कविता

सिग्नल .....!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
5 Jun 2019 - 6:13 pm

सिग्नल ......

आज लाल दिव्याने नाममात्र
थांबलेत काही गोंगाट ,
नाहीतर कोण इथे थांबतं ......
सगळेच घाईच्या लयीत !

इतक्यात .......
धुळीने माखलेल्या
चाळीस वर्षांच्या
रखरखीत पायाच्या बोटांवर
चार वर्षांच एक डोकं ठेवलं गेलं ..!
अन्
त्या कोमल गालांचा स्पर्श होताच ......
झटकन पाय मागे घेऊन
तो ओरडला " ए हट ...... "

त्याच्या डोळ्यातली लाचारी
पाहायला वेळ नसेल पण,
त्या स्पर्शाने काळीज
गलबलले असणार नक्कीच !

तरीपण ....

कविता

जिलब्या

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Jun 2019 - 2:56 pm

का म्हणून दिवसेंदिवस जिलब्या टाकत राहावे ?

का म्हणून आपणच समूहा पाकमय करावे ?

थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी कढई नि झारा दिसेल

तो हातात घेऊन बसलेला एक साधा खादाड दिसेल

एक दिवस तरी बुभुक्षित बनून बघावे

भुभुकार करून पाहावे

न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे

रुसेल त्याचे फुगवे निपटावे

शांत निवांत राहून जिलब्या धागे वाचावे

वाचता वाचता वाचकाने लेखकाचे पेन घेऊ नये

साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे

खदखदून खदखदून हसावे

विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे

इतके साऱ्या धाग्यावर मौनावे

कविता

तोल

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
31 May 2019 - 10:30 pm

विहिरीच्या बाहेर असतो आपण..
आजूबाजूचा परिसर..
उत्तुंग पर्वत, विशाल सागर,
वारे, फुलं, गवत, नद्या..
अगदी वाळवंट अन बर्फाळ प्रदेशही..
या साऱ्याचा विस्तीर्ण पसारा..
त्या तुलनेत असलेलं
विहिरीचं छोटेपण..

नन्तर त्याकडे पाठ फिरवत..
सामाजिकता दूर ठेवत
कपडे उतरवून पाण्यात उतरतो
विहीर अगदी उराऊरी भेटते..
सर्व बाजूंनी मिठीत घेते..
आपलेच किरटे पातळ आवाज
वजनदार घुमारेदार असे होऊन ऐकू येतात..
स्वत्वाची जाणीव हरवते..
शरीराच वजन हरपते..
पिसासारखे हलके होतो आपण..

कविता

बायको

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
26 May 2019 - 12:14 pm

आजकाल गावाकडे कित्येक मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक मध्यम वर्गीय मुले विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुले चाळीशी ओलांडली तरी अजुन मुलगी न मिळाल्याने अविवाहित आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक गावात नसले तरी ज्या ज्या गावात मी फिरलो त्यापैकी 90% गावात अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काही प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक.. पण दिवसेंदिवस अश्या ह्या "सिंगल" मुलांची संख्या वाढतच चाललीये.. त्यावरच प्रकाश टाकणारी हि छोटीशी कविता..

कविताप्रकटन

आभाळ पक्षी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
25 May 2019 - 12:04 pm

आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी
झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी
पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे
आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९

Nisargशांतरसकवितामुक्तक

...पत्र...

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
20 May 2019 - 8:41 am

...पत्र ...
काय मायना घ्यावा?
कल्लोळ कसा लपवावा?
सारेच जाणते पत्र.
...पत्र...
मजकूर रिकामा होता.
पत्ताही लिहिला नव्हता.
पोचले तरीही पत्र.
...पत्र...
जीर्ण शीर्ण झालेले,
कोपरेही दुमडून गेले,
तरीही जपले पत्र!
..पत्र...
खरेच लिहिले होते?
काहीच कसेना स्मरते?
प्रश्न पाडते पत्र!
...पत्र...

भावकविताकविता

" कशी आहेस ? "

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
20 May 2019 - 5:43 am

" कशी आहेस ? "

वेशीमधून बाहेर पडताना
उरले सुरले बळ एकवटून
त्याने शेवटी विचारलेच

" कशी आहेस ? "

निर्विकार डोळ्यांनी
निर्विचार मनाने मग
मीही फक्त मान हलवली .

शब्द खूप जड असतात ........
परत कोण ..... ...
ते ओझं वाहणार........
नाहीतर सांगितलं असतं त्याला
"जशी सोडून गेलास ....... तशीच आहे !"

-----------------फिझा !

कविता

शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान

Sumant Juvekar's picture
Sumant Juvekar in जे न देखे रवी...
17 May 2019 - 3:03 pm

आपला शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरू दादासाहेब दापोलीकर यांनी लिहिलेले ११४ ओळींचे खंडकाव्य!

(हे लिहिण्यास दादासाहेबांना अडिच महिने लागले. तस्मात् वाचकांनी १५ मिनिटे तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व 9967840005 वर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!)

खंडकाव्य: अभिनंदन, अभिनंदन!

वृत्तबद्ध कविताकविता

गुलमोहर मोहरतो तेव्हा

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
14 May 2019 - 7:20 pm

गुलमोहर मोहरतो तेव्हा
सखे तुझे हसणे आठवते
उन्हातही मग चंद्र उगवतो
माझे असणे-नसणे नुरते

छोट्या गोष्टींनाही येथे
अस्तित्वाचा प्रश्न बनवतो
खोड जुनी ती नकळत माझ्या
जितेपणीही क्षणिक मोडते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!

दोन समांतर विश्वांमधले
झालो बघ आपण रहिवासी
एक एक केशरी फूल हे
दोघांमध्ये पूल बांधते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!

भेट ठरावी अन् विसरावा
मीच खुणेचा तो गुलमोहर
फक्त उरावा शोध आपला
मनी असेही भलते येते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!

~ मनमेघ

कवितागुलमोहर मोहरतो तेव्हा

रियल रियल

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 May 2019 - 5:16 pm

बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.

मनात आठवण, झुरणे बिरणे
अरेरे, हाताबाहेरच्या केसेस...
डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल
एवढेच काय ते रियल रियल
बाकी जग तो मृगजल मृगजल...

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामांडणीवावरसंस्कृतीकविताप्रेमकाव्यमुक्तकसाहित्यिकसमाज