तुझे शहर

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Jul 2019 - 11:04 am

तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय

रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे –
तुझा हात घामेजला आहे

मंदिरातले कासव ओलांडले आहे –
तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे

दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे –
लोबानचा गंध दरवळत आहे

मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे –
हात चिकट, तोंड गोड झाले आहे

भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत –
तुझे डोळे चमकत आहेत

रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे –
तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे

त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत –
तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत

लाचा घेताना मी गोंधळले आहे –
तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

‘हेच तुझे घर का?’ मी विचारले आहे –
हातात हात घेऊन तू मौन राखले आहेस

अर्ध्यामुर्ध्या नदीत मी पाय सोडले आहेत –
तू डोळ्यांत नदीला वाट दिली आहेस

‘मी वर्तमानात बोलते’ मी उगाच म्हणते –
‘तू कुठे माझा भूतकाळ आहेस!’ तुझा खोल श्वास बोलतो

तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय

-शिवकन्या

कविता माझीकालगंगाप्रेम कवितामांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतर

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

2 Jul 2019 - 5:50 pm | जालिम लोशन

सुरेख जमली.

चांदणे संदीप's picture

3 Jul 2019 - 9:11 pm | चांदणे संदीप

सुंदर रचना.

Sandy

मनिष's picture

4 Jul 2019 - 9:40 am | मनिष

अहा...

श्वेता२४'s picture

4 Jul 2019 - 11:15 am | श्वेता२४

तू डोळ्यांत नदीला वाट दिली आहेस
हे खास आवडले

गवि's picture

4 Jul 2019 - 12:13 pm | गवि

दर्जेदार , सुंदर, नेहमीप्रमाणे.

प्रचेतस's picture

4 Jul 2019 - 12:23 pm | प्रचेतस

+१

जॉनविक्क's picture

4 Jul 2019 - 12:58 pm | जॉनविक्क

+1

प्रशांत's picture

5 Jul 2019 - 2:02 pm | प्रशांत

+१

यशोधरा's picture

5 Jul 2019 - 7:50 am | यशोधरा

:(

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 2:12 pm | अभ्या..

रॉकस्टार मधले "शहरमे हूं मै तेरे, आके जरा मिल तो ले" गाणे आठवले.
येनीवे, कविता भारीच.

शिव कन्या's picture

17 Jul 2019 - 3:40 pm | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.