वळण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
29 Mar 2020 - 10:41 am

गुलमोहरांच्या आपल्या त्या
कावळ्या चिमण्यांच्या
ओट्यावर.
काल तु म्हणालीस 'वाट बघ'

आता आपलं कसं म्हणून
पुस्तकांची पानं उचकत
आतल्या आत गोठून गेलो
एका पानावर,
मोगर्‍याच्या वेलीशी,
फांदी सोडून घेतेय
आपले हात.

दारातून दिसतेय मला,
आयुष्याचा हिशेब
बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी,
आणि हळद लावून बसलेली
भेदरलेली नवरी.

शहरापासून मरणा अगोदर
कोण पोहोचतो, म्हणुन.
भूके कंगालांचे तांडे
सरकताहेत हळू हळू
गावांकडे.

सगळीच तीर्थस्थाने,
महापुरुष आठवून
कोणीच येत नाही डोळ्यासमोर,
हडबडून, गडबडून,
घामाने चिंब होऊन.
टीटवीचा आवाजही देह
चिरुन जातो.

आपलं ठरलंय,
विना आणाभाकांचं.
तुला मी आणि
मला तू जपायचं.
तुझा जिव्हाळा, अबोला
धपापणारा श्वास,
अन एक खोल हुंदका.

सखे,
आत्ता तू जशी असशील
तशी ये.
मरणाची भिती दाटून गेलीय.

आज..
कुठले हे वळण,
दूर..दूर राहण्याचे......!

कवितासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Mar 2020 - 11:11 am | प्रचेतस

सखे,
आत्ता तू जशी असशील
तशी ये.
मरणाची भिती दाटून गेलीय.

आज..
कुठले हे वळण,
दूर..दूर राहण्याचे......!

अस्वस्थ करणारी कविता. तुम्ही पुन्हा एकदा ललित लेखन सुरू करावे.

प्राची अश्विनी's picture

29 Mar 2020 - 11:11 am | प्राची अश्विनी

वा!

गवि's picture

29 Mar 2020 - 11:14 am | गवि

वाह प्रा डॉ सर, वाह. __/\__

चांदणे संदीप's picture

29 Mar 2020 - 1:07 pm | चांदणे संदीप

वाह प्रा. डॉ. डीबी सर, क्या बात!
अजून लिहाच.

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

29 Mar 2020 - 1:55 pm | जव्हेरगंज

कडक!!

किसन शिंदे's picture

29 Mar 2020 - 4:14 pm | किसन शिंदे

अव्वल लिहीलंय.

विजुभाऊ's picture

30 Mar 2020 - 4:58 pm | विजुभाऊ

प्रा डॉ..… लै भारी लिहीताय.
एखादी कथा लिहा होऊन जाऊदेत

सस्नेह's picture

30 Mar 2020 - 9:46 pm | सस्नेह

जबरी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2020 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहानाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. असाच लोभ राहु द्या...!

-दिलीप बिरुटे

राघव's picture

31 Mar 2020 - 8:39 pm | राघव

चांगली रचना. भावनेला हात घालणारी. :-)

सर, कोरोनाच्या संकटकाळातील हे दृश्य कवितेत हुबेहूब चितारले आहे.

छान लिहिली आहे कविता.. मस्त

चौथा कोनाडा's picture

23 May 2020 - 5:01 pm | चौथा कोनाडा

व्वा, जबरदस्त !

शहरापासून मरणा अगोदर
कोण पोहोचतो, म्हणुन.
भूके कंगालांचे तांडे

अक्षरशः चित्र डोळ्यांपुढं उभं रहिलं आनि एकदम उदासवाणं वाटून गेलं !