मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप
एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले. पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्याची फोडणी. स्वाद चांगला होता. मुगाच्या डाळीत उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो.