माहिती

नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Apr 2014 - 3:54 pm

निर्णय घेणार्‍यास कोणत्याही गोष्टीबाबत यथायोग्य निर्णय घेण्या करता; सामर्थ्य (Strengths) , दुर्बलता (Weaknessess), संधी (Opportunities) आणि जोखीम (Threats) यांबाबत पूर्ण विश्वासार्ह माहिती असणे गरजेचे असतेच.

हार्टब्लीड (Heartbleed) बग; आंतरजालावरील संस्थळावरील पासवर्ड बदलणे; काही शंका

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
12 Apr 2014 - 9:35 am

आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
11 Apr 2014 - 5:25 pm

ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल!

ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

धोरणमांडणीकथासमाजजीवनमानतंत्रराहणीनोकरीविज्ञानअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियामाध्यमवेधशिफारससल्लामाहितीमदतप्रतिभा

आठवणीतील मराठी (इमेल) ग्रूप्स आणि संस्थळे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Apr 2014 - 1:55 pm

खर म्हणजे मागच्याच महिन्यात इंटरनेट चा उदय होऊन पंचविस वर्षे झाली. सर्नचे अभियंता टिम बर्नर-ली यांनी १९९० मध्ये आंतरजालाची सुरुवात केली[१]. सर्न या संस्थेने ३० एप्रील १९९३ पासून आंतरजाल संकल्पना सर्वांना मुक्त केली.[२] सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३] म्हणजे मराठी आंतरजालावर येऊनही जवळपास १८ वर्षे झाली.

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
9 Apr 2014 - 1:48 pm

फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर
अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड,
(मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

संस्कृतीकलाइतिहाससमाजराजकारणप्रकटनआस्वादलेखसल्लामाहितीमदतभाषांतर

भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 5:05 pm

आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

ध्येय(Goals): एक भारत, श्रेष्ठ भारत, सुशासन, सर्वसमावेशक सर्वस्पर्शी व सर्वदेशी विकास

धोरणसमाजजीवनमाननोकरीअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारअभिनंदनप्रतिक्रियामाध्यमवेधबातमीशिफारसमाहिती

एकत्र कुटुंब - काळाची गरज?

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in काथ्याकूट
26 Mar 2014 - 10:53 am

सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा.

तीन गोष्टींवर चर्चा व्हावी

(१) नीतीमूल्ये व संस्कार.

(२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती.

(३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.

सत्ययुग कधी येणार...?

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
21 Mar 2014 - 3:50 pm

चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार.
आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्‍याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...!

ज्योतिषलेखमाहिती

संस्कारनगरी वडोदरा

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
16 Mar 2014 - 7:40 pm

काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख.
संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं.

संस्कृतीइतिहाससाहित्यिकलेखमाहिती