वास्तव
प्रियकरं प्रेयसींना
शिळेने साद घालत आहेत
पण गॅसवरील कुकरच्या
शिट्ट्याच शेवटी खऱ्या आहेत
ते म्हणतात हृदयरुपी
हिरे अमूल्य आहेत
पण बाजारात बटाटे
४० रुपये किलो आहेत
त्यांच्या ओठांवर कविता
अन् मनांत गाणी आहेत
पण घराघरांतून
महागाईची रडगाणी आहेत
त्यांच्यासाठी ललनांचे चेहरे
नभीचे चंद्र आहेत
पण तव्यावरील भाकऱ्याच
सर्वांची पोटं भरीत आहेत
तिच्या तनाच्या अत्तराचे
त्याच्या मनात सुवास आहेत
पण उतू जाणाऱ्या दुधांचे
वास हेच वास्तवात आहेत
- सौ. रोहिणी विक्रम मनसुख