कविता

प्रवास

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
1 Apr 2020 - 2:47 pm

टीप: मूळ कल्पना ही मिपावरील एका अन्य आयडीने लिहिलेल्या (पण प्रकाशित न केलेल्या) कवितेवरून घेतली आहे. 
------

तुझ्याकडे मी येते तेव्हा
रिक्षांना कधि नसतो तोटा
हात जोडुनी तयार येण्या..
आव आणुनी खोटा खोटा

कविता

.. तम दाहक लहरी होते!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
31 Mar 2020 - 8:16 pm

डोहातील गर्ता जर्द..
ते डोळे जहरी होते!

खग निष्पाप जरी तो..
ते व्याधच कहरी होते!

गावातील नाती तुटती..
ते कपडे शहरी होते...

स्वातंत्र्य कुणाला येथे?
[मन स्वतःच प्रहरी होते..]

पणतीची वातीवर भिस्त!
तम दाहक लहरी होते!

--

तृष्णांची मनात वस्ती..
अन् मुखात श्रीहरी होते..

राघव

कविता

वळण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
29 Mar 2020 - 10:41 am

गुलमोहरांच्या आपल्या त्या
कावळ्या चिमण्यांच्या
ओट्यावर.
काल तु म्हणालीस 'वाट बघ'

आता आपलं कसं म्हणून
पुस्तकांची पानं उचकत
आतल्या आत गोठून गेलो
एका पानावर,
मोगर्‍याच्या वेलीशी,
फांदी सोडून घेतेय
आपले हात.

दारातून दिसतेय मला,
आयुष्याचा हिशेब
बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी,
आणि हळद लावून बसलेली
भेदरलेली नवरी.

शहरापासून मरणा अगोदर
कोण पोहोचतो, म्हणुन.
भूके कंगालांचे तांडे
सरकताहेत हळू हळू
गावांकडे.

कवितासमाजजीवनमान

विनवणी

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
26 Mar 2020 - 4:53 pm

राहु दे तव सर्व जिवलग खास तव यादीमध्ये
पण मला त्या 'भाव'गर्दित मुळिच तू मोजू नको

चालु दे संवाद प्रेमळ त्या तुझ्या मित्रासवे
धाडिला मी जो बदाम मुळिच तू पाहू नको

घेउनी दोस्तास जा तू पेयप्राशनकारणे
फक्त 'त्या' अपुल्या ठिकाणी त्यास तू नेऊ नको

प्रश्न चावट तो विचारिल, ऐकुनी हसशील तू
आपले हळवे इशारे त्यावरी उधळू नको

राहु दे मज एकला, मम स्मरणतीरी गे सखे
रांगेत मी राहीन येथे, तू असे समजू नको

- चलत मुसाफिर

कविताप्रेमकाव्य

मास्कमधून

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
22 Mar 2020 - 6:41 am

नाहीत तुला पाय तरी
देशोदेशी जाशील
गावागावा-वस्त्यांमधून
द्वाडासारखा फिरशील

तुझी असंख्य भावंडे
माजवतील हाहाकार
पण घे लक्षात, आमच्यात
आहे शिल्लक प्रतिकार

जितका झपाट्याने तू
पोखरत जाशील आत
तितकीच उसळून उठेल
अशी माणसाची जात

माणूस मारणं कदाचित
असेल सोपं काम रे
पण दाखव जिंकून त्याला
म्हणशील मनात 'राम रे!'

माहिती नसेलच तुला
जगणं-जगवणं कोरोना
बघ बापाला, मास्कमधून
पापी पोराला देताना

संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)

कविता माझीकवितासमाजजीवनमान

मैत्री!

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
20 Mar 2020 - 10:59 pm

टीप: 'केयलफिड्डी' या कवितेशी आशयात्मक साम्य भासल्यास योगायोग समजावा बरं का!

'केयलफिड्डी' दुवा https://www.misalpav.com/node/46119
------
मैत्री!

बाईचे दो सख्खे मैतर
पहिला काका दुसरा अप्पा
रोज मारते अलटुन पलटुन
हाटसापवर गुलुगुलु गप्पा

मैतर दोघे पक्के डांबिस
बाई त्यांचा नाजुक बिंदू
आव परंतू आणिति ऐसा
विनयाचे जणु साती सिंधू

रोजरोजच्या गप्पा ओल्या
खूष जाहती अप्पा काका
पाहु लागती स्वप्ने चावट
मनात बांधुन "वाडा" पक्का

कविताप्रेमकाव्यविनोद

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Mar 2020 - 1:21 pm

प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर
दा.= दादा ता. = ताई

उंटावरल्या प्रा.डॉ. दादा ताई
तुमच्या वणी आमास्नी मागे
प्रा न्हाई डॉ न्हाई
मात्र येक सांगुन ठ्येवते
उंट हाय तुमचा लंगडा

बुडत्या नावेतून वाचण्यास
देव प्रत्यक्षात येत नाही
हे अनुभवातन म्हाईत र्‍हातय
तेवड आमा बी कळतय
कळण्यास आमा प्राडाँचे
नवनास्तिक शहाणपण लागत न्हाई.

अभंगकालगंगादुसरी बाजूदेशभक्तिभक्ति गीतमुक्त कवितारतीबाच्या कविताविठोबाविठ्ठलश्रीगणेशश्लोकअद्भुतरसधर्मकविताओली चटणी

असुनी स्वत:च पाशी

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
15 Mar 2020 - 11:13 pm

अध्यात्म मोप झाले, व्यवहार तो सुटेना
अंतर्मनात चाले, तो घोळही मिटेना
 
मी एकटाच आलो, जाईन एकटा मी
गर्दी कशास जमली? उत्तर कुठे मिळेना
 
विज्ञान हाच पाया, विज्ञान हीच निष्ठा
मानून चाललो तर, तेही पुरे पडेना
 
दिक्काल वेग सारे, सापेक्ष एकमेका
स्थिर वेग का प्रकाशा, बुद्धीस हे गमेना
 
बुद्धी पल्याड सृष्टी, मी त्यात एक बिंदू
असुनी स्वत:च पाशी, मी कोण हे कळेना

कविता

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Mar 2020 - 7:46 am

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताकविताविडंबनविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासमौजमजा

का चाफा म्लान पडला

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
9 Mar 2020 - 1:11 pm

का चाफा म्लान पडला
कसे शशीस पडे खळे
*
कोमजले ताटवे फुलांचे.
का बाग विराणसी दिसे..
*
ओघळले काजळ गाली
नेत्र का असे मिटलेले?
*
अधर का असे अबोल
मुख चंद्रमा का मलूल?
*
काय चूक मम कळेना
हा रुसवा संपता संपेना
*
भास की आभास आहे
प्रवास एकट्याचाच आहे
*
कोणत्या जगात तू
कुणास ठाऊक आहे?
*
तुला भेटण्यासाठी सखे
देहाचा अडसर आहे...
avi

कविता