मुंग्या..
आजकाल टीव्हीवरती मुंग्या येत नसल्याने रामायण-महाभारतामुळे अपेक्षित असलेला नॉस्टॅल्जीक फील म्हणावा तसा येत नाहीये. हल्ली जसं टीव्हीवर काही नसलं तरी सूर्यवंशम असतो तसं त्याकाळी मुंग्या असायच्या. या मुंग्या बऱ्याचदा एखादा कार्यक्रम सुरु असतानासुद्धा यायच्या. सिनेमा रंगात आला असताना म्हणजे हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात टीव्हीवर मुंग्यांचं आगमन व्हायचं.
