स्वतःसाठी जगू नका
मातीसाठी प्राण वेचतो आम्ही
जातीसाठी लढू नका ।
तिरंग्याची शान राखतो आम्ही
स्वतःसाठी जगू नका ।।
कितीही येवो वादळे मोठी
आम्ही त्यांना घाबरत नाही,
आपलेच खेचतात आपले पाय
ते आम्हाला पाहवत नाही,
तुमच्यासाठी लढतो आम्ही
कुणापुढे झुकू नका।
तिरंग्याची शान राखतो आम्ही
स्वतःसाठी जगू नका ।।
हसत असें तेव्हासुद्धा
जेव्हा मरण समोर येईल,
भ्याड हल्ले करणाऱ्यांच्या
यम होऊन समोर येईन,
मेल्यानंतर आमच्या देहाचे
राजकारण करू नका ।
तिरंग्याची शान राखतो आम्ही
स्वतःसाठी जगू नका ।।