कविता

स्वामीराया

शब्दांगी's picture
शब्दांगी in जे न देखे रवी...
20 Dec 2019 - 10:47 pm

स्वतःचे असे पसाभर (ज्ञान)
दुसऱ्याचे असे मूठभर
तरी नसे मान्य त्यासी
काय म्हणावे या वृत्ती
स्वामीराया
आदिमाया आदिशक्ती
हसतसे कैलासी
पाहूनी मानवाची मति
असे सर्व मायेची महती
स्वामीराया
कैसी प्रपंच्याची प्रगती
कैसा प्रपंच्याचा नाश
केवळ असे मायापाष
त्याचे कैसे सुख- दु:ख
स्वामीराया
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
लोकांना करुनी त्रस्त
स्वतःचे ज्ञान पाजळती
त्यांची काय गीत होय
स्वामीराया

धर्मकविता

कविकल्पना

Rohini Mansukh's picture
Rohini Mansukh in जे न देखे रवी...
18 Dec 2019 - 8:52 am

पंख मिळावे कल्पनांचे
आकाश व्हावे कागदांचे
भावनेची बनून लेखणी
मनपाखरू स्वछंद उडावे

शब्द व्हावे जाणिवांचे
स्पर्श त्यांना अर्थांचे
विचारांची करून मांडणी
कवितांनी जन्म घ्यावे

ध्यास लागो तालासुरांचे
वेड लागो मज बोलांचे
त्या बोलांची बनून गाणी
रसिकांनी गात रहावे

मुक्त कविताकविता

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
18 Dec 2019 - 8:07 am

कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा ।
श्री गणपती देवी पार्वती महादेव
वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा।
सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक
भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा ।
आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।

विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा।
राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।

गणेश पावलेदेशभक्तिप्रेरणात्मकभक्ति गीतमाझ्यासवेमार्गदर्शनमुक्त कविताविठ्ठलशिववंदनासमुहगीतशांतरसकविता

(कपाळ)मोक्ष!! :-)

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
15 Dec 2019 - 11:27 am

सर्व व्यर्थता उमजत असते
तरि चित्ताला थारा नसतो
संदेशाची तिच्या प्रतीक्षा
मी प्रतिचातक बनुनी करतो

हस्तसंच मज गमे उपांगच
क्षणिक दुरावा असह्य होतो
'अजुनी उत्तर का येईना?'
प्रश्न मनाला कच्चा खातो

सतरा कामांचा खोळंबा
भार्या घोष ठणाणा करते
तरी पालथी घागर माझी
आंतरजालावर गडगडते

शेवटची कधि 'दिसली' होती
किती त्यावरी प्रहर लोटले
मोजुन घटिका तिज गमनाच्या
पंचप्राण कंठाशी रुतले

अन्य पुरुष तर नसेल कोणी?
भिवविति लाखो शंका हृदया
'निळ्या खुणे'ला विलंब होता
चलबिचले मम अवघी काया

कविताप्रेमकाव्यविनोद

"गंमत केली" म्हणालास तू...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
14 Dec 2019 - 7:56 am

"गंमत केली" म्हणालास तू
"कळले मजला" मीही म्हटले.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे काय अन् खोटे कुठले.

लाईक होते असंख्य त्यावर
डीपी जेव्हा नवा ठेवला
पाठवले तू smile जेव्हा
इथे खुशीचे तरंग उठले.

नुसते smile, ठाक कोरडे
तरी पोचते ओल त्यातली.
एक इमोजी सांगून जातो
शब्दांना जे नसते जमले.

म्हणो कुणी हा सोशल मीडिया
नाही शाश्वत फक्त दिखावा.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे काय अन् खोटे कुठले.

काहीच्या काही कविताकविता

बटाट्याचे उपयोग

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Dec 2019 - 8:16 am

बाटाट्याचे उपयोग

स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||

माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||

"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||

कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||

कविता माझीगाणेमाझी कविताकविताभाजीमराठी पाककृतीरस्साशाकाहारीसुकी भाजीमौजमजा

माहेर, सासर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Dec 2019 - 4:53 am

माहेर, सासर

नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा
कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा

अल्याड गाव माझे त्यात मी राहिले
पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले

चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर
नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर

मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते
त्याचाकडची वाट नजरेला खुणावते

मनी लागली हुरहुर कसे असेल सासर
कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर

- पाषाणभेद
०८/१२/२०१९

प्रेम कविताभावकविताअद्भुतरसशांतरसकविताप्रेमकाव्य

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
7 Dec 2019 - 5:26 am

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)

न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर

थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर

कैच्याकैकवितागाणेप्रेम कविताहास्यकविताप्रेमकाव्यविनोदऔषधोपचारमौजमजा

कव्वाली: तुला पाहिले की

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
5 Dec 2019 - 7:45 pm

कव्वाली: तुला पाहिले की

किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे
काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे
दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते
पण तुला पाहिले की काळजात धकधक होते

किती तू वार केले माझ्या हृदयावर
खोल जखमा वरून केल्या त्यावर
नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला
तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला
त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक
पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक
नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये
तुला पाहिले की काळजात धकधक होते

गाणेप्रेम कविताभावकविताकविताप्रेमकाव्य

दुर्वास

निराकार गाढव's picture
निराकार गाढव in जे न देखे रवी...
3 Dec 2019 - 5:33 am

एक ओजस्वी संन्यासी
ज्यास विमुक्तीचा ध्यास ।
करि ध्यान रात्रंदिन
करि शास्त्रांचा अभ्यास ।।

रुक्ष ज्याची दिनचर्या
करि कडक उपास ।
ओढी अतोनात कष्ट
किती सेवेचे सायास ।।

ऐसे दिन कित्ती गेले
हिमालयाच्या कुशीत ।
तैसा राहून एकला
जाले महीने, वरिस ।।

पण एके दिनी येता
मातापित्यांचा आठव ।
परतला मूलग्रामी,
गृही, शोधुनिया ठाव ।।

जैसा परतला गृही,
दिसे गर्दी, कोलाहल ।
दिले झोकून संसारी
झाला कल्लोळ अपार ।।

कविता