तंत्र

What's App अत्याधुनिक उपयुक्त एस.एम.एस द्योतक

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in काथ्याकूट
6 Mar 2013 - 11:01 pm

What's App उपयुक्त अत्याधुनिक एस.एम.एस द्योतक     अत्याधुनिक  उपयुक्त एस.एम.एस द्योतक

 

संगणकावर इंटरनेटचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल ?

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in काथ्याकूट
23 Feb 2013 - 7:26 pm

संगणकावर इंटरनेट वापरताना बर्याच वेळा आपल्याला अपेक्षित वेग मिळत नाही आणी त्यामुळे आपली निराशा होते. इंटरनेट वर आधीच उपलब्ध असलेल्या युक्त्या वापरून आपल्याला इंटरनेटचा वेग वाढवला तरी देखील तो २० ते ३० टक्क्यांनीच वाढतो. परंतु इथे दिलेल्या युक्तीमुळे तुमच्या इंटरनेटचा वेग हा ५०० टक्क्यांनी नकीच वाढेल. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला संगणकावर इंटरनेट वापरताना कमी वेगाचा त्रास होणार नाही हे नक्की. आणी तुमचा अनुभव इथे सांगायला विसरू नका..!!

आयटीच्या गोष्टी - नमन

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
16 Feb 2013 - 4:35 pm

नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्‍या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट.

तंत्रमाहिती

रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 7:14 pm

मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे.

मांडणीकलातंत्रमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रआस्वादमाध्यमवेधलेखअनुभवमाहिती

क्यू. आर. कोड - म्हणजे काय रे भाऊ ?

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 1:26 pm

मागच्या ट्रीपला पुण्याहून चेन्नैला परतण्याच्या आदल्या रात्री, इ-तिकीट हॅन्डबॅगच्या खणात ठेवताना मुलाने बघितले आणि "बघू...", असे म्हणून मागितले. त्यावर क्यू.आर. कोड होता. ते बघून, “आयला, कसलं भारी डिझाइन आहे. तिकिटावर कसलं आहे हे डिझाइन?”, असा मला प्रश्न विचारला. मग त्याला उत्तर देण्याऐवजी मी मोबाइल काढला आणि त्याच्यावरचे ‘क्यू.आर. ड्रॉइड (QR Droid)’ हे अ‍ॅप चालू केले आणि तो कोड स्कॅन केला. मोबाइलमध्ये डायरेक्ट ब्राउझर चालू होऊन, स्पाईस जेट एयरलाइन्सची वेब साईट चालू झाली आणि माझा 'वेब - चेक इन' केलेला बोर्डिंग पास दिसू लागला.

तंत्रमाहितीसंदर्भ