माहिती

"यू अ‍ॅटीट्यूड" संकल्पनेकरीता मराठी शब्द हवा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
11 Feb 2014 - 12:59 pm

संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. "you attitude" सुयोग्य चपखल मराठी शब्द हवा आहे.

सोबतच केवळ व्यवस्थापन क्षेत्रातील जमलेतर भारतीय सांस्कृतीक आणि मराठी भाषेच्या भाषिक अंगाने सुद्धा
"you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" संवाद कौशल्य या बाबत अधिक चर्चा करावयाची झाल्यास हरकत नाही.

"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास......

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 10:28 am

मी.पा. च्या दिवाळी अंकामध्ये शिवोssहम यांनी "तालीम" ही खूप चांगली कथा लिहली. एकेकाळी राजाश्रय मिळालेल्या या उपेक्षित कुस्ती प्रकाराबद्दल त्यांनी खूप चांगले लिहून पुन्हा ते सोनेरी क्षण डोळ्यापुढे उभे केले. आजही "महाराष्ट्र केसरी" "हिंद केसरी" या सारख्या स्पर्धा इथे भरतात. यातील "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न !

इतिहासमाहिती

ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 1:31 am

पहिला लेख: Autism.. स्वमग्नता.. http://www.misalpav.com/node/26984

ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

समाजमाहिती

Autism.. स्वमग्नता..

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
10 Feb 2014 - 8:16 pm

तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात  व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून  हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या  मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..

समाजजीवनमानमाहिती

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

सुहास झेले's picture
सुहास झेले in जनातलं, मनातलं
5 Feb 2014 - 3:32 pm

जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता.

इतिहासवाङ्मयप्रकटनविचारअनुभवमाहिती

पंडित भगवानलाल इंद्रजी

राही's picture
राही in जनातलं, मनातलं
4 Feb 2014 - 12:10 am

The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल.

इतिहासलेखमाहिती

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत....!!!

विनोद१८'s picture
विनोद१८ in जनातलं, मनातलं
3 Feb 2014 - 9:39 pm

नमस्कार मिपाकरहो,

श्रीमान मुक्त विहारि यांच्या वनंतीने मी या कट्ट्याचा व्रूत्तांत लिहीत आहे, मिपावर लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. (काही चूक झाल्यास माफ करावे, ही विनंती.)

ठरल्याप्रमाणे हाही कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला, सगळे म्हणजे श्री. व सौ. हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भटक्या खेडवाला, भाते इ. माझ्याअगोदर आले होते आणि मी जरा उशीराच गेलो, स्पा कट्टा संपतांना आले.

मौजमजामाहिती

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
28 Jan 2014 - 8:48 pm

मिपा वरील एक आदरणीय व्यक्तीमत्व (हेमांगी के) सध्या भारतात आल्या असून,
एक,दोन फेब्रूवारीच्या सुमारास त्या डोंबिवलीला आहेत.

नक्की वेळ,तारीख आणि ठिकाण (अर्थात डोंबिवली मधीलच) त्यांना विचारून ३१ ता.च्या सुमारास ठरेल.

पुरुष मंडळींपैकी ज्यांना यायचे असेल, त्यांनी मला व्य.नि. करावा, ही विनंती.

भगिनींनी, अजया ताईंना व्य.नि. करावा.

पुढील रंगतदार कट्यांची घोषणा लवकरच.

मौजमजामाहिती

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
27 Jan 2014 - 3:58 pm

रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :

संस्कृतीइतिहासऔषधोपचारभूगोलछायाचित्रणप्रकटनमाध्यमवेधमाहितीविरंगुळा