काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!!
पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी?
काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!
माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार?
पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच!
माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या.
अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा.