राहुलचे सल्लागार ?? (दिल्ली गुजरात निवडणूक)
बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते. निवडणुकीच्या काळात तर त्यांचा अंगात भूत संचारत असे. अनेक बूथांची व्यवस्था ते जातीने बघत असे. त्यात ते भरपूर कमिशन ही बनवत असे, असे लोक म्हणतात.