कविता

मी पुन्हा येईन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Nov 2019 - 2:06 pm

कच्चा माल

घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन

जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन

नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन

मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन

लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताकवितामुक्तकविडंबनविनोदमौजमजा

मी पुन्हा येईल

शुभांगी दिक्षीत's picture
शुभांगी दिक्षीत in जे न देखे रवी...
9 Nov 2019 - 6:37 pm

झेलल्या जरी कितीही
शत्रूने दिलेल्या जखमा
भारतमातेचे रक्षण करण्या
मी पुन्हा येईल..

बळीराजा आज ठरला
अन्यायाचा जरी बळी
शेते हिरवीगार करण्या
मी पुन्हा येईल..

सत्य लिहावे लेखणीतून
लेखणी पडली मोडून
सत्याचा आग्रह धरण्यास
मी पुन्हा येईल..

केली जरी लक्तरे
माझ्या शरीराची त्यांनी
चंडीचं रूप घेऊनी
मी पुन्हा येईल..

जातीधर्माच्या आंधळ्या लढाईत
मोडून पडलो मी
एकसंध समाज बनविण्या
मी पुन्हा येईल..

कविता माझीमाझी कविताकविता

मौनाइतके कुणीच नाही

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
8 Nov 2019 - 11:07 am

अथांग, उत्कट, उधाणले तरि
किनार ओढुन जसा समिंदर..
स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे
जळाकाठचे वा औदुंबर..
प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस
प्राजक्तासम हळवे लोभस..
काजळ रेखुन कधि भिडणारे
खट्याळ हट्टी अवखळ ओजस..
कितीहि काही आत उकळले
संतापाला घट्ट आवरे.‌
शालिन कधि तर भळभळणारे
मिटल्या ओठी दु:ख गोजिरे..
.......
असे देखणे, असे बोलके
मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.

कविता माझीकविता

कविता : भेट मित्रांची…

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
5 Nov 2019 - 3:11 pm

आठवणींना उजाळा
भावनांचा उमाळा
शब्दात जिव्हाळा
दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची…

मित्रांची सतत मस्ती
कधी मस्तीची सक्ती
सख्याची जीवापाड दोस्ती
कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची…

मित्र कमी बोलणारा
परी डोळ्यात जपणारा
दोस्त शब्दात खेळणारा
पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…

कविता माझीफ्री स्टाइलशांतरसकवितामुक्तक

हस्तर कविता :- महायुती

हस्तर's picture
हस्तर in जे न देखे रवी...
4 Nov 2019 - 4:21 pm

हस्तर कविता :- महायुती

महायुती करून काय फायदा झाला ?
जर सरकार एकत्र स्थापन करायचे नव्हते तर निवडणूक का आले एकत्र लढ्याला ?

एक दुसऱ्याचा जागा अडवायला ?
युती नावाचा प्रकार केलाच का ? एक दुसऱ्याची मते लाटायला ?

मजा येत होती ५ वर्षे भांडायला
अफझलखान म्हणून एक दुसऱ्याचे उणे दुणे काढायला

का आनंद झाला जनादेश झुगारायला
संगीत खुर्ची खेळ खेळून मनोरंजन करायला

शेतकरी लागले आसू ढाळायला
आणि तुम्ही बस आपले आपले शपत विधी करायला

अभय-काव्यकविता

' भाज्यांचं संमेलन '

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in जे न देखे रवी...
4 Nov 2019 - 3:41 pm

' भाज्यांचं संमेलन '
एकदा भाज्यांच संमेलन भरवलं प्रत्येकाचे महत्त्व सांगायचे ठरवल
हिरवेगार घोसावळ आले पुढे म्हणाले भजी करुन खा बरे.कांदा आला हसत हसत माझ्या शिवाय तुम्हाला नाही करमत.मी जोडीला आलो बटाटा दोघांचा मिळुन बनवा चटकदार बटाटेवडा. काटेरी वांग्याचा रंगच न्यारा ताजी ताजी घेऊन भरीत भाजी करा.मी गोल लाल गरगरीत भोपळा शेजारी उभा आहे दुध्या भोपळा आणि खरं सांगु का ? आठवड्यातुन एकदा तरी भाजी खाऊन हदयविकार टाळा.आवडीची भाजी फ्लाॅवर, ढोबळी गवार भेंडी असते कोवळी काकडीची तर ऐटच वेगळी कोशिंबिरी ने लज्जत वाढली मुळा बिटाची चव चांगली कच्ची खाण्याने ताकद आली

कविता

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
2 Nov 2019 - 10:40 pm

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

चल उठ मराठी गड्या पुन्हा एकदा लढ लढा
बोल की आता आमचं ठरलयं
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||धृ||

नको कानडी सोन्याचा घास
लावील तो आम्हाला फास
किती मार आता सहन करायचा?
मुकाट अन्याय किती सोसायचा?
सरकारनं अपमानाचं जीणं केलंय
म्हणूनचं आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||१||

gholवीररसकवितासमाजजीवनमान

जुनसर

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
1 Nov 2019 - 11:12 am

मॉल संस्कृती व ऑनलाईन शॉपिंगच्या झगमगाटापुढे टिकण्यासाठी बऱ्याच दुकानांना कात टाकावी लागली. ज्यांना नाही जमलं ती तशीच दिवाळीच्या गजबजाटात जुनं अस्तित्व टिकवण्याचा क्षीण प्रयत्न करत असतात , त्यांना समर्पित...

कवितामुक्तक

सैराट

एपी's picture
एपी in जे न देखे रवी...
30 Oct 2019 - 10:48 am

सैराट
पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी
चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी.
*
तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला
बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी.
*
मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी
उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी.
*
मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे
कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी.
*
-डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)

कविता

सैराट

एपी's picture
एपी in जे न देखे रवी...
30 Oct 2019 - 10:48 am

सैराट
पाहता तिला भर दुपारी, पहाट होत जातो मी
चाकरी कुणाची असो, कंत्राट होत जातो मी.
*
तसा बर्फ-गोळा हेच नाव साजरे मला
बोलता ती कुणाशी, सैराट होत जातो मी.
*
मार्गिका असे माझी, सरळ नाकासमोरी
उल्लेख होता तिचा, भन्नाट होत जातो मी.
*
मी कुणाला काय द्यावे? लायकी माझी नव्हे
कफल्लक होत असता, खैरात होत जातो मी.
*
-डॉ. अशोक कुलकर्णी (एपी)

कविता