विरंगुळा

सनकी भाग ३

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
11 Jan 2020 - 8:08 am

शिवीन ठाकूर म्हणजे एक खूप मोठं नाव होत. शिवीन आणि काया दोन ध्रुवच जणू.शिवीन एक मोठ्या बापाचा मुलगा मुंबईतील सगळ्यात मोठया फॅशन हाऊसचा मालक व नावाजलेल्या फॅशन डिझायनरचा मुलगा. त्याच्या वडिलांचे नाव कुणाल ठाकूर त्यांना केटी म्हणून फॅशनच्या दुनियेत ओळखले जायचे. फॅशन हाऊसचे नाव के.टी. फॅशन हाऊस असे होते.

कथाविरंगुळा

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
11 Jan 2020 - 5:41 am
वाङ्मयविडंबनजीवनमानमौजमजालेखअनुभवआरोग्यविरंगुळा

सनकी भाग २

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
10 Jan 2020 - 9:11 am

काया जयसिंग हे एक गूढ व्यक्तिमत्त्व. गव्हाळ तरी सावळेपणाची झाक असलेला रंग, गोल चेहरा, पिंगट रंगाचे टपोरे गहिरे डोळे, नाक चाफेकळी , खांद्यापर्यंत रूळणारा स्टेप कट, सडपातळ व सुडौल बांधा, एकूण दिसायला आकर्षक अशी काया. सनकी म्हणून कुप्रसिद्ध असलेली.एका नावाजलेल्या फॅशन हाऊसची मालकीण पण हे नाव ,प्रसिद्धी व यश तिला असच मिळाले नव्हते किंवा ती कोणत्या मोठ्या बापाची मुलगी ही नव्हती तर ती इथपर्यंत तिच्या मेहनतीने पोहोचली होती.

कथालेखविरंगुळा

दोसतार - ३२

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
10 Jan 2020 - 7:36 am

डिटेक्टीव्ह घंटाकर्ण बरोबर होता. आम्ही तीघांनीही एकमेकांकडे पाहिले हसलो. हाताची घडी घातली तोंडावर बोट ठेवले. आळी मीळी गुप चिळी करत वर्गाकडे चालू लागलो.

कथाविरंगुळा

सनकी भाग १

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
9 Jan 2020 - 11:17 pm

एक साधारण सत्तावीस -अठ्ठावीस वर्षांची मुलगी मलबार हिलमधील एका पॉश इमारती मध्ये असलेल्या साठाव्या मजल्यावर म्हणजे अगदी इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर लिफ्टने गेली . ती काया फॅशन हाऊस मध्ये शिरली .ती रागाने धुमसत होती.तिच्या हातात कसली तरी बॅग होती .ती पाय आपटत त्या ऑफिसमध्ये गेली व एका तीस वर्षांच्या तरुणाच्या कॅबिनमध्ये घुसली. तिने ब्यागेतून एक ड्रेस काढला व त्या मुलाच्या अंगावर फेकला; तो मुलगा कामात व्यस्त होता .त्या मुळे तो दचकून उभा राहिला तशी ती मुलगी मोठं- मोठ्याने बोलू लागली.
मुलगी ,“ काय हीच का तुमची सर्व्हिस?” तणतणत बोलली.
मुलगा ,“काय झाले मॅडम?”

कथाविरंगुळा

काहीतरी आणि गझल

अजिंक्यराव पाटील's picture
अजिंक्यराव पाटील in जनातलं, मनातलं
9 Jan 2020 - 5:50 pm

"तसं मी आधीच क्लिअर केलं होतं तुला, तरीही तुला का अशी भीती वाटतेय? मला तुझ्या past बद्दल काहीही हरकत नव्हती तेव्हा सुद्धा, आणि आजही नाहीये.. रावी मी तुला तुझा present मागितला होता, आणि future आपलं सोबतच राहिलं असतं याची खात्री होती..

"मग का घेतलेला तू तो gap?"

"कारण तू लहान होतीस, तुझं शिकायचं वय.. मला वाटलेलं तू कमिट केलंय एकदा तर काय पुन्हा पुन्हा insecure feel करत राहायचं. विश्वास होता माझा, स्वतःवर आणि तुझ्यावर"

गझलविरंगुळा

चुलीवरच्या मिसळीची पाककृती

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
9 Jan 2020 - 8:50 am

चुलीवरच्या मिसळीची पाककृती

पाकक्रियाउपहाराचे पदार्थशाकाहारीमौजमजालेखविरंगुळा

दोसतार - ३१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 8:04 am

कौरवांच्या चक्रव्युहात अडकावा तसा तो प्रश्नांच्या गराड्यात अडकला होतात. शाळेत नक्की काय झालंय ते त्याला माहीत होते.
या सगळ्यातून शाळेत वाघ आला होता. तो पाण्याच्या टाकी च्या आसपास फिरताना कोणीतरी पाहिले होते हे समजले .
आमचे चेहरे या वेळेस कोणी पाहिले असते तर त्याला त्यावर भिती आनंद उत्सुकता गम्मत असे सगळे काही नाचताना दिसले असते.

मागील दुवा : http://misalpav.com/node/45852

कथाविरंगुळा

पंखा

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
3 Jan 2020 - 11:34 pm

।। पंखा ।।

एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती!

मुक्तकसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

जगभर संकल्पज्वराच्या साथीचे थैमान, "कोण" चा इशारा

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
2 Jan 2020 - 12:15 am

जागतिक स्वास्थ्य संघटना (कोण) यांनी सूचित केल्याप्रमाणे सध्या जगभर संकल्पज्वराची साथ आलेली आहे.

संघटनेने पत्रक काढून असे जाहीर केले आहे की ही साथ अतिशय वेगाने पसरणारी आणि संसर्गजन्य आहे. विशेषतः आरंभशूर मंडळींना ह्या साथीच्या ज्वराची लागण लगेच होते असे निरीक्षण नोंदवले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कित्येकदा ही लागण सामूहिक असते असे मत व्यक्त केले आहे.

या आजारासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसून फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि साथीची तीव्रता कमी होत जाईल. सामूहिक लागण असेल तर एक एक सदस्य ह्या आजारातून आपोआप बरे होत अंतिमतः केवळ एक किंवा दोन सदस्यांना उपचाराची गरज असेल.

मांडणीविडंबनविचारबातमीविरंगुळा