पशु पक्षांसाठी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांनी केला नैसर्गिक अधिवासात कृत्रिम पाणवठा

नानुअण्णा's picture
नानुअण्णा in जनातलं, मनातलं
22 Feb 2019 - 2:23 pm

गेल्या काही दिवसांपासून मी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी जात आहे.
खालील माहिती त्यांनी व्हाट्स अप वरती पाठवलेली आहे, अनेक वर्ष ते पशु पक्षांसाठी तसेच निसर्ग संरक्षण याबद्दल जनजागृती आहेत.
सध्या होत असलेल्या हवामान बदलामुळे ऋतुबदल होत आहेत, त्याचा परिणाम पशु पक्षी यांच्या जीवनावर सुद्धा पडत आहे, तीव्र उन्ह्याळ्यात व पाणी टंचाईत, पशु पक्षी यांना पिण्यास पाणी नैसर्गिक अधिवासाप्रमाणे मिळावे यासाठी ते कार्य करीत आहेत. हे कार्य जनजागृतीतून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचेल व अधिक लोकसहभागातून कार्यास हातभार लागेल, हाच उद्देश आहे.
सोबत त्यांनी पाठवलेली पाणवट्याची छायाचित्रे जोडत आहे. (निमगाव घाणा हे गाव अहमदनगर जवळ आहे.)
किरण पुरंदरे यांनी पाठवलेली माहिती. (माहिती खूप संक्षिप्त आहे, ते स्वतः जास्त माहिती देऊ शकतील. ९७६५८१८८२५)
मित्रांनो बघा आपण सर्वांनी मिळून तयार केलेला पाणवठा किती जणांचा आधार आहे! योग्य आणि सुरक्षित ठिकाणी बांधलेल्या पाणवठ्याला किती महत्त्व आहे. हे फोटो तुमच्या मित्रांना पाठवा. योग्य आणि सुरक्षित ठिकाणी असा आणखी एक तरी पाणवठा आपण तयार करू या. आपल्या संस्थेला ओमप्रकाश खरवडे यांनी प्लास्टिकचं कापड अक्षरशः एक पैसासुद्धा न घेता दिलं आहे. ते अशा कापडाचा व्यवसाय करतात. त्यामुळे सध्या आपल्याकडे ९ चौरस फुटांचा तुकडा आहे. त्याचा उपयोग करून आपण एक छोटा पाणवठा सहज तयार करू शकू. निमगाव घाणा या ठिकाणी बांधलेल्या पाणवठ्यावर तर अक्षरशः दंगा सुरु आहे. मुंगी मकरंद वैद्य या पाणवठ्याच्या निर्मितीच्या वेळी उपस्थित होता. सुधाकर नाईक यांच्या मालकीच्या जागेत अहमदनगर शहराजवळ हा पाणवठा तयार केला आहे.
आज निमगाव घाणा येथील निसर्गस्नेही पाणवठ्याचा पहिला वाढदिवस आहे. अक्षरशः शेकडो पशुपक्ष्यांची तहान भागविण्याचं काम या पाणवठ्यानं केलं आहे,करत आहे. सुधीर नाईक यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या या पाणवठ्याची खूप चांगली काळजी घेतली जात आहे.
-
छायाचित्रे डकवता आली नाही, काही तरी चुकत होते. https://photos.app.goo.gl/3JeEoyYtEcn5uxJS7
धन्यवाद ,

समाजविचारबातमी

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2019 - 3:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपक्रम !

एकदम स्तुत्य उपक्रम . फक्त ती चित्रे दिसेल एव्हढं बघा . दिसत नाही आहेत आणि बघायची फार इच्छा आहे .

डँबिस००७'s picture

22 Feb 2019 - 6:07 pm | डँबिस००७

जबरदस्त !! छान उपक्रम !!

कंजूस's picture

22 Feb 2019 - 8:20 pm | कंजूस

स्क्रीनशॅाट काढून

माफ करा, गूगल फोटोज वरून फोटो लिंक होत नव्हते, काही तरी चुकत होते. म्हणून शेवटी लिंक दिली आहे.
आज फ्लिकर वरून लोड करून बघतो.
नाही होत अपलोड लिंक काही तरी चुकत आहे.
परंतु आपल्या प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद.

पक्षी वेगळे करता येत नाहीत.

दुर्गविहारी's picture

23 Feb 2019 - 12:58 pm | दुर्गविहारी

छान उपक्रम. अशी माहिती मि.पा.वर येत रहावी.

नानुअण्णा's picture

23 Feb 2019 - 3:10 pm | नानुअण्णा

हे आधीच्या पाणवठ्याच्या फोटो आहेत, ट्रॅप कॅमेराचे फोटो आहेत.
इंटरनेट एक्सप्लोरर वरून फोटो अपलोड होत आहेत, धन्यवाद.
-
-
-
-
-
-
-
-
-

छान , कौतुकास्पद काम करताय !!!

कंजूस's picture

23 Feb 2019 - 7:09 pm | कंजूस

छान! हे फोटो दिसताहेत.
रानात कुत्रे कसे आले? गावाजवळ आहे वाटतं.
( अभयारण्यात काही करू देत नाहीत. केंद्र / राज्य सरकारची अनुमती मिळत नाही.)

------

गुगल फोटोच्या धाग्यात पाहा कसे पोस्ट करायचे ते.