३१/१२/२०१९
वेळ:संध्याकाळ
अजून घेणार आहेस
नको, उद्या त्रास होईल
काही नाही होत रे, हाच प्रॉब्लेम असतो तुम्हा कधीतरी करणाऱ्यांचा. फार थोडक्यात आटपता.
अरे काय करू तुझ्या सारखे आम्ही पिढीजात नाही, आमच्या वंशावळीत हे सेवन करणारे आम्ही पहिलेच, त्यामुळं जपून करावं लागत. घरी कळलं तर पिताश्री हाकलून काढतील.
हो यार, पाहिलंय तुझ्या घरात मी. एकदा चुकून नाव काढलं तरी तुझा बाप मी धर्म भ्रष्ट केला असं बघत होता.
जाऊदे आज तुझे बाबा कंपनी द्यायला नाहीयेत?
अरे आई बरोबर गावी गेलेत. नाहीतर दोघांनीही मस्त कंपनी दिली असती. आईला तर फार आवड आहे, बेत आखला कि एकवेळ बाबा नाही म्हणतील पण आई फार हौसेन तयारी करते.
हो यार तुझी आई पाहिजे होती आजच्या पार्टीला. तो खरी दर्दी आहे यात.
जाउदे पुढच्या वेळेस असेल ती. ते जाऊदे पी थोड अजून. पोट साफ होईल एकदम.
काहीही हा, अंधश्रद्धा आहे ती.
म्हणजे इतके लोक पितात ते येडे.
बरं बाबा, दे इकडे पितो अजून.
रस्सा तरी घे, असा धर्मभ्रष्ट करणारा रस्सा काही तुझ्या घरी मिळणार नाही.
तांबडा नको पांढरा वाढ.