गाभा:
सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा.
तीन गोष्टींवर चर्चा व्हावी
(१) नीतीमूल्ये व संस्कार.
(२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती.
(३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.
प्रतिक्रिया
26 Mar 2014 - 11:04 am | ऋषिकेश
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर एकत्र कुटुंबसंस्था ही २०-३० वर्षांपूर्वीच मोडून पडलेली व्यवस्था आहे. आता आर्थिक नाईलाजास्तव काही कुटुंबे पूर्वीसारखी १०-१२ व्यक्तींच्या संख्येने राहतही असतील परंतु हल्ली ४ ते ६ ही सामान्यतः कुटुंबांची कमाल सदस्यसंख्या आहे.
राष्ट्रीय स्तरावर विविध प्रदेशाच्या भौगोलिक व आर्थिक निकषांवर कुटुंबे एकत्र वा विभक्त असणे अधिक फायद्याचे हे बदलत असते. निव्वळ भावनात्मक बंधनाने एकत्र कुटुंबे टिकु शकत नाहीत.
26 Mar 2014 - 11:08 am | नानासाहेब नेफळे
चांगला विषय आहे, परंतु एकत्र कुंटुंबात प्रायव्हसी काँम्प्रमाईज करावी लागते, जे आजच्या लोकांना नकोय
चार भावातले दोघे बांडगुळी वृत्तीचे असतात
एकाची तरी बायको कजाग असते
मुलं मोठी झाली ,आई बाप म्हातारे झाले की कटकटी सुरु होतात व शेवटी कुटुंब विभक्त होतात.
पुर्वी एकत्र कुटुंबं शक्य असायची कारण घराचे आकारमान मोठे असायचे ,दहा खोल्या ,चार दिशेला चार दरवाजे, आंगण, पडवी ,शेतातले घर नी काय नी काय ...
आता 3 BHK घेतला तरी अशी एकत्र राहुनही काही प्रमाणात विभक्तीचा फील देणारी व्यवस्था राहिलेली नाही.
26 Mar 2014 - 11:11 am | मंदार दिलीप जोशी
आमच्या हापिसातला एक जण एका वास्तूशांतीला जाऊन आला. त्यांनी दोन ३ BHK एकत्र करुन एक फ्लॅट केला आहे. म्हणजे राहणे वेगळेच पण एक स्वयंपाकघर आणि इतर खर्च एकत्र. तपशील कळले नाहीत पण आयडिया सॉलिड वाटते.
26 Mar 2014 - 11:19 am | आयुर्हित
१) नीतीमूल्ये व संस्कार:- यासाठी आजकाल प्रसार माध्यमे (वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, इतर खाजगी वाहिन्या),आपण शहरात ज्या सहकारी गृहसंस्थेत राहतो व ज्या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवितो यावरच सारे काही अवलंबून आहे.
२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती: यात जो मनुष्य शेतात राब राब राबतो, तोच मागे राहतो.इतर बांधव जे गाव सोडून इतर खेड्यात व शहरात येतात व स्थाईक होतात ते काळाच्या ओघात पुढे जातात.
३) वाढत्या किंमती(आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव): यासाठी किंवा इतर कारणांसाठी मराठी माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहूच शकत नाहीत. कारण मराठी माणसांना व्यवहारी राहता येत नाही.
४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे)
पण हे सर्व फायदे घ्यायचे असतील तर कोणत्याही मोहात न पडता, आपण आपला आवडीचा मार्ग शोधणे व त्यानुसार स्वत: पुढे जाणे व इतरांना त्यांनी निवडलेल्या मार्गावर प्रगतीसाठी मदत करणे हेच होय!
त्यासोबत उत्पन्न वाढविण्याचे आधुनिक मार्ग शोधणे व भरपूर बचत/गुंतवणूक करून आपले भवितव्य उज्ज्वल बनविणे.
26 Mar 2014 - 12:26 pm | दिव्यश्री
४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे)>>> +++++++++++++++++++++++++++++ १
हल्ली लांब /दूर राहूनच संबंध चांगले राहतात . रोज रोज भांड्याला भांड लागल तर स्वतःचे सगळ्यात जास्त नुकसान आपण करून घेत्तो . *DASH* पूर्वीच्या सगळ्याच गोष्टी आताच्या काळात तेवढ्याच मोलाच्या आहेत / असतील हि अपेक्षा ठेवू नये . काळाप्रमाणे बदलावे लागतेच नाहीतर आपणच मागे राहतो .जुने ते सोने म्हणताना सगळे हे विसरतात कि प्रत्येक गोष्ट कधीनाकधी नवीनच असते कालांतराने ती जुनी होते .
बाकी शेतजमीनच नाही त्यामुळे मौन .
मराठी माणसेच आपल्या माणसांचे पाय ओढतात . स्वतःच्या सख्ख्या भावंडांची प्रगती बर्याच लोकांना सहन होत नाही . मोठ्या गप्पा मारायला असे लोक कायम तयार असतात . अर्थातच यालाही अपवाद आहेतच . आर्थिक फायद्यांपेक्षा मानसिक स्वाथ्य जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते . पूर्वी किती लोकांना मधुमेह , हृदयरोग आणि बाकीचे आजार / व्याधी तिशीत /चाळीशीत होत ? एकत्र कुटुंबात सगळ्यात जास्त मानसिक कुचंबना तरुण पिढीची होते . काही झाल कि सगळेच संस्काराचे सूर आळवायला तयार असतात . पुरुषांचे जास्तच हाल होतात एकीकडे आई दुसरीकडे बायको . :( बर्याच वेळा एक बाजू बरोबर असते मग हळू हळू वाद , भांडणे यांचे रुपांतर संघर्षात होते . संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वाथ्य जर जपायचे असेल तर एकत्र कुटुंब पद्धतीचा आग्रह / हट्ट सध्याच्या काळात धरू /करू नये असे मला वाटते .
26 Mar 2014 - 1:14 pm | मंदार दिलीप जोशी
मते वाचनीय..
एकंदर ज्यामच कठीण आहे असे दिसते. तोटेच जास्त आहेत असे वाटते.
26 Mar 2014 - 11:26 am | अनुप ढेरे
हे दोन लेख वाचनात आले अलिकडे.
http://www.theguardian.com/society/2014/mar/24/dependent-generation-half...
आणि
http://www.theguardian.com/money/2014/jan/21/record-levels-young-adults-...
त्यात पण मुख्य कारण घरांच्या वाढत्या किमती आणि बेरोजगारी आहे असा निष्कर्ष काढला आहे.
26 Mar 2014 - 1:16 pm | आयुर्हित
हे दोन्ही लेख युरोपची सध्य परिस्थिती वर्णन करत आहेत,ज्यात सध्या युरोपात स्लो-डाऊन/रिसेशन आहे.
26 Mar 2014 - 11:37 am | नानासाहेब नेफळे
नितीमुल्ये आणि संस्कार हे पुर्वी वडीलधार्यांच्या धाकाने व्हायचे, माझा एक मित्र एकत्र कुटुंबात राहायचा ,त्याला वडीलांपेक्षा काकांची जास्त भीती वाटायची, दोन पालकांऐवजी सहा सात पालक असायचे, त्यामुळे मुलं कायम धाकात असायची.
गटशेती- आता लोकसंख्येमुळे शेतकरी अल्पभूधारक झाला आहे, पाच एकराचे शेत तीन भाउ कशाला करतील? एकजण ते बघेल दुसर्यांकडे इतर कामाशिवाय पर्याय नाही..
वाढत्या किमती एकत्र कुटुंबात फारतर दहा टक्क्यांनी कमी होतील
तुर्तास' गेले ते दीन गेले 'आळवत बसण्याशिवाय पर्याय नाही...
26 Mar 2014 - 12:46 pm | बॅटमॅन
एकत्र कुटुंब सध्याच्या काळात तरी इम्प्रॅक्टिकल आहे.
एखादे कुटुंब अधून मधून तसे पहावयास मिळते, पण ते अगदी अपवादभूत आहे.
एकत्र कुटुंबात खेकडावृत्ती पॉलिटिक्स प्रचंड चालते. अन त्यात फक्त बायकाच असतात असे नाही-पुरुष, बैका सगळे २४*७ तो कुरघोडीचा गेम खेळत असतात. ते पॉलिटिक्स मग भावंडांपर्यंत झिरपते अन भावंडांतील हागरीपादरी भांडणेही नंतर कौटुंबिक महाभारतात रूपांतरित होतात. त्यात परत कुटुंबप्रमुखाचा फेव्हरीट जो असेल त्याला इंप्युनिटी मिळते अन दीडदमडीचा वकूब नसलेले फालतूचा फॉर्म करतात. त्यात परत मुलगाच पायजे इ.इ. हट्ट धरणारे असतील तर संपलंच. अशा घरात चुकूनमाकून मुलगी पैदा झाली तर तिचे हाल कुत्रा खात नै.
त्यामुळे दूर राहूनच गोडी दाखवलेले बरे असते. एकत्र कुटुंबाचे तसे फायदेही असतात, नै असं नै-पण तोटे फारच वैट्ट. शेवटी प्रायव्हसी अन स्वातंत्र्य जपावयाचे तर विभक्त राहिलेलेच बरे असते. जिथे सकाळी भाजी कुठली करावी आणि कुणाला रागवावे इथपर्यंत भांडाभांडी अन रेग्युलेशन चालते तिथे कसलं बोडख्याचं आलंय प्रेम?????
असो. सिलेक्शन बायस प्रत्येकाचा असतो तसाच माझाही आहे. पण ही बाजू मांडणे आवश्यक वाटले (अजून कुणी मांडली नाही असे नै, पण तरी..) म्हणून लिहिले.
26 Mar 2014 - 1:14 pm | मंदार दिलीप जोशी
मते वाचनीय..
एकंदर ज्यामच कठीण आहे असे दिसते. तोटेच जास्त आहेत असे वाटते.
26 Mar 2014 - 2:03 pm | प्रकाश घाटपांडे
यकदम बरुब्बर हाये.
हित नवरबायको ने यकमेकाच व्यक्तिस्वातंत्र्य जपत सहजीवन जगायच म्हंजीच तारेवरची कसरत हाय तिथ यवढ्या मोठ्या बारदानात कस काय जमनार?
सध्या म्हन्ल तर यकत्र म्हन्ल तर शेपरेट असा मोड यकदम भारी हाये. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर युती.
26 Mar 2014 - 2:09 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!
26 Mar 2014 - 2:17 pm | नानासाहेब नेफळे
कॉमन प्रोग्रॅम मंजै काय .. दिवाली पाडवा एकत्र, विवाह श्राद्धादी संस्कार, कुणाची साक्षसुपारी... बाकीचा सगला शेपरेट पोग्राम असतोय.
26 Mar 2014 - 1:43 pm | नितिन थत्ते
एकत्र कुटुंब असणे नसणे हा आर्थिक निर्णय असतो.
26 Mar 2014 - 2:15 pm | अनुप ढेरे
समजा वडील आणि मुलं दोघही आर्थिकदृष्ट्य्या भक्कम असतील तर ते एकत्र रहात नाहीत असं म्हणायचं आहे का?
26 Mar 2014 - 2:34 pm | दिव्यश्री
दुर्दैवाने हो ...या प्रश्नाचे उत्तर हो असेच आहे . असंख्य उदाहरणे आजूबाजूला आहेत . त्यातील एक सांगते . अतिशय संपन्न , आर्थिक दृष्ट्या अस एक कुटुंब आहे . दोन मुले ...दोन्ही वेगळे राहतात . कर्तव्य सगळी पार पाडतात पण आम्ही एकत्र राहू शकत नाही अस सरळ म्हणतात . याला कारण त्यांच्या आई वडिलांनी अतिशय विचित्र पणे वागणे हे आहे . आमचे स्वतःचे ३ बिएचके घर आहे , पेन्शन आहे , आम्ही धडधाकट आहोत आम्हला कोणाचीही गरज नाही ई. असंख्य कारणे आहेत . जी आता सगळ्यांना तोंडपाठ आहेत . एक मुलगा कामानिमित्त परदेशात असताना बायकांची काहीतरी कारणाने वादावादी झाली तर सासर्यांनी रात्री सुनाबाईना अकराच्या दरम्यान अक्षरशः घराबाहेर काढले हे पहिले आहे. :( तरी देखील तो मुलगा आणि सून सासूसासर्यांची काळजी घेतात .
शेवटी घरोघरी गेसच्या शेगड्या . हल्लीचा काळच असा आहे कि पोटचा मुलगा आईबापाला जड होतो पण मुलं-सुना कर्तव्य म्हणून का होयीना काही गोष्टी करतात त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे .
26 Mar 2014 - 2:36 pm | बॅटमॅन
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत.
26 Mar 2014 - 2:59 pm | दिव्यश्री
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत. >>> हो माहिती आहे . सध्या एक धाग्यावर त्याची चर्चा चालू आहे . यातील मुलीची बाजू कायम आईबापच घेतात ती सासुरवाशीण आहे , तीच्यावर आता अधिकार नाही ई . फक्त तिला माहेरपणाला बोलावणे आणि परस्पर पैसे देणे (मुलाच्या कष्टाचे, जो मुलगा रक्ताचं पाणी करून घाम गळून पैसे कमावतो) ,मुलाचे -सुनेचे खोटे नाटे गाऱ्हाणे सांगणे , सगळ्या नातलगात स्वतःच्या मुलाचीच धिंड काढणे आणि बरेच खालच्या पातळीला जाऊन वागणे असे असंख्य पदर /बाजू याला आहेत . स्वतःच्या आईबापाची लाज जाऊ नये म्हणून मुलगा हे सगळ सहन करतो आणि त्यांना हे माहिती असल्यामुळे भावनिक छळ/ छलकपट हा चालूच राहतो . :(
पूर्वापार हेच फक्त लोकांसमोर आल आहे . नाण्याची दुसरी बाजू नाहीच असे नाही ना. स्वतःच्या मुला आणि मुलीमध्ये भेदभाव करणारे असंख्य पालक आहेत . मुलगी किती गरीब ,बिचारी ई . म्हणून मुलाने आईबापाला पाठवलेले पैसे परस्पर मुलीच्या तिजोरीत , पर्समध्ये जातात . बिच्यार्याला मुलाला याची पुसटशी शंकाही येत नाही . आईवडील हे देवच असावेत , देव कधीही भेदभाव करत नाही . देवतुल्य आई माझी देवतुल्य बाबा हे म्हणायला फार नशीबवान असाव लागत आणि मी अतिशय नशीबवान आहे . :)
26 Mar 2014 - 3:02 pm | बॅटमॅन
सहमत आहे हे वेगळे सांगणे न लगे....
बाकी आईवडिलांच्या बाबतीत आम्हीही अतिशय नशीबवान हाओत.
26 Mar 2014 - 3:13 pm | दिव्यश्री
बाकी आईवडिलांच्या बाबतीत आम्हीही अतिशय नशीबवान हाओत. >>>इस बात पे हाथ मिलाये ...आपले नशीब चांगले म्हणून असे आईवडील आपल्याला लाभले . त्यांना त्याची जाणीवही नसते कि ते आपल्यासाठी काय आहेत . यातच त्याचं मोठेपण / महानता सामावली आहे . माझ एकच मागण आहे देवाला जर पुढचा जन्म( या जन्मीची पाप जर याच जन्मी नाही फिटली तर ;) :P ) असेल तर मला हेच आईवडील हवे आहेत . या साठी मी पुण्याची पुंण्याची( पुण्याची / पुणे शहराची नाही *beee* ) कामे करत आहे . कमीत कमी ते तरी उपयोगी येवो म्हंजे झाल . :D
26 Mar 2014 - 3:42 pm | मंदार दिलीप जोशी
सेम हिअर
29 Mar 2014 - 12:50 am | हाडक्या
ते ठीक आहे हो.. पण ज्या मुलींना त्यांचे आई वडील (पैसे अथवा इतर स्वरूपात) मदत करत असतील, त्यांना पण असेच (हेच आई-वडील पुढील जन्मी मिळो वगैरे) वाटत असणार की..
(संपादित)
1 Apr 2014 - 2:08 pm | दिव्यश्री
बरोबरच आहेच तुमच फक्त त्यासाठी (मदतीसाठी ) ते (मुलीचे आईवडील ) हयात /जिवंत असले पाहिजे ना ...अजून काही शंका - कुशंका ? कोणालाही ??
(संपादित)
1 Apr 2014 - 2:11 pm | बॅटमॅन
अगदी सहमत आहे, फक्त हाच विवेक कुणी एक बाई गोरी नसून सावळी आहे म्हणून तिच्या सौंदर्याबद्दल रेसिस्टपणे नापसंती दर्शवताना जागृत ठेवला असता तर अजून बरं झालं असतं, नै? की ते चालतं?
1 Apr 2014 - 2:15 pm | दिव्यश्री
आलेच :) ...आपलीच वाट बघते होते . यालाच म्हणत असावेत वड्याच..वांग्यावर ... नाही का ? याच उत्तर तिथेच मिळेल जिथे हा प्रश्न विचारण्यात आला पहिल्यांदा .
1 Apr 2014 - 2:20 pm | बॅटमॅन
उत्तर द्यायचं तर द्या नैतर नका देऊ. बाकी काही असलं तरी या निमित्ताने तुमची दुटप्पी विचारपद्धती कळून आली त्याबद्दल धन्यवाद :)
1 Apr 2014 - 2:31 pm | दिव्यश्री
जरा बघा कि ओ मूळ धागा ...मगच बोला.
1 Apr 2014 - 2:36 pm | बॅटमॅन
तिकडेही उत्तर दिलेय ओ रेसिस्ट बै. जरा मिपा रिफ्रेशवण्याचे कष्ट घ्यावेत.
1 Apr 2014 - 2:38 pm | पैसा
परत हिब्रु व्हर्सेस तामिळ काय?
3 Apr 2014 - 1:59 pm | इरसाल
ते ग्रीक विरुध्ध सौंदिडियन हय.
1 Apr 2014 - 2:15 pm | आत्मशून्य
हीच आकाशाकडे प्रार्थना.
1 Apr 2014 - 2:17 pm | आत्मशून्य
तुम्हाला शामची आइ हे पुस्तक भेट म्हणून मिळुदे हीच आकाशाकडे प्रार्थना असे वाचावे.
26 Mar 2014 - 2:45 pm | नितिन थत्ते
हो.
म्हणजे एकत्र कुटुंब असलेल्या बहुतांश ठिकाणी आर्थिक भक्कमपणा नसण्याची शक्यता खूप जास्त असते. [अतिवार्धक्य/आजारपण वगैरे कारणांनी एकत्र राहणे वेगळे].
आर्थिक बाजू ठीकठाकच असेल (कैच्या कै भक्कम नसेल) तर एकत्र कुटुंबाचे इकॉनॉमी ऑफ स्केलचे फायदे घेण्यासाठी एकत्र राहण्याचा पर्याय कधीकधी स्वीकारला जात असावा.
26 Mar 2014 - 4:47 pm | नगरीनिरंजन
१००% सहमत!
आणि आर्थिक परिस्थितीच्या मुळाशी अतिरिक्त ऊर्जा आहे. जोवर ऊर्जेवर चालणारे यांत्रिक गुलाम दिमतीला आहेत तोवर लोकांची गरज नाही. फक्त त्या यांत्रिक गुलामांचा खर्च उचलणारा जोडीदार असला म्हणजे झाले.
26 Mar 2014 - 1:56 pm | गणपा
टिव्हीवरच्या कौटुंबीक मालिकांची संख्या पहाता एकत्र कुटुंब पद्धतीला इतक्यात मरण नाही असे वाटते.
26 Mar 2014 - 2:18 pm | दिव्यश्री
हा हा हा ...ह्या ह्या ... ;) :D
26 Mar 2014 - 3:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
तसे नाहि हो गणपाभौ
ते एकत्र कुटुंब आता फक्त मालिकांमध्येच राहिलेय, प्रत्यक्षात शक्य नाहिये
28 Mar 2014 - 4:19 pm | स्मिता चौगुले
आणि या आशा मालिकांमधुन दा़खवले जाणारे प्रसंग म्हणजे अबब...
किती अवास्तव, घरातली सून जी एकाच वेळी नौकरी करते, घर सांभाळते, अगदी सगळी कामे करून घरातल्या ज्येष्ठांचे सेवा करुन, ऑफिसमध्ये देखिल आघाडीवर , वर ती पुढचे शिक्षण ही घेत असते बरंका महाराजा.
मग ते घरातले कितिही वाईट वागोत ही बयो सगळ्याचे चांगलेच चिंतत असते, त्यांच्यावर आलेली संकट निवारण्याचे आद्य कर्तव्यपण हिच पूर्ण करत असते.
परंतू या अशा मालिका पहाणारा वर्ग हा मुख्यतः घरातील ज्येष्ठ मंडळी असल्याने आपसूकच ते त्या सिरीयलिच्या सूनेला आपल्या सुनेशी रिलेट करुन आवाजवी अपेक्षा ठेवायला लागतात.तिथेच पहिली ठिणगी पडते त्या एकत्र कुटूंब पध्द्तीला आणि त्या ठिणगीचा सुरुंग होतो.
याला दुसरी बाजूही आहे, लग्नाळू मुली त्या राजश्री प्रोडक्षण छाप चित्रपट पाहूण सगळ गोडुल गोडूल होईल अशा स्वप्नात असतात. पण त्या चित्रपट छाप सासू-सासरे मिळण (बहू नही बेटी टाइप डायलॉग) हे कठिण असते, हजारात एखादी तशी भाग्यवान असते, प्रत्यक्षात सासूही सासूच असते हे मान्य करायला तयार होत नाहीत आणि लग्नानंतरच्या काही दिवसात जेंव्हा ही जाणिव होते तेंव्हा हळूहळू कुरबुरी सुरु होतात आणि असह्य होवून एक दिवशी स्पोट, वेगळे राहणे..
26 Mar 2014 - 7:09 pm | अनन्न्या
मी त्या कुटुंबाचा एक घटक आहे. काही फायदे काही तोटे दोन्हीकडे आहेत. मी माझ्या मुलाला ठेवून कुठेही कधीही जाऊ शकते. कामांची वाटणी होते. माझा मुलगा बालवाडीत असताना त्याने एकूण भावंडे ५ आणि भावंडातील क्र्मांक चौथा असे सांगितले होते, म्हणजेच मुलांना एकटेपणा जाणवत नाही. कठीण प्रसंगी मनुष्यबळ कमी पडत नाही. घरातील वडीलधाय्रा माणसांना सांभाळणे, दवाखाने या गोष्टी परस्पर सहकार्याने होतात. बरेच खर्च कमी होतात.
यामध्ये आर्थिक बाबी फार परीणाम करतात, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींच्या उत्पन्नातील फरक, प्रत्येकाची समजून घेण्याची वृत्ती, कामाची जबाबदारी उचलण्याची प्रत्येक सदस्याची तयारी या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात.
कोणताच माणूस परीपूर्ण नसतो, भांड्याला भांडे लागतेच, ते तसे लागलेच पाहिजे, फक्त भांडण झाल्यावर ते विसरून प्रत्येकानेच दुसय्राशी बोलण्याची तयारी ठेवली तर बरेच कलह टळतात. निर्णय घेताना सर्वानुमते घेणे ही कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते.
सोळा वर्ष झाली मला या एकत्र कुटुंबात राहून..काही गोष्टी खटकतात पण एकदा मला एकत्र रहायचे आहे हे नक्की झाल्यावर होते सुरळीत सगळे.....अजून तरी सासू सासरे आणि त्यांच्या तिन्ही मुलांचे परीवार एकत्र आहेत.
27 Mar 2014 - 4:58 pm | प्रसाद१९७१
नुस्ते तोट्याचे च आहे असे नाही, माझ्या मते मुर्खपणाचे आहे एकत्र कुटुंब. त्याला थोडासा गुलामगिरीचा पण वास येतो मला. १-२ लोक सत्ताधीश आणि बाकिच्यांची किंम्मत नोकरा सारखी
28 Mar 2014 - 4:27 pm | स्मिता चौगुले
१००% मान्य. हे असे घडताना पाहीले आहे.सगळे सासूच्या हाती, घरात सासर्यांचे वर्चस्व. अगदी स्वतःच्या मर्जीने त्या सुनांनी स्वयपाकात एखादा पदार्थही करायाचा नाही. कितीही कुचंबना!!
1 Apr 2014 - 2:17 pm | आनन्दा
तुमची एकत्र कुटुंबपद्धतीची व्याख्या चुकलीय असे वाटते.. तुम्हाला बहुधा सिरीयल्स मध्ये दाखवतात तसे एकत्र कुटुंब वाटत असावे.
27 Mar 2014 - 5:23 pm | शिद
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे?
२. बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे?
३. त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे व बायकोचे म्हणणे ऐकुन वेगळी चुल मांडावी?
४. एकुलत्या एका नातु/नाती बरोबर खेळण्या-बागडण्यापासून आजी-आजोबांना वंचित ठेवावे?
५. मग ह्यात आपला स्वःत चा स्वार्थ नाही का?
27 Mar 2014 - 5:30 pm | प्रसाद१९७१
मी प्रतिसाद देताना एकत्र कुटुंब म्हणजे पहिली पीढी, दुसर्या पिढीतले २, ३ भाऊ आणि त्यांच्या बायका. तिसर्या पिढीतली मुले असे धरले होते. एकुलत्या एक मुलानी एकत्र रहावे कींवा घर जवळ घ्यावे. तब्येत ठीक असे पर्यंत शक्यतो एकत्र राहू नये. थोडे दुर पण गोडीत रहावे.
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे?
मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी.
27 Mar 2014 - 5:42 pm | शिद
धन्यवाद, आपण ३ प्रश्नांची उत्तरे दिलीत त्याबद्दल.
अर्थातच सगळी मते पटलीच असे नाही पण तुमच्या मताचा आदर आहे...असो.
27 Mar 2014 - 7:14 pm | दिव्यश्री
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे? >>>
मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी. >>> प्रचंड सहमत .
मला खर्च काळात नाही नेहमी बायकांनाच का बर इतक नीच पातळीवर गेल्याच दाखवतात ? काय वायीट आहे वेगळ राहण्यात ? वेगळं निघाल कि सुनेने मुलाला तोडलं , हिला झाल्यावर बघू ई. पासून सुरवात होते शिनेर लोकांची ते का नाही कोणी कधी बोलत बर ? काही झाल कि बायकांवर सगळे दोष देऊन रिकामे होतात . स्वतःच्या आईबापाला मुलगाच जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो . सून म्हणजे खरतर प्रत्येकच तोंडीलावानच असते . आईबापाचा राग कुणावर तर बायकोवर ... मुलाचा राग , नातवांचा राग , कोणाचाही राग काढण्याची एकमेव व्यक्ती तीही हक्काची , सो कौल्ल्ड संस्कृतीने यांना बहाल केली आहे .तिचे आईवडील बिचारे लग्नात तिच्यावर पाणी सोडतात अक्षरशः . कन्यादानाच्या नावाने . काय वाटत असेल तेंव्हा त्या दोघांना . पोटाचा गोळा अशा लोकंच्या हातात देताना .
आणि जर मुलगी एकुलती एक असेल तर हो ? साहजिक आहे याच कोणालाही काहीही देण घेण नसत . तरी काही नशीबवान असतात ज्यांना खर जावई मुलासारखा मिळतो .
मुल जन्माला घालतानाच हा स्वार्थी विचार असतो कि म्हातारपणाची काठी . बाकी सगळेच पालक काही त्याग बिग करत नाही .
नियमाप्रमाणे यालाही अपवाद आहेतच .
जर वेगळ राहूनही मुलगा सून सगळी कर्तव्य पार पडत असतील तर वेगळा राहण्यात काहीही वायीट नाही अस माझ स्पष्ट मत आहे . शिनेर लोकांच स्वतःच आयुष्य मनाप्रमाणे जागून झालेलं असत आपल अजून कुठल्या कुठे जायचं आहे . असो . शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे .
27 Mar 2014 - 8:14 pm | रेवती
सो कौल्ल्ड
अल्हाददायक शब्द! गारीग्गार!
28 Mar 2014 - 12:50 pm | पिलीयन रायडर
सगळं पटलय!!
मला एक कळत नाही.. लग्न झालं की नवरे बायकोच्या हातात जातात / तिनी सांगितलं म्हणुन आई बापांना सांभाळत नाहीत वगैरे कसं काय म्हणु शकतात लोक..
१. जर २५ दिवसात बायकोच्या आहारी मुलगा जात असेल तर चुक कुणाची? जन्मापासुन २५ वर्ष स्वतःच्या मुलाला "संस्कार" देऊनही तेवढं घट्ट नातं न तयार करु शकणार्या आई-बापाची , की आईबापाचा विचार न करणार्या मुलाची की अगदी काहीच दिवसांपुर्वी घरात येणार्या बायकोची?.. चला असं समजु की बायको अगदी व्हॅम्प आहे.. अरे पण तुम्ही तिचं ऐकायला काय कुक्कुलं बाळ आहात का? उलट असे पुरुष जे बायकोचं कारण देतात ते खरं तर बायकोच्या खांद्यावर बंदुक ठेवुन निशाणा साधत असतात.. प्रायव्ह्सी कुणाला नको असते? फक्त ती बायकोचं कारण दाखवुन मिळवु नका.. काय ते स्पष्ट बोला.. की बाबा राहु देत आम्हाला काही वर्ष एकटं.. तुम्हाला गरज पडली की आहोतच आम्ही..
२. आजकाल सगळ्याच बायका कमावतात.. अशा वेळी जी व्यक्ती घरात पैसा आणते तिच्या हातात सत्ता जाणार हे निश्चित.. पण जनरली सासु-सासर्यांना हे सत्तांतर अवघड जातं.. सुन कमावणारी तर हवी पण निर्णय आमच्या हातात, मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाहि असं होऊ शकत नाही.. त्यातुन जास्त वाद उद्भवण्या पेक्षा दोन घरात आपापली सत्ता चालवणे इष्ट..
३. आई वडीलांना म्हातारपणी सांभाळणं हे मुलगा मुलगी दोघांचेही कर्तव्य आहे.. भले त्यांनी आपल्याला म्हातारपणाची काठि समजो वा न समजो.. समजलं तरी मला त्यात अगदीच गैर वाटत नाही.. त्यांनी लहानपणी आपल्या साठी खुप काही केललं असतं.. आपण त्यांच्या पडत्या काळात त्या सगळ्याची परतफेड करायलाच हवी.. कारण जर आपण सांभाळणार नसु (रादर मुलं आई बापाला सांभाळणार नसतील..) तर त्यापेक्षा पोरं बाळं जन्माला न घालता आहे तो पैसा उडवत दोघांनीच मस्त रहाणं कुणीही पसंत करेल.. करण तसंही म्हातारपणी एकटंच रहायचं आहे..माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग?
४. मुलगी पण आई वडीलांना सोडूनच रहाते.. तेव्हा हा बाऊ होत नाही.. मग तेव्हा कुणी आम्हाला ऐवत नाही की "नवरा आला की आईबापाला विसरली".. रादर आम्ही तसं करणंच अपेक्षित आहे.. मग मुलाचे आई वडील दुसर्या घरात राहिले तर त्यात एवढं काय बिघडलं? एकाच शहरात मी माझ्या आई बाबांपासुन वेगळ्या घरात रहाते.. आणि सगळ्यांनाच ते बरोबर वाटतं.. पण मी माझ्या सासरी जाउन वेगळं बिर्हाड थाटलं तर किती गजहब होईल? माझे सासु सासरे आमच्या कडे राहिले तर ते ओके.. पण उद्या माझे आई वडील आले तर त्याची चर्चा होणार हे निश्चित..
मी काल परवाच एका ६०-६५ वर्षांच्या काकांशी बोलत होते.. त्यांनी मला अगदी आवर्जुन सांगितलं की माझी सासु पण माझ्या कडेच असते.. त्याम्ची आई सुद्धा असते.. पण ते तर नियमाला धरुनच आहे ना.. सासुला सांभाळतो म्ह्णजे किती ग्रेट..!!
28 Mar 2014 - 4:36 pm | स्मिता चौगुले
पिलीयन रायडर, विचार आवडले आपले.
28 Mar 2014 - 5:00 pm | दिव्यश्री
माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>>तेच ना पोटाच्या मुलांकडून हि रिटर्न्सची अपेक्षा . मग निरपेक्ष प्रेम हे फक्त काही दिवसांनी शिरेली , शिनेमे , नाटकं आणि कथा कादंबर्यातच सापडेल .
त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>> काहीच नाही . फक्त आई वडील जे कर्तव्य म्हणून करतात त्याची टिमकी वाजवणे चूकच आहे .तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच कर्तव्य केल आहे . तो त्याच कर्तव्य करेल .संपला विषय . कष्टात आणि त्यागातही स्वार्थच असतो बरेच वेळा . कष्ट आणि त्याग करून मुलांना वाढवायचं कारणच हे आहे कि म्हातारपणी ते सांभाळतील .
किती आजीआजोबा नातवंडाना प्रेमाने , न कटकट करता सांभाळतात . कधी न कधी ते सुनेला ऐकवतातच कि तुमच्या मुलांसाठी आम्ही काय काय केल . गंमत म्हणजे सुनेला नातवंडासाठी टोमणे मारणारे , छळणारे लोक नंतर त्याच नातवंडला वैतागतात .
पुन्हा अपवाद असतातच .
28 Mar 2014 - 5:14 pm | पिलीयन रायडर
अगं पण मग मुलाचं कर्तव्य काय? म्हणजे तुझी आई वडीलांकडुन जे काही मुलासाठी होतं ते निरपेक्ष असावं अशी अपेक्षा आहे.. त्यांनी जे मुलासाठी केलं ते नुसतं कर्तव्य आहे.. पण मुलाचं काहीच कर्तव्य नाही का? मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. मुलं जर हक्कानी प्रॉपर्टीसाठी भांडणार असतील तर तेवढयाच हक्कानी आईवडीलांना सांभाळण्यासाठी पण भांडावं..
ते कथा कादंबर्यातच असतं.. माणुस स्वतःवरच सर्वात जास्त प्रेम करतो..
28 Mar 2014 - 6:52 pm | दिव्यश्री
मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. >>> तेच कि ओ ताई सगळी कर्तव्य पार पडण्याची आणि निरपेक्ष प्रेमाची अपेक्षा हि फक्त मुलाकडूनच .
मुलाच कर्तव्य म्हणजे आईवडिलांना सांभाळणे तेही व्यवस्थित( यात आर्थिक , मानसिक आणि शाररीक आणि अजून तुम्हाला जे अपेक्षित असेल ते घाला ) जर वेगळ राहून हि तो ते करत असेल तर का बाकीच्यांचा विरोध का ?
प्रॉपर्टी जर असेल तर आधीच व्यवस्थित हिस्से / भागीदार्या करण तेही भेदभाव ण करता , तसं मृत्युपत्र वेळच्या वेळीच करण हे हि आई वडिलांचं आद्य कर्तव्य मानल जावं.
28 Mar 2014 - 7:04 pm | पिलीयन रायडर
वेगळं रहाण्याबद्दल आपलं दुमत नाहीच्चे ताई..
मुद्दा इतकाच की आई वडीलांची मुलांकडुन अपेक्षा अजिबात चुकीची नाही.. एवढंच...
1 Apr 2014 - 12:55 pm | चिगो
भारीबाई, तुमच्या मुद्द्यांशी सहमत, पण..
हे कळायला बर्यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. ;-)
1 Apr 2014 - 3:12 pm | दिव्यश्री
खरच चा ऐवजी खर्च अस आल . :( मला खरच कळत नाही .
हे कळायला बर्यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. Wink>>> :D
बघा मिपावर मणोरंजण होते हो कि नै... :P
28 Mar 2014 - 4:31 pm | स्मिता चौगुले
""बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे?""
विचार आवडले आपले..
28 Mar 2014 - 11:40 am | ऋषिकेश
वेगळे रहावे आणि काय हवे ते करावे. आई वडिलांना मदतीची गरज असेल तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्या सोबत कायम रहायची गरज नाही.
स्वतःला पटल्याशिवाय स्वतःपुरता कोणताही निर्णय घेऊ नये. बायको सांगते म्हणूनही नाही नी आईवडिल सांगतात म्हणूनही नाही. असे करणे स्वतःच्या निर्णयांच्या परिणामांचे खापर दुसर्यावर फोडणे झाले.
नाही कळले? एकत्र राहत नसले म्हणजे काही एकमेकांच्या घरी संचारबंदी नसते. वेगळे राहिनही आजी-आजोबा आणि नातवंडे रोज खेळु शकतातच. उलट त्यांना खेळायचे नसेल तेव्हा नातवंडांची ब्याद त्यांच्या जन्मदात्यांच्या घरी पिटाळून मस्त झोपा काढू शकतात.
स्वार्थ हा स्वतःचाच असतो. माणूस हा स्वार्थी प्राणी आहे म्हणून टिकाव धरून आहे, तसेच असावे!
27 Mar 2014 - 8:21 pm | जेपी
सद्या , एकत्रीत आणी वेगळे कुटुंब अश्या दोन केस बगतोय . सगळ लियाच मनलतर दोन लेख पाडावे लागतीत . मनुन 50-50सहमत .
(एक लेख पेंडीग असलेला )जेपी
27 Mar 2014 - 8:38 pm | सोत्रि
सर्वांच्या मताचा आदर आहेच पण...
हा प्रश्न कोणासाठी आहे? म्हणजे इतरांच्या मतावरून स्वत:साठी हा निर्णय घ्यायच्या आहे की कसे?
कारण हा मुद्दा सरसकटीकरण करण्याएवढा सोपा नाहीयेय. प्रत्येकाच्या समस्या, एकत्र राहयाचे किंवा विभक्त, ह्या त्या त्या व्यक्तीच्या आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या सापेक्ष असणार. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने त्या जनरलाइज करणे अवघड आहे.
बहुतांशाने सगळ्यांचा ह्या विषयाकडे भावनिक भुमिकेतुन बघण्याचा कल दिसून येतो. पण 'प्रॅक्टिकल' असणे ही काळाची गरज आहे. (परत, हे माझे वैयक्तिक मत). नाण्याला कशा दोन बाजू असतात तशा ह्या विषयालाही आहेतच. पण त्या व्यक्तिसापेक्ष असणार.
त्यामुळे ही काळाची गरज आहे का असा प्रश्न विचारून सरसकटीकरण करण्यापेक्षा ती वैयक्तिक गरज आहे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
- (काळाच्या पुढे चालणारा) सोकाजी
28 Mar 2014 - 12:13 pm | मराठी कथालेखक
सगळे भाऊ अर्थिकदृष्ट्या सशक्त आणि समान ताकदीचे असतील. तसेच आई-वडीलही ब-यापैकी पैसा वा स्थावर मालमत्ता राखून असतील तर बहूधा कुणाचाही स्वाभिमान न दुखावता , समंजसपणे एकत्र राहणे शक्य होवू शकते (होईलच असे नाही, बाकी समंजसपणा, व्याहवारिक जाण महत्वाची).
बाकी "घरात सगळ्या प्रोढ व्यक्ती सारख्याच आहेत, वैयक्तिक निर्णय घेण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे व कौटुंबिक निर्णयात प्रत्येकाचे मत गणले जाते" असा विश्वास सर्व सदस्यांत असेल तर एकत्र राहणे सुखकारक होवू शकते.
लहान-मोठे पणाचा फरक फक्त बोलण्यात आदर देण्यापुरता (अहो-जाहो, दादा , ताई ई) वा सणासुदीला नमस्कार करण्यापुरता मर्यादित असावा. प्रत्येकवेळी "मी मोठा/मोठी, म्हणून मला जास्त कळते व सगळे निर्णय मीच घेणार वा मला नेहमीच जास्त मान-स्न्मान देण्यात यावा" असा हट्ट एकत्र कुटूंबस बाधा आणतो.
28 Mar 2014 - 7:16 pm | पैसा
सर्व बाजू मांडून झाल्या आहेत. नवीन काही लिहावं असं शिल्लक नसावं. पण एक वाक्य आठवलं.
28 Mar 2014 - 9:01 pm | नगरीनिरंजन
रोचक प्रतिसाद आहेत.
या निमित्ताने लोकसत्तातला हा लेख आठवला.
आई-वडिलांनी म्हातारपणी मुलांकडून काही अपेक्षा करु नये हे ठीक. मग मुलांनीही अठराव्या वर्षानंतर घराबाहेर पडलं पाहिजे; पण तसं आपल्याकडे होतं का? सगळं शिक्षण, लग्न वगैरेचा खर्च खुशाल आईवडिलांकडून घ्यायचा आणि नंतरही स्वतःच्या अडीअडचणींमध्ये जाऊन त्यांना त्रास द्यायचा हा ़कसला न्याय?
स्वतः तिशी-पस्तिशीच्या झाल्यातरी आईकडून घरगुती हळद-तिखट-मसाल्यांची नियमित रसद मिळवणार्या, पोरांचा सांभाळ करण्यासाठी आई-बापांचा हक्काने वापर करुन घेणार्या जोड्या कमी नाहीत. वर आईवडलांनी काही अपेक्षा ठेवू नयेत असं तत्वज्ञान सांगायला तयार. अठराव्या वर्षीच हे तत्वज्ञान सुचून घराबाहेर का नाही पडत कोण जाणे?
28 Mar 2014 - 9:48 pm | शिद
सहमत.
28 Mar 2014 - 9:42 pm | मनीषा
हल्लीचे जे सासू सासरे आहेत (बहुतांशी) ते तरी कुठे एकत्रं/संयुक्तं कुटुंबात राहिले असतात?
सुनेचे मत विचारात घेऊन निर्णय घेणारा मुलगा..'बायकोच्या ताटाखालचे मांजर' , आणि लेकीची मर्जी राखणारा 'जावई माझा भला' असही असतं बर्याचवेळा.
अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. निरपेक्ष वृत्तीने रहाणे कुणाला जमणे अवघडच. पण अपेक्षा बाळगताना व्यावहारीक दृष्टीकोन ठेवायला पाहिजे... म्हणजे अपेक्षाभंग होणार नाहीत.
तसेच दूसर्याची वर्तणुक तपासताना स्वतःच्या वागणूकीचे ऑडीट पण जरूर करावे, त्यामुळे बरेचसे प्रश्नं उद्भवणार नाहीत.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातल्या व्यक्तीबद्दल बाहेर तक्रारी, चौकशा करू नये. त्या ऐवजी एकमेकांशी संवाद ठेवावा. जितक्या बाहेरच्या (नातेवाईक. मित्रंमंडळी वगैरे) व्यक्ती आपल्या घरात लक्षं घालतील, तितके आपल्या घरातील प्रश्नं चिघळत जातील हे नक्की.
एकमेकांशी संवाद असेल, परस्पर आदर (म्युचल रिस्पेक्ट) असेल, आणि महत्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास असेल तरच एकत्रं रहाण्यात अर्थ आहे, आणि हे सारं नसेल, तर घर म्हणजे नरक होईल.
29 Mar 2014 - 1:00 am | अप्पा जोगळेकर
इथे चर्चा केल्यावर कोणी आपल्या आयुष्यातले निर्णय बदलणार आहे का. हा फारच वैयक्तिक पातळीवरचा निर्णय आहे.
29 Mar 2014 - 1:07 am | आदूबाळ
:) फक्त कुकरची शिट्टी होणार आहे...
3 Apr 2014 - 2:03 pm | इरसाल
झाली शिट्टी, घ्या मग ताटं वाढायला
3 Apr 2014 - 2:18 pm | प्यारे१
हम्म!
तुम्ही घरातले जास्तकमावते/थोरले/बाब्या/शेंडेफळ्/लाडोबा/आजारी वाट्टं. तरीच्च!
जळ्ळा मेला आमचा जन्म. आमचे हे थोडे
3 Apr 2014 - 2:19 pm | प्यारे१
बघा बै असं होतं... लिहीता लिहीता उठावं लागलं.
जळ्ळा मेला आमचा जन्म....
1 Apr 2014 - 1:16 pm | फुंटी
एकत्र कुटुंबपद्धती हा एकंदर मानवी समाजव्यवस्थेचा एक कालखंड (टप्पा)आहे.सध्या तो लयास जाताना दिसतो त्याची अनेक कारणे असतील.विभक्त कुटुंबपद्धतीची ३०-४० वर्षापूर्वी झालेली सुरुवात आणि तिची आजची आणि येणाऱ्या भविष्यात होणारी अवस्था या बदलांचे निरीक्षण करण गरजेच आहे.भावनिक बांधिलकीवर एकत्र कुटुंब टिकू शकली नाही त्यामुळे ती लयास गेली.परंतु सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव लक्षात घेता विभक्त कुटुंब सुद्धा भावनिक दृष्ट्या बांधलेली आहेत असे म्हणता येणार नाही .किंवा गेल्या काही वर्षात मजबूत असलेली विभक्त कुटुंबपद्धती भावनिक निकषांवर डळमळीत झालेली दिसून येते.भावनिक बांधिलकी आणि कुटुंब व्यवस्था आणि आर्थिक /सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबव्यवस्था या दोहोंचा विचार करता येणाऱ्या काळात या दोन्ही कुटुंबव्यवस्था मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.एकंदर मानवी समाजव्यवस्थेच एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.
1 Apr 2014 - 2:45 pm | प्यारे१
काय ठरलं शेवटी??????????
का अजून शेवट यायचाय सीरियल सारखाच्च! ;)
2 Apr 2014 - 11:38 am | मारकुटे
काय ठरलं मग?
2 Apr 2014 - 12:21 pm | शिल्पा नाईक
पिलियन ताई,
प्रचंड सहमत.
3 Apr 2014 - 4:18 pm | चिगो
अवांतर : ज्या ज्या स्त्रीयांना आई-वडीलांना सोडून सासरी जाण्याची क्रूर प्रथा नकोय, त्यांनी पुढचा जन्म गारो किंवा खासी जमातीत जन्म होण्यासाठी देवाला वशिला लावावा.. ;-)
3 Apr 2014 - 8:48 pm | हाडक्या
+१ ..!!
आमच्या एका खासी मित्राला त्याच्या वडिलांनी सांगितलेय आधीच, 'बाबा आपल्या जमातीतली सोडून बघ रे' :D