What's App अत्याधुनिक उपयुक्त एस.एम.एस द्योतक
अत्याधुनिक उपयुक्त एस.एम.एस द्योतक
'' आज महत्वाच्या कामाला जायचे असल्याकारणामुळे क्लासला सुट्टी आहे, उद्याचा क्लास नेहेमीप्रमाणे होईल'' असा सरांनी What's App वरच्या क्लासच्या ग्रुप मध्ये एस.एम.एस केला आणी ८० जणांच्या चम्मुला एकदमच आनंद झाला. सरांच्या त्या मेसेज खालोखाल अतिउत्साही विद्यार्थ्यांचे यीप्पी, वुहू तत्सम संदेश वेग-वेगळ्या स्मायलींसकट रिप्लाय झळकु लागले. 'आजचा प्लॅन काय?' किंवा 'दुपारी मंगलाला कोणता लागलं रे?' असे संदेश मात्र What's App वर वैयक्तिक चर्चेत सुरु होते.
हा परिच्छेद लिहिण्याचा उद्देश ८० मुलांचे शैक्षणिक नुकसान, किंवा आजकालच्या पिढीबद्दल असणारे वैश्विक प्रबोधनात्मक दृष्टीकोन असा बिलकुल नसुन वाचकांना What's App च्या उपयुक्ततेबद्दल बद्दल माहिती देणे असा आहे. What's App एक मोफत एस.एम.एस सुविधा देणारे टूल आहे (इंटरनेट प्लॅन आवश्यक) काही वर्षांपुर्वी किंवा महिन्यांपुर्वी देखील एस.एम.एस अस्तित्वात होते पण ते जर १० जणांना पाठवायचे झाले तर ग्रुप मध्ये पाठवले असता पहिले एकाला, मग दुसऱ्याला, मग तिसऱ्याला अशा पद्धतीने जात पण What's App वर मात्र इकडे 'सेंड' या बटणावर टिचकी दिली की क्षणार्धात तो संदेश अमर्यादित (ग्रुप मध्ये जितके असतील तितक्या) लोकांना जातो. तुम्ही What's App वर अमर्यादित एस.एम.एस पाठवु शकता. तुम्हाला What's App वापरायचे असल्यास काही प्रमुख अटी आहेत त्या खालील प्रमाणे.
१) तुमच्या भ्रमणध्वनीची ऑपरेटिंग सिस्टीम ही अन्द्रोईड, ब्लॅकबेरी, नोकियाची काही निवडक सिरीस किंवा विंडोज असावी. ह्या व्यतिरिक्त भ्रमणध्वनींवर What's App वापरता येत नाही.
२) तुमचे जी.पी.आर.एस कनेक्शन चालु हवे. (इंटरनेट) जर तुमचा भ्रमणध्वनी या प्रमुख अटींमध्ये बसत असेल तर उत्तमच आहे.
आजच या दुव्यावरून What's App डाऊनलोड करून घ्या आणी तुमच्या मित्र-मैत्रिणींना ग्रुप मध्ये सामील व्हा. What's App ची काही प्रमुख वैशिष्ठे खालीलप्रमाणे
१) What's App फक्त एस.एम.एस पुरतेच मर्यादित नसुन तुम्ही यावर छायाचित्रे, चलचित्रे आणी इतर बर्याच गोष्टींचे आदान-प्रदान करू शकता.
२) एकाच वेळी अमर्यादित लोकांना एस.एम.एस सह कोणत्याही फाईल्स शेयर करू शकता.
तुमच्या भ्रमणध्वनी मध्ये What's App चालु शकेल की नाही हे जाणुन घेण्यासाठी ह्या दुव्यावर टिचकी द्या. जर तुमच्या भ्रमणध्वनीवर What's App चालु शकणार नसेल तरी चिंता करू नका. तुमच्या संगणकावरूनही तुम्ही What's App चा वापर करू शकता. आणी जरी तुमचा संपुर्ण ग्रुप भ्रमणध्वनीवरून What's App वापरत असेल तरी तुम्हीदेखील संगणकावरून What's App वापरून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू शकता.
अधिक माहितीसाठी भेट द्या .. काही अडचण उद्भवली तर त्याखाली मांडायला विसरू नका.
संगणकावर What's App कसे वापराल ? ![]()
इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे
आमच्याबद्दल प्रश्नोत्तरे गुप्तता धोरण
प्रतिक्रिया
viber
काय?
हे अगदी खरे आहे... त्यामुळे
उपयुक्त माहिती
माझ्या माहितीप्रमाणे व्हाॅट्स
म्हणजे कंपू का?
र र रिप्लाय चा..
-
आधीच हाफिसातून १२ तास जालावर
इथे हिंदुस्थानात २जीवर Whats
र र रिप्लायचा..
लेख बरा आहे
८० जणांच्या बॅचला एका what's
फुकट नाही.....
मदत.
र र रिप्लाय चा..
धन्स.
र र रिप्लाय चा..
अ आ आभाराचा.
व्हॉटस उप हे निदान एक वर्षासाठी मोफत आहे.
व्हॉटस उप हे निदान एक वर्षासाठी मोफत आहे.
प्रत्येकवेळी निरोप पाठवतांना
र र रिप्लाय चा..
मदत.
प्रयत्नांती परमेश्वर
बिरुटे सर, मला सुद्धा काही
धन्स.
मला वाटते पूर्ण कळपट
कळपट? अच्छा.. कीबोर्ड होय. मी