कविता

काॅफी ही निमित्तमात्र..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
26 Mar 2019 - 10:02 am

मग पुढे असं होतं की ..
शब्दांमधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू निवत जातं...
स्पर्श होतात विसरायला..
आणि भांडणं लागतात आठवायला..
नातं लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
काॅफी ही निमित्तमात्र..

फ्री स्टाइलकविता

|| माझे बाबा ||

बी.डी.वायळ's picture
बी.डी.वायळ in जे न देखे रवी...
15 Mar 2019 - 11:51 am

हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||धृ||

त्यांच्याच आधाराने झाले लहानाची मोठी |
खंबीरपणे उभे राहिले सतत माझ्या पाठी ||
त्यांचच बोट धरुन मी चालायला ही सिकाले |
म्हणूनच तर आतापर्यंत कधिच नाही थकले ||
हे विठ्ठला त्यांच शेत मोत्यावानी पिकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||1||

कविता माझीकविता

चढणं म्हणजे काय असते रे भौ ( एक अशीच केलेली "श श क कविता" )

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
12 Mar 2019 - 6:45 pm

चढणं म्हणजे काय असते रे भौ

लेका , चढणं मंजी ईचारांशी लढणं असतं रे भौ

लढणं मंजी काय असतं रे भौ

लेका लढणं मंजी आतल्याआत कुढणं असतं रे भौ

आतल्याआत कुढणं , मंजी काय असते रे भौ

लेका , त्ये मंजी सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ

नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ

लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ

मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ

मनाविरुद्ध उडणं , मंजी टुल्ली गहाण ठेवणं असतं भौ

टुल्ली गहाण ठेवणं मंजी काय रे भौ

आरं लेका, त्येच तर बोलून ऱ्हायलोय

इतिहासकविता

काचेच्या अलिकडून

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
9 Mar 2019 - 9:12 pm

बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो
किंवा लक्ष नाही असं दाखवतो
नाहीच जमलं दुर्लक्ष करणं
तर मानेनेच नाही म्हणतो
आणि कधीकाळी दिलेल्या
दहा रूपड्याचं गणित मांडून
स्वतःचच समर्थन करतो...
पण खरं सांगायचं तर,
आत एक द्वंद्व चालू असतं
कारण मला पक्कं ठाऊक असतं की,
नकार,
अपमान,
एकटेपण,
तिरस्कार,
नाकारलेपण,
संघर्ष,
या शब्दांचे अर्थ
मला नाही कळणार कधीच....
ते कळतील
फक्त
गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या
आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या
....त्या हिजड्याला

मुक्त कविताकविता

व्हेनीसचे व्यापारी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
6 Mar 2019 - 2:50 am

क्लीओपात्राच्या सौंदर्याला
सीझरच्या नश्वरतेचा शाप
या भुताटकीच्या जगात
सगळेच हॅम्लेटचे बाप
*
व्हेनीसचे व्यापारी सारे
मासाचे भुकेले
रोमीयोचे शहाणपण
उगाळुन प्यायलेले
*
म्हणुन म्हणतो पोरी
बरे असते स्व:ताला जपलेले
ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे
तारुण्याला हपापलेले...........

कविता

सजले अंतर

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
6 Mar 2019 - 1:36 am

नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर

दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर

विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर

काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर

प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर

मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...

- कुमार जावडेकर

कवितागझल

हमसे तो छूटी महफ़िलें…

मनिष's picture
मनिष in जे न देखे रवी...
26 Feb 2019 - 2:32 pm

Lonely Journey

काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्‍या मैफिलीत
हुरळून आपण सामिल होतो.
संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण
चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो.

मैफिलीतल्या अनवट कविता,
एखादी नेमकी दाद,
तिथली व्यासंगी चर्चा,
आणि मनसोक्त गप्पा.
अशा हव्याहव्याशा वातावरणात
आपणच नकोसे आहोत,
हे अवचितच झालेले दंशभान….

कविता

" माफ करा राजे "

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in जे न देखे रवी...
20 Feb 2019 - 4:57 pm

राजे तुम्ही स्वराज्य निर्माण केल
पण आम्ही स्वराज्याच वाटिळ केल ।१।
राजे तुम्ही उत्तम आदर्श व्यवस्था निर्माण केलीत.
पण आम्ही ती आज आम्ही ती मोडीत काढली. ।२।
राजे तुम्ही उत्तम आदर्श निर्माण केलेत.पण आम्ही ते पायदळी तुडवले।३।
राजे तुम्ही गडकोट मंदिरे बांधली
त्या ऐतिहासिक वास्तुंची आज पडझड झाली ।४।
राजे तुम्ही रयतेवर प्रेम केलत
आम्ही त्यांना आज देशोधडीला लावल ।५।
राजे तुमच्या राज्यात सुख शांती नांदत होती.
पण आज बेकारी गरीबी नांदते।६।
राजे तुमच्या पदरी सर्व जाती समान.
पण आज सर्वत्र जाती जातीचे आरक्षण ।७।

कविता

मैत्री

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
20 Feb 2019 - 12:22 am

मैत्री

मैत्री असावी
एकमेकांना जपणारी
पण नसावी कधी
एकमेकांना विसरणारी

मैत्री असावी
चांदण्यांसारखी
रात्री च्या त्या अंधारात
अथांग पसरलेली

मैत्री असावी
फुलासारखी
कितीही काटे बोलले तरी
सुगंध मात्र देणारी

मैत्री असावी
सागरासारखी
कितीही आल वादळ
तरी मात्र किनाऱ्यालगत येणारी

मैत्री असूदेत
कितीही अबोल
पण असावी एकमेकांना
समजून घेणारी

मैत्री मध्ये नसली जरी
रोजची ती भेट
तरीही हक्काने
एकमेकांना साथ देणारी...

कविता माझीमाझी कविताकविताप्रेमकाव्य

" माफ करा राजे "

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in जे न देखे रवी...
19 Feb 2019 - 5:41 pm

राजे तुम्ही स्वराज्य निर्माण केल
पण आम्ही स्वराज्याच वाटिळ केल ।१।
राजे तुम्ही उत्तम आदर्श व्यवस्था निर्माण केलीत.
पण आम्ही ती आज आम्ही ती मोडीत काढली. ।२।
राजे तुम्ही उत्तम आदर्श निर्माण केलेत.पण आम्ही ते पायदळी तुडवले।३।
राजे तुम्ही गडकोट मंदिरे बांधली
त्या ऐतिहासिक वास्तुंची आज पडझड झाली ।४।
राजे तुम्ही रयतेवर प्रेम केलत
आम्ही त्यांना आज देशोधडीला लावल ।५।
राजे तुमच्या राज्यात सुख शांती नांदत होती.
पण आज बेकारी गरीबी नांदते।६।
राजे तुमच्या पदरी सर्व जाती समान.
पण आज सर्वत्र जाती जातीचे आरक्षण ।७।

कविता