राजगड -फोटोवारी
नमस्कार मंडळी
डिसेंबरची फुरसत आहे, पण मुलांचे आणि आमचे टाईमटेबल जुळेना, सकाळी हा क्लास, संध्याकाळी तो क्लास असे काय काय. शेवटी आज जाउ, उद्या जाउ करता करता एक दिवस आम्ही म्हातारा-म्हातारी दोघेच जायचे ठरवले आणि सकाळी १०.१५ ला निघालो. बरोबर पोळी भाजीचा डबा आणि भरपुर पाणी असल्याने चिंता नव्हती. गाडी सरळ कात्रज कडे वळवली आणि खेड शिवापुर टोल पार करुन चेलाडी फाट्याला वळलो. बनेश्वर पार करुन साखर,मार्गासनी,केळद,विंझर, मढे घाट असे जुन्या ओळखीचे बोर्ड बघत बघत गुंजवण्यात ११.३० ला पोचलो. गाडी पार्क करुन एक चहा मारला आणि चढाईला सुरुवात केली.