का चाफा म्लान पडला
कसे शशीस पडे खळे
*
कोमजले ताटवे फुलांचे.
का बाग विराणसी दिसे..
*
ओघळले काजळ गाली
नेत्र का असे मिटलेले?
*
अधर का असे अबोल
मुख चंद्रमा का मलूल?
*
काय चूक मम कळेना
हा रुसवा संपता संपेना
*
भास की आभास आहे
प्रवास एकट्याचाच आहे
*
कोणत्या जगात तू
कुणास ठाऊक आहे?
*
तुला भेटण्यासाठी सखे
देहाचा अडसर आहे...
avi
प्रतिक्रिया
9 Mar 2020 - 4:14 pm | खिलजि
का आमचा गृदेव म्लान पडला
अन भक्तांसी पडे खीळ
*
कोमजले ताटवे मिलनाचे.
का हि जागा विराणसी दिसे..
*
ओघळले अश्रू गाली
नेत्र का असे मिटलेले?
*
अधर का असे गोलगोल
माती झालिया का गुल ?
*
काय चूक मम कळेना
भ्रम फसवा संपता संपेना
*
भास की आभास आहे
प्रवास आपल्या एकट्याचाच आहे
*
कोणत्या जगात तू
कुणास ठाऊक आहे?
*
तुला भेटण्यासाठी गृदेव
हा देह अजूनही वेडसर आहे...
9 Mar 2020 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रेमात देहाचा काहीही अडसर नसतो, म्हणजे त्याचा काही संबंध नसतो.
प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. बिंधास्त भेटा, जे होईन ते होईन. :)
-दिलीप बिरुटे
11 Mar 2020 - 3:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
पोट मधे येत असेल डी बी अंकल
आपण समजून जायचे
पैजारबुवा,
11 Mar 2020 - 3:42 pm | पाषाणभेद
ओ, ट्रेड मार्क आहे त्यांचा तशा भावनांचा. इग्नोर करू नका.