प्रवास

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
1 Apr 2020 - 2:47 pm

टीप: मूळ कल्पना ही मिपावरील एका अन्य आयडीने लिहिलेल्या (पण प्रकाशित न केलेल्या) कवितेवरून घेतली आहे. 
------

तुझ्याकडे मी येते तेव्हा
रिक्षांना कधि नसतो तोटा
हात जोडुनी तयार येण्या..
आव आणुनी खोटा खोटा

दिवे  पटदिशी हिरवे होती..
तुरळक मजला भासे वर्दळ
द्वारघंटिका वाजवताना
फुलून येई मनात कर्दळ..
.
.
.
तुझ्याकडून मी निघते तेव्हा,
एकहि रिक्षा समोर नाही
लाल दिवे मम वाट रोखती
आणिक गर्दी भरुनी वाही
.
.
.
घरात शिरता समोर दिसतो
प्रेमळ माझा साजण जिवलग
हास्य जाणते मुखी तयाच्या
घेई जवळी मजला लगबग

गर्दी, रिक्षा, दिवे तांबडे
क्षणात पडतो विसर मनाला
तुझी स्मृती जरि मनात जागी
तनु माझी मी वाही सख्याला
---

मालिकेतील याअगोदरच्या कविता

बिज्जी लेखिकेची आळवणी

वजनदार!

(कपाळ)मोक्ष!!

केयलफिड्डी

मैत्री

विनवणी

कविता

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

2 Apr 2020 - 12:05 pm | धर्मराजमुटके

आवडली !

चलत मुसाफिर's picture

3 Apr 2020 - 8:56 am | चलत मुसाफिर

प्रतिसादाबद्दल!