कविता

पाहूणा पाऊस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Sep 2019 - 12:33 am

मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी
ब-याच दिवसात भेटला नाही
तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा
पण तूच माझ्याशी बोलत नाही

मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले
अगदी जवळ गेल्यासारखे भासविले
पण त्याचे मनात काही वेगळेच असेल
जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले

शांतरसकवितामुक्तक

क्लायमेट चेंज रियल आहे

पुणेरी कार्ट's picture
पुणेरी कार्ट in जे न देखे रवी...
26 Sep 2019 - 11:54 am

गेल्या काही दिवसांपासून व्हॅट्सऍप, फेसबुक आणि ट्विटरवर 'क्लायमेट चेंज इस रियल' च्या चर्चांना उधाण आले आहे. त्या निमित्ताने -  

CO2 सोडणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या गाड्या आम्ही सोडणार नाही,
घरातले आणि ऑफिस मधले AC आम्ही बंद करणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

गर्दीचं कारण पुढे करून पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये उभे राहणार नाही,
घरातून आणि ऑफिसमधून बस स्टॉप पर्यंत थोडंसं चालत जाणार नाही,
पण क्लायमेट चेंज रियल आहे.

फ्री स्टाइलमाझी कवितामुक्त कविताकवितामुक्तकसमाज

ओले केस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
26 Sep 2019 - 5:18 am

केस ओले न्हालेते
आले प्रेमाचे भरते

(पावसात केस ओले
प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!)

शिडकावा ओल्या थेंबांचा
चिंब भिजवून देण्याचा

गोरी काया ओलेती
तुझे लावण्य दाखवती

गाली लाज आलेली
शृंगाराविना सजलेली

अशी सामोरी ललना
मन हरखले ना !

साडी लपेटून उभी
येते कवेत कधी?

- पाषाणभेद
२६/०९/२०१९

माझी कविताशांतरसकविताप्रेमकाव्य

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
25 Sep 2019 - 2:26 pm

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला
तो झाला सोहळा तिहारात
जाहली दोघांची तुरुंगात भेट
मनातले थेट मना मध्ये

मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर
अवघाची inx खाऊन टाकला
चिदू म्हणे, एक ते राहिले
तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी

मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले
त्याने तडे गेले प्रामाणिकतेला
मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी
माझी पाटी कोरी राज्य करोनिया

चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट
प्रत्येकाची कोठडी वेगळाली
वेगळीच ताटे वेगळीच वाटी
जेवायला भेटे पुन्हा डाळ भात

miss you!आता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितादुसरी बाजूनागद्वारफ्री स्टाइलमनमेघमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताविडम्बनसांत्वनाअद्भुतरसवाङ्मयकवितामुक्तकविडंबनविनोदसमाजजीवनमानकैच्याकैकविता

गंध अद्वैताचे

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
23 Sep 2019 - 9:59 am

केसांचे हळवे वळसे
पाठीवर सळसळ हलके
सुटण्या धडपडती ओले
जणू कामशराचे चेले

मानेला लटके मुरके
ज्याने सगळे वेढे सुटले
मग कुंतलसंभाराचे
जणू प्रपात ते कोसळले

धुंद मोगरा हसे साजरा
गंधित झाला तुला माळता
क्षण शारीर करुनी गेला
मादकतेचा कोरा गजरा

चढता लाली तुझ्याच गाली
अवचित होई गोरामोरा
केशी लपवुनी अंग मखमली
चेहरा झाके विसरुनी तोरा

सुमनदलांची तनू थरथरे
मुग्ध मोकळी चुरगळ पसरे
उन्मनी तुझे हास्य मोहरे
गात्रीं तुझिया लक्ष मोगरे

शृंगारकविता

(दुपारी)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
18 Sep 2019 - 2:31 pm

पेरणा अर्थात

चाल :-
बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा)
ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा,
तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले"
ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी"
ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके"
आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.

(दुपारी)
तिच्या पायरवाची गाज,
त्याने दडपली छाती,
जैसे वीसमणी हातोड्याने
घाव घणाचे घालती,

अदभूतकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनरतीबाच्या कवितावीररसकविताबालगीतइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

दुपार

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
18 Sep 2019 - 9:33 am

तिच्या पैंजनाची गाज,
त्यात रेंगाळे दुपार,
विसावल्या सतारीची
जणू छेडियली तार,

तिच्या कपाळी जी बट
त्याला कुंकवाची तीट,
लाल रेशमी लडीची,
तिच्या गालाशी लगट

तिच्या पाठीची पन्हाळ
त्यात घामाचा पाझर,
तिच्या नाजूक कटीला,
शोभे नाजूकसा भार..

तिच्या बाहूंचा मांडव,
लावी मदनाला वेड,
तिची महकती काया
तिचे ओझे अवघड..

सुस्त दुपारच्या वेळी,
ती येते का सामोरी,
मन हलते हलते,
त्याला सांभाळावे कोणी?

- शैलेंद्र.

शृंगारकविताप्रेमकाव्यमुक्तक

दोरीवरचे कपडे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
4 Sep 2019 - 2:37 pm

दोरीवरचे कपडे

दोरीवर कपडे कसेही वाळत असतात
कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात?

शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो
फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो
(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)

पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत
दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत

नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे

साडी घालून घडी बसते वाळत
वा-याने तिचा पदर असतो हालत

किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल
गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल

काहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताहास्यकवितामुक्तकविनोदमौजमजा

पाणी-च-पाणी

बी.डी.वायळ's picture
बी.डी.वायळ in जे न देखे रवी...
3 Sep 2019 - 4:26 pm

असा कसा हा पाऊस |
पडला बेधुंद होऊन,
कित्येकांचे संसार ,
गेले पाण्यात वाहून |

शंभर वर्षाचा त्याने,
म्हणे रेकॉर्ड मोडला |
जणु फाटले आकाश,
असा पाऊस पडला |

सरला श्रावण मास,
भाद्रपद सुरु झाला |
तरी ही पावसाचा,
जोर कमी नाही झाला |

किल-बिलती पाखरे,
कशी झाली ओलीचिंब |
परी कधी नाही केली,
त्यांनी कुठे बोंबाबोंब |

मिळेना खेळायला,
मैदाने झाली ओली |
कंटाळुन गेली ती,
शाळेतील मूल-मुली |

माझी कविताकविता

पहाट

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
2 Sep 2019 - 3:26 pm

सांज सकाळी
निळ्या आभाळी
कुठून येतो
पंखांना आवेग...

कृष्णसावळ्या
चित्रकथेतून
कसा विहरतो
जडावलेला मेघ!

लज्जाभरल्या
गालावरती
कशी उमटते
गोड गुलाबी लाली...

घरट्यामधल्या
त्या पिल्लांना
कोण सांगतो
उठा, पहाट झाली!

कविता