मराठी शब्दांच्या सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरण १
मराठी विकिपीडिया आणि त्याचे विकिस्रोत, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पांच्या माध्यमाने इतर भाषातील माहिती आणि ज्ञान मोठ्या प्रमाणात मराठीत अनुवादीत करून आणण्याची क्षमता आहे. यात चपखल आणि सुलभ मराठी शब्दांचा उपयोग व्हावा म्हणून शब्द संग्रहाची मोठीच गरज भासते. इतर ऑनलाईन शब्दकोश उपलब्ध असलेतरी शब्दांच्या सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरण विषयक माहिती आंतरजालावर अपवादानेच उपलब्ध असते.