कविता

स्वामि धागे घेऊन येतात

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
8 May 2019 - 11:55 am

स्वामि धागे घेऊन (का) येतात
एकएक हट्टी जिलबी
जिद्दीने पाडून ठेवतात,
प्रत्येक जिलबीमध्ये
अनेक बिनबुडाचे मुद्दे
मनोरंजन म्हणून ठेवून जातात...

स्वामि धागे घेऊन येतात
अलंकारिक वाक्ये भिरकावून
केवळ डोकेदुखी देऊन
मिपाकरांच्या डोक्यात जातात
ट्रोलबाजी करून
मजा बघत अज्ञाताच्या अंधारात
गुडूप होतात......

(दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात....

- हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण

आता मला वाटते भितीमुक्त कविताकवितामुक्तकविडंबनव्यक्तिचित्रणसोन्या म्हणे

प्रेम...

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
8 May 2019 - 11:53 am

खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही
कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं
तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक
त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं

कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का
कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का
नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी
भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का

कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं
तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं
अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . .
तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !

कविता माझीप्रेम कविताफ्री स्टाइलकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रार्थना!

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
7 May 2019 - 6:15 pm

देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता ।

चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी
दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।।

हासता यावे मला पाहून इतरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।

कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।

~ मनमेघ

कविता

एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
5 May 2019 - 2:14 pm

एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत
------------------------------------------------------------
तू शहीद तिकडे देशासाठी
इथे दुःख माझिया उरात
एकेक स्वप्नाची राखरांगोळी
मन आसवांच्या पुरात

स्फोटाचा एकच दणका
साऱ्याचे तुकडे तुकडे
कुठे चिरफाळले देह
कुठे विच्छिन्न मुखडे

अग्नी दिला तरीही तुला
डोळे शोधती धुरात

कपाळाचं पुसलं कुंकू
पदरात कच्ची बच्ची
सांत्वनांचा काय दिलासा
ही एकच गोष्ट सच्ची

पुन्हा कधीही तुझी पाऊले
ना वळणार या घरात

कविता

(धागा काढण्याची तल्लफ)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
3 May 2019 - 4:41 pm

स्वामी चरणी समर्पित
...

डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....

तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?

डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये

अदभूतकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीजिलबीभूछत्रीभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसहे ठिकाणकविताविडंबनसमाज

सोबती

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
3 May 2019 - 2:28 pm

मनापासून बोलतो
मनापासून ऐका
वागावे कसे माझ्याशी
फिटतील सर्व शंका

चाललो पुढती तरी
त्यात ना अर्थ काही
नका येऊ मागुती
मी कुणी नेता नाही

तुम्ही पुढे मी मागे
चित्र असे दिसले जरी
मी नव्हे अनुयायी
गोष्ट ही आहे खरी

रहा आसपास माझ्या
मार्ग चालू सोबतीने
परस्परांचे मित्र होऊ
जोडुनी आपली मने

-अनुप

कविता

विहीर खोदण्याचा विचार

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
3 May 2019 - 8:24 am

विहीर खोदण्याचा विचार...

डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....

जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?

डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये

अदभूतअनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कविताधोरणमांडणीवावरवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमान

बिज्जी लेखिकेची आळवणी

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
29 Apr 2019 - 4:52 pm

(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!)

बिज्जी लेखिकेला
असे घाई भारी
मिटिंगा लई
सुप्रभाती, दुपारी

बिज्जी लेखिका ती
भुसनळी पेटलेली
कुणी त्रास देता
ठासते आग 'खाली'

स्वयंपाकही तो
पाचवीं पूजलेला
शिव्या मोजिते
पाहता ती घड्याळा

तिची नाटिका जी
प्रेक्षकां झालि प्यारी
सदोदीत टाळ्या
फुल्ल तिकिटांचि बारी

प्रयोगास येती
मोठमोठे असामी
पाहता लेखिकेला
'मुग्ध' होती प्रणामी

कविताप्रेमकाव्यविनोद

(बंद डब्याच्या झाकणाआडची कोशिंबीर)

शब्दसखी's picture
शब्दसखी in जे न देखे रवी...
27 Apr 2019 - 5:17 pm

(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-)
बाकी शिवकन्या तुमचे आभार!!)

सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर...
किती बाहेर??

टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे ....
ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात
डाएटच्या नादात
भरली होती तिला डब्यात....

करत राहते ती विचार की पाळेल का तो डाएट आजतरी...
घेत राहते ती वास त्याने दिवसभर खाल्लेल्या अबरचबर पदार्थांचे....
सामोश्यांचे... आणि वेळी अवेळी प्यायलेल्या कॉफीचे...

विडम्बनकविता

माणसे कविता होऊन येतात.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Apr 2019 - 3:22 am

माणसे कविता होऊन येतात
एकएक हट्टी कडवे
लाडाकोडाने घालून ठेवतात,
दोन कडव्यांमध्ये
एक जीवघेणी कळ
विसावा म्हणून ठेवून जातात...

माणसे कविता होऊन येतात
अलंकार भिरकावून
केवळ अर्थ होऊन
रात्रभर उशाशी बसतात
उजाडताना परत
पुस्तकाच्या अंधारात
गुडूप होतात......

माणसे कविता होऊन येतात....

-शिवकन्या

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताकरुणमांडणीवावरवाङ्मयकवितामुक्तक