काल धरण बांधिले
काल धरण बांधिले
खेकड्यांनी हो तोडिले
येरू म्हणे बघा नीट
विठू चरणीची वीट
सृष्टीचा जो तोले भार
त्यासी विटेचा आधार
युगे अठ्ठावीस ठेला
विठू विटेवरी भला
वीट अजूनी अभंग
बघणारे होती दंग
मूळ माल जर नीट
(जशी विठ्ठलाची वीट)
तर फिजूल बोभाट
नको खेकडी खटपट