dec 2012 - 12:57 am | जेनी...
हो ना संजय काका ??
मला पण आठवतय ...
का लोकं रीपीट रीपीट तेच तेच मिपाकरांना दाखवुन बोर करायलेत कै मैत :-/
12 Dec 2012 - 1:05 am | संजय क्षीरसागर
त्यांनी इथे प्रदर्शन भरवायच ठरवलय.
12 Dec 2012 - 1:08 am | श्रीरंग_जोशी
इथे होते ते फोटोज.
12 Dec 2012 - 1:15 am | अभ्या..
श्री, संपादकांपासून सगळ्यांना बस बस झालीत मांजरं.
आणि तू अगदी प्रेमाने लिंका द्यायलास. :(
१५-२० खरीखुर्री मांजरे धरुन त्यांना तुझ्या घराची लिंक देईन. ;)
12 Dec 2012 - 1:38 am | श्रीरंग_जोशी
अरे नादान मुला, काही भूतदया वगैरे आहे की नाही तुझ्यात?
12 Dec 2012 - 10:22 pm | हुकुमीएक्का
समजले का? ..
12 Dec 2012 - 10:23 pm | जेनी...
पण परत परत का?
12 Dec 2012 - 12:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
फोटो आवडले. प्राण्यांच्या फोटोंमधेही डोळ्यांच्या प्रतलातून काढलेले फोटो जिवंत होतात.
मांजराची पिल्लं कॅमेर्याकडे बघताना साधारणतः भेदरलेली किंवा भेदरून हल्ला करण्याच्या तयारीत दिसतात. त्यांचे फोटो आईच्या शेपटाशी किंवा आपसांत खेळताना त्यांचं लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने काढलेले छान वाटतात.बहुतांशी मोठी मांजरं पक्की डांबिस, माजुर्डी आणि मालकीभाव दाखवणारी असतात. ती ओळखीच्या आणि लळा लावू पहाणार्या माणसांकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे मोठ्या मांजरांचे फोटो मस्तच येतात. तुमच्या शेवटच्या फोटोतली मांजर आणि पिल्लं पहा, मांजर कशी "हा काय क्षुद्र प्रकार आहे!" अशा माजुर्ड्या नजरेने बघते आहे आणि तिची पिल्लं मात्र भेदरलेली आहेत.
जमलं तर एखाद्या मांजराला पोटभर खायला घाला. मग ती स्वतःचं ग्रूमिंग करेल, तेव्हा तिचे डोळे फोटोत मिळतात का पहा. असे फोटो बघायला मज्जा येते. आमच्या घरावर मांजराने हक्क सांगितला होता तेव्हा फोटोग्राफी मला परवडण्यातली नव्हती.
तसंच माणसांचंही. कॅमेरा कॉशस (नर्व्हस होणारे आणि पोझ घेणारे दोन्ही) लोकांचे फोटो त्यांचं लक्ष नसताना काढले तर अधिक चांगले दिसतात.
(माजुर्ड्या मांजराची मैत्री लाभलेली) अदिती
12 Dec 2012 - 1:12 am | श्रीरंग_जोशी
प्रतिसादात मांडलेल्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत.
छायाचित्रणातले हे तत्वज्ञान स्व.गौतम राजाध्यक्षांनी आपल्या अप्रतिम कलाकृतींद्वारे एका नव्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
12 Dec 2012 - 5:46 am | चौकटराजा
गणपा वेताळाने जरा धागे थांबत थांबत टाका असे सांगूनही हुमी एक्याने आपला हट्ट सोडला नाही. आठवड्याला रोज एक धागा तो सुद्धा फोटोचाच व ५२ आठवड्यानंतर त्याच सर्व फोटोचा एक धागा करून ५३ चा आठवड्यात उद्यापन करावे
असे हुक्का ला कोणीतरी अघोरी शक्तीने सांगितले असावे. तो पुन्हा मिपा ची वाट चालू लागला. मांजरे, मग कुत्री, मग ससे मग खारूताई असे धागे टाकायचे मनात पक्के करून त्याने गणपा वेताळात परत उचकाविण्यासाठी........
12 Dec 2012 - 7:48 am | संजय क्षीरसागर
आणि आता वेताळ आपला हट्ट सोडत नाही म्हणताय!
12 Dec 2012 - 11:38 am | चौकटराजा
संजयशेट , आमची मल्लीनाथी फोटो काढण्यावर नाही. हूक्काने " धागोंका त्योहार " मधुन मधूनच साजरा करावा यावर आहे बाप्पा !
12 Dec 2012 - 8:12 am | सूड
तुमचे धागे म्हणजे एक पर्वणीच असते. तुमच्यामुळे कळलं की मांजर असं दिसतं, नाहीतर आम्हाला कुठे मिळणार मांजर बघायला !! धाग्यात क्रमशः न दिसल्यामुळे अंमळ निराशा झाली. उद्याचा धाग्यात कोणता प्राणी टाकणार ते सांगत चला. तेवढीच उत्सुकता वाढेल. बाकी पुढील धाग्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
12 Dec 2012 - 8:54 am | जेनी...
हुक्कु , सुंदर गोष्टिंचे फोटो सुंदरच येतात
घुशींचे आणि उंदरांचे फोटो असे काढुन दाखवु शकता काय ??
( निरागस प्रश्न आहे )
12 Dec 2012 - 9:23 am | संजय क्षीरसागर
ते निव्वळ फोटो टाकयलाच इथे येतात. उद्या त्यांनी चॅलेंज म्हणून खरंच काढले आणि टाकले इथे फोटो तर आपल्याला पाहवणारेत का?
12 Dec 2012 - 9:31 am | अत्रुप्त आत्मा
@घुशींचे आणि उंदरांचे फोटो असे काढुन दाखवु शकता काय ??>>> =)) ते काढलेले आहेतच,फक्त ते त्याच मांजरांच्या पोटांमधे आहेत, ;-) एक्स-रे काढला तर(च) दिसतील. हुक्कू एक्स-रे टाका हो =))
12 Dec 2012 - 11:56 am | संजय क्षीरसागर
तुम्ही उगीच नव्या आयडिया देताय
12 Dec 2012 - 3:07 pm | चौकटराजा
आताचा हुक्काचा फोन आला " चौ रा कोठे पोर्टेबल एक्स्र रे मशीन भाडयाने देणारा एखादा भाउ ओळखीचा आहे का असे विचारत होता फोनवर गडी .
12 Dec 2012 - 3:22 pm | सूड
स्वसंपादन सुरु झालं काय हो ? मला ऑप्शन (आणि वरच्या प्रतिसादातला विशिष्ट शब्द)दिसत नाहीये.
12 Dec 2012 - 10:29 pm | हुकुमीएक्का
एक नं बोललात बर का. . . :) . . . पण आपल्याला असा माणूस पाहिजे जो 'बडबड' कमी करणारा आणि काम जास्त करणारा असेल . . .
12 Dec 2012 - 11:14 pm | हारुन शेख
हुकुमीएक्काराव तुम्ही वैयक्तिक का होताय. इथे बरेच सदस्य खोडकर आहेत पण काही मर्यादा सगळेच पाळतात.अशी डोक्यात राख घालायला लागाल तर अवघड होईल.
12 Dec 2012 - 11:22 pm | हुकुमीएक्का
मी वैयक्तिक कुठे होतोय . . . इथे बरेच सदस्य खोडकर आहेत तर मी पण खोडकर बनतोय . . . आपले ते प्रेम दुसर्याचे ते पाप....असे कसे चालेल....माझी चेष्टा केल्यावर जर मी पण कोणाची चेष्टा केली तर त्याला डोक्यात राख घालणे म्हणत नाहीत...
12 Dec 2012 - 11:30 pm | हारुन शेख
खोड्या करतांना काही संकेत पाळा एवढेच म्हणायचे होते बाकी आपली इच्छा. शिवाय तुम्ही हे फोटो दुबार इथे टाकल्यामुळे backfoot वर आहात हे लक्षात घ्या. मग असे चिडून दिलेले प्रतिसाद येणार नाहीत.
12 Dec 2012 - 11:44 pm | हुकुमीएक्का
बर् . . आपल्या इच्छेचा आदर ठेवतो . . .
12 Dec 2012 - 9:44 am | ह भ प
एकापेक्षा एक टारगट मंडळी आहेत सगळी..
मांजराची पिल्लं हो..!!
12 Dec 2012 - 1:26 pm | सस्नेह
सॉरी, राव, तुम्ही पलिकडच्या आळीतले वाटतं ?
12 Dec 2012 - 11:30 am | बाबा पाटील
झक्कास पिल्ल आहेत्,काही वर्षापुर्वी माझ्याकडे पाच मांजरे होती,त्याची आठवण झाली.खरच मांजराएव्हड स्वच्छ प्राणी दुसरा कुठलाही नाही....
12 Dec 2012 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार
आजवर मांजरां विषयी खूप ऐकले होते. आज प्रत्यक्षात मांजरे बघायला मिळाली.
मनःपूर्वक धन्यवाद.
12 Dec 2012 - 1:28 pm | सस्नेह
'धन्यवाद 'हुकुपिडिया' ' हे टंकायचं राहिलं वाटतं ?
12 Dec 2012 - 2:41 pm | बॅटमॅन
धन्यवाद 'हुकुपिडिया'.......(c) हुकुंग.
12 Dec 2012 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार
जगात 'पीडिया' फक्त एकच आणि तो म्हणजे 'अकुपीडिया'. बाकी सगळे हवशे गवशे.
12 Dec 2012 - 10:23 pm | हुकुमीएक्का
तुमच्या 'ओसाड' राज्यात नसतील ना मांजरे....अर्थात "तुमच्यासारखा" राजकुमार असल्यावर त्यांचे जगणे मुश्किल झाले असेल नाही ??
13 Dec 2012 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार
असतील देखील बहुदा. पण काम धंदे असल्याने असल्या भिकार शोधांकरता आणि त्यांचे फटू काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात डकवत बसायला आपल्याला वेळा नाय. त्यामुळे काय कल्पना नाय.
आता ते मी कसे सांगणार ? राजकुमाराच्या राज्यात जगणे अवघड आहे, का एखाद्या टिनपाट फोटोग्राफरच्या ते मांजरांनाच माहिती असेल ना.
14 Dec 2012 - 8:57 pm | जेनी...
:D
12 Dec 2012 - 2:49 pm | दादा कोंडके
और आंदो, हयगय नै करनेका.
-(बोका) दादा
12 Dec 2012 - 3:58 pm | झकासराव
४ थ्या फोटुतला पिल्लु म्हणजे नवरा लग्नाच्या / बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी (तो आहे हे विसरुन) हापिसातुन पार्टी करुन आलाय आणि बायकोचं लेक्चर ऐकतोय अशा पोज मध्ये उभा आहे.
कुठुन शिकलं असेल ते पिल्लु. :D
12 Dec 2012 - 6:09 pm | jaypal
२ रा आणि ४था आळीपाळीने बघा.
12 Dec 2012 - 7:45 pm | पैसा
दुसरा फोटो मस्त आलाय. फोटो मांजरांचे असल्याने मला अज्याबात कंटाळा नाय आला. फक्त परत परत तेच फोटो टाकू नका.
12 Dec 2012 - 6:06 pm | श्री गावसेना प्रमुख
हुकुमी एक्का साहेब अशा इजीप्शीयन माजंरींचे फोटो येउ द्या
12 Dec 2012 - 10:29 pm | श्रीरंग_जोशी
पिल्लांच्या चेहर्यावरील भाव छानच टिपले आहेत. मी एकदा एका पाळलेल्या मांजराचे फोटो काढायचा प्रयत्न केला तर जमतील तेवढे मख्ख भाव त्याने चेहर्यावर आणले होते.
बाकी एखाद्या चित्रलेखाला शब्दांची जोड कशी द्यावी याचे सुगम मार्गदर्शन येथे मिळेल.
12 Dec 2012 - 10:36 pm | हुकुमीएक्का
आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा' विकणे मूर्खपणाचे आहे . . .
12 Dec 2012 - 11:54 pm | किसन शिंदे
खरंय राव...
आंधळ्यांच्या बाजारात आरसा विकायला 'येणंच' महामुर्खपणाचं आहे. मी म्हणतो नसत्या उठाठेवी करायच्या कशाला?
13 Dec 2012 - 12:58 am | अभ्या..
काय खरंय किसनदेवा? :(
आसल्या मूर्खाच्या आरशात तोंड बघण्यापेक्षा आंधळं असणं परवडलं.
13 Dec 2012 - 8:24 am | किसन शिंदे
:)
डोळे उघडे ठेवा!
13 Dec 2012 - 9:01 am | सूड
>>आंधळ्यांच्या बाजारात 'आरसा' विकणे मूर्खपणाचे आहे . . .
अगदी अगदी !! बा द वे पुढला आरसा....आपलं ते पुढला धागा कोणत्या प्राण्यावर म्हणे ? घोरपडींचे फोटो टाका, ते पाह्यल्याचं आठवत नाहीये.
12 Dec 2012 - 10:37 pm | हुकुमीएक्का
काही प्रतिक्रिया खुप चांगल्या आहेत...
13 Dec 2012 - 1:30 pm | कवितानागेश
धन्यवाद.
काही फोटोदेखिल खूप चांगले आहेत.... :)
15 Dec 2012 - 8:22 am | ५० फक्त
शब्दरचना अंमळ चुकली वाट्टं - काही फोटो खुप चांगलेदेखिल आहेत... - असं लिहायचं होतं काय ?
13 Dec 2012 - 12:03 am | ठक
मस्त फोटोज
आणखी येउद्यात.
15 Dec 2012 - 12:48 am | संजय क्षीरसागर
त्यांच्या (एकमेव) चित्राची आठवण झाली. पुन्हा मॅडमनी चित्राच्या नावानं ब्र काढला नाही.
15 Dec 2012 - 12:56 am | अभ्या..
एकमेव नाही. दोन.
तुटलेल्या आणि वाकलेल्या गजातून दिसणारा धबधबा पाहीला नाहीत का तुम्ही?
पण ते बहुतेक ग्राफिक्स होते त्यांच्या मते.
15 Dec 2012 - 1:03 am | संजय क्षीरसागर
का तो पिसारा झाडणारा सफेद मोर होता? मायला इथे आता काही शोधणं म्हणजे बैलाचं दूध काढण्याइतकं कठीण झालय.
15 Dec 2012 - 1:01 am | लंबूटांग
EXIF data दिल्यास माझ्यासारख्या नवशिक्यांना खूप मदत होईल.
तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आहे.
15 Dec 2012 - 10:30 pm | हुकुमीएक्का
फोटो नं. १
कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५०
शटर स्पीड - १/२०० सेकंद
अॅपरचर - एफ/५.६
एक्पोझर टाईम - १/२०० सेकंद
आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-४००
मोड - मॅन्युअल
---------------------------------------------------------------------------
फोटो नं. २
कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५०
शटर स्पीड - १/३२ सेकंद
अॅपरचर - एफ/५.६
एक्पोझर टाईम - १/३० सेकंद
आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-१००
मोड - मॅन्युअल
---------------------------------------------------------------------------
फोटो नं. ३
कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५०
शटर स्पीड - १/२० सेकंद
अॅपरचर - एफ/५.६
एक्पोझर टाईम - १/१५ सेकंद
आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-१००
मोड - मॅन्युअल
---------------------------------------------------------------------------
फोटो नं. ४
कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५०
शटर स्पीड - १/२० सेकंद
अॅपरचर - एफ/५.६
एक्पोझर टाईम - १/२० सेकंद
आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-१००
मोड - मॅन्युअल
---------------------------------------------------------------------------
फोटो नं. ५
कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५०
शटर स्पीड - १/२० सेकंद
अॅपरचर - एफ/५.६
एक्पोझर टाईम - १/२० सेकंद
आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.-२००
मोड - मॅन्युअल
---------------------------------------------------------------------------
फोटो नं. ६
कॅमेरा - फुजीफिल्म फाईनपिक्स एस. २९५०
शटर स्पीड - १/४० सेकंद
अॅपरचर - एफ/५.६
एक्पोझर टाईम - १/४० सेकंद
आय. एस. ओ. स्पीड - आय. एस. ओ.- २००
मोड - मॅन्युअल
---------------------------------------------------------------------------
16 Dec 2012 - 1:05 pm | जयवी
फोटो आणि प्रतिक्रिया......दोन्ही मस्त :)
मिपा रॉक्स ;)
16 Dec 2012 - 4:53 pm | चौकटराजा
मला वाटते या चांगल्या फोटोंचे श्रेय मांजराचे आहे त्यांचा exif data देता काय ? म्हणजे त्यांची जात , आईवडील , ती कोणत्या घरांत डोळे मिटून दूध पितात, उंदीर कितपत खातात . की पूर्ण शाकाहारी आहेत ई.
16 Dec 2012 - 10:15 pm | हुकुमीएक्का
त्यासाठी मांजरीची मुलाखत घ्यावी लागेल . . . तिच्या रेशनकार्ड ची झेरॉक्स घ्यावी लागेल . . . ते थोडेसे कठीणच आहे . . . :)
16 Dec 2012 - 11:05 pm | मदनबाण
३रा फोटु सगळ्यात जास्त आवडला ! :)