( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
( प्राचीताई माफ करशील ना ग? )
रूटीनाच्या रेट्यातही
कधी थोडं वेडं व्हावं
दवबिंदूत इवल्या
ओलं ओलंचिंब व्हावं
कानठळी कोलाहली
अंतर्नादी गाणं गावं
प्रमेयाच्या पंखाखाली
व्यत्यासांना विसरावं
चारोळीनं महाकाव्य
पचवून ढेकरावं
धीट शून्यानं शतदा
अनंताला हाकारावं
छप्पर उडून गेल्यानंतर
पाऊस घरात येतो
तोंडचा घास नाहीसा होतो
भणाणता आलेले वादळ
सारं उध्वस्त करीत जातं
वाटेत येईल ते पाडत जातं
मग ते काहीही असो
घर खांब छप्पर झाड माड
आणि मनही.
काळाच्या उंबरठ्यावर
अस्पृश्य सावली हलते.
श्वासांच्या झुळूकेसरशी
प्राणज्योत मिणमिणते.
साऱ्यांच्या अधरांवरती
तुझ्या रूपाची नावे.
हा प्रवास अटळ माझा
नि मागे पडती गावे.
इवल्याशा ज्योतीचा
विझून भडका झाला.
जो इथवर घेऊन आला
तो क्षणात परका झाला.
-कौस्तुभ
फुलपाखरू
एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरू ..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.
फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..
प्रेम..
प्रेम म्हणजे
अथांग सागर
प्रेम म्हणजे
वाळवंटातील मृगजळ
ज्याने तहानलेल्याची
तहान काहीकेल्या
भागत नाही
प्रेम म्हणजे
विश्वास
प्रेम म्हणजे
आपुलकी
जो वेळप्रसंगी
माणुसकीला जागलेच
असे नाही
प्रेम म्हणजे
अटी
प्रेम म्हणजे
बंधन
जे माणसाला
एक माणुस म्हणुन
वागवत नाहीत
मुक्तपणे जगु देत नाही
बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !
मात्र अता "सद्गुरू" म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास
झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
अहोरात्र मी झुरे
काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)
अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!
आणि अश्या वेळी,
चंद्राने लपायला हवं ढगांआड...
अन लपेटून घ्यायला हवं आपण,
भोवतालचं गुलाबी धुकं...
एकमेकांच्या श्वासांमधून
उधळायला हवीत,
प्रितीची गंधफुले...
घट्ट मिटायला हवीत,
डोळ्यांची नक्षत्रं...
टेकवायला हवेत
गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे,
ओठ एकमेकांवर...
आणि मग पहावं,
श्वास रोखले जातात की;
हृदय धडधडायचं थांबतं..?
-कौस्तुभ
राहून गेले..
तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहून गेले
तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहून गेले
तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहून गेले
तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहून गेले
अस्थीर घरांच्या ओळी
नदीच्या हिरव्या काठी.
कुणी धरून बसते ओंजळ
पाऊस पडण्यासाठी.
पाऊस प्राचीन इथला
आकांत केवढा करतो.
नदीच्या पैलतीरावर
काळ जसा गहीवरतो.
काळ उभारून गेला
घरांच्या उदिग्न भिंती.
अशात पाऊसवेळा
आधार कुणाचा स्मरती?
-कौस्तुभ