समाज

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
28 Mar 2020 - 2:56 pm

श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो
श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

संस्कृतीधर्मसमाजविचारसद्भावनामतमाहिती

लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
26 Mar 2020 - 10:33 pm

गेली ३० वर्ष मी घरुन काम करतोयं त्यामुळे जे लिहीलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहातो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते.

समाजप्रकटन

'जाण' आणि 'भान'!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
24 Mar 2020 - 4:56 pm

राजकीय नेत्यांनी कोणत्या प्रसंगी काय बोलावे, संभ्रमात भर पडेल असे बालणे टाळण्याचे भान ठेवावे, ही समज जागी करण्याची गरज आहे. अशा वेळी, वाजपेयी आठवतात!
***

समाजप्रकटन

चला माणसाप्रमाणे वागूया !

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
24 Mar 2020 - 11:42 am

माननीय आणि प्रिय रसिक वाचक ,
*सप्रे* म नमस्कार !
आपण सगळ्यांनी / काहींनी माझे लेख , कविता , स्केचेस , पेंटिंग्ज , अभिनयाच्या व गाण्याच्या clips , गझल्स , पुस्तक वाचलं असेल.पण आज मी एक वेगळ्याच विषयावर हा लेख लिहितो आहे.

समाजलेख

हातावरील पोट

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
22 Mar 2020 - 10:52 pm

तसं पाहिलं तर मिपावरून जवळपास मी रजाच घेतली आहे. माझ्या दोन लेखांवरील काही आक्रस्ताळ्या, मुजोर आणि हीनतेचा तळ गाठणारी एक प्रतिक्रिया यामुळे मी लिहिणं आणि प्रतिसाद देणं थांबविलं आहे. सहसा प्रवाहाविरुध्ध मतं मांडताना अवहेलना हि अपेक्षितच असते. परंतु कधी कधी आब राखणं आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. त्यामुळेच असा निर्णय मी घेतला आहे. आता या लेखाच्या निमित्ताने मी प्रकट होत आहे त्याचे कारणच तितके महत्वाचे आहे.

समाजप्रकटन

कृतघ्न -5

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
22 Mar 2020 - 1:52 pm

याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4:
https://www.misalpav.com/node/46203

आता पुढे

कथाभाषासमाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीआरोग्यविरंगुळा

मास्कमधून

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
22 Mar 2020 - 6:41 am

नाहीत तुला पाय तरी
देशोदेशी जाशील
गावागावा-वस्त्यांमधून
द्वाडासारखा फिरशील

तुझी असंख्य भावंडे
माजवतील हाहाकार
पण घे लक्षात, आमच्यात
आहे शिल्लक प्रतिकार

जितका झपाट्याने तू
पोखरत जाशील आत
तितकीच उसळून उठेल
अशी माणसाची जात

माणूस मारणं कदाचित
असेल सोपं काम रे
पण दाखव जिंकून त्याला
म्हणशील मनात 'राम रे!'

माहिती नसेलच तुला
जगणं-जगवणं कोरोना
बघ बापाला, मास्कमधून
पापी पोराला देताना

संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)

कविता माझीकवितासमाजजीवनमान

स्फुटः आठवणी!

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
17 Mar 2020 - 1:29 am

काही दिवसांपुर्वीची गोष्ट. नुकताच लग्न झालेला एक कलीग. जाम वैतागून, तावातावानं, "आयुष्यात काय काडीचा रस राहिलेला नाही.." असं वगैरे म्हणत, आम्हा सगळ्यांचं डोकं खात बसला होता. डोकं खात बसला होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, कुणी कितीही काहीही सांगितलं तरी याची ऐकायची काही तयारीच नव्हती. थोडक्यात त्याला जागं करणं शक्य नव्हतं! पण [कितीही मदत करायची ईच्छा असली तरी] उगाच ऐकून घ्यायला अन् कचरा डेपो व्हायला कुणाला आवडेल? मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला.. दररोज, हा आला बोलायला, की कुणीतरी मागची एखादी चांगली आठवण काढायची आणि सगळ्यांनी मिळून त्यावर दंगा करायचा!

समाजजीवनमानप्रकटनविचार

उल्लेखनीय प्रथा

Nitin Palkar's picture
Nitin Palkar in जनातलं, मनातलं
16 Mar 2020 - 8:54 pm

गेल्या आठवड्यात एका मित्राच्या मुलाच्या विवाह समारंभात गेलो होतो. नेहमी सारखाच मराठमोळा समारंभ. दोन उल्लेखनीय बाबी आढळल्या.
हॉल मध्ये शिरताना, प्रवेशद्वारापाशी सर्व पाहुण्यांना एक कागदी पिशवी दिली जात होती. ज्या मध्ये बीज गोळ्या (seed balls) होत्या. सीड बॉल म्हणजे उपयुक्त झाडांच्या बिया शेणखत, अथवा तत्सम खातात लपेटून त्याचा तिळगुळा एवढा, थोडासा मोठा केलेला लाडू. आशा प्रकारे त्या बिया सहज रुजू शकतात. यजमान सर्व पाहुण्यांना या बिया शक्य तिथे लावण्याची विनंती करत होते.

समाजप्रकटनविचार

आला रे आला कोरोना आला

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
16 Mar 2020 - 6:06 pm

आला रे आला कोरोना आला

कुठे राहिला तो आंदोलनवाला

दंगली साऱ्या हवेत विरल्या

देश आपसूक शांत झाला

यापूर्वी कधीही असा कुणी

घेतला नव्हता धसका

दंगेखोरांना कोरोनाने येऊन

दाखवलाय चांगलाच हिसका

रस्त्यावर उतरून साले

नाचत होते नंगानाच

कोरोनाच्या भीतीने ठेवलीय

त्यांच्या मानगुटीवर टाच

जीव घेणाऱ्याच्याच आता

पोटात गोळा आला

शांतप्रिय लोकांच्या मात्र

जीवात जीव आला

आला रे आला ,,कोरोना आला

कोरोनाच्या येण्याने मात्र भारत प्रकाशात आला

समाजजीवनमानडावी बाजूदेशांतरराहती जागाव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रण