माणसे कविता होऊन येतात.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Apr 2019 - 3:22 am

माणसे कविता होऊन येतात
एकएक हट्टी कडवे
लाडाकोडाने घालून ठेवतात,
दोन कडव्यांमध्ये
एक जीवघेणी कळ
विसावा म्हणून ठेवून जातात...

माणसे कविता होऊन येतात
अलंकार भिरकावून
केवळ अर्थ होऊन
रात्रभर उशाशी बसतात
उजाडताना परत
पुस्तकाच्या अंधारात
गुडूप होतात......

माणसे कविता होऊन येतात....

-शिवकन्या

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताकरुणमांडणीवावरवाङ्मयकवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Apr 2019 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार

साधी सोपी सरळ कविता आवडली
लिहित रहा,
पैजारबुवा,

यशोधरा's picture

26 Apr 2019 - 10:48 am | यशोधरा

सुरेख. शिरीष पै ह्यांची ' हृदय अर्पण करतात..' कविता आठवली. अगदी अशीच नसली तरी थोडीफार तशाच पद्धतीने भावना व्यक्त करणारी.

इरामयी's picture

12 May 2019 - 4:31 pm | इरामयी

हो, ना!

खूपच सुन्दर!

श्वेता२४'s picture

26 Apr 2019 - 11:19 am | श्वेता२४

आवडली

अश्या सुंदर कविता वाचून

माझे हात शिवशिवू लागतात

माफीनामा आधीच जाहीर करावासा वाटतो

आतली मळमळ जणू बाहेर काढून टाकतात

घडत असते , घडत आले आहे आणि घडत जाईल

पण ते मांडण्याची ताकद यावी लागते

प्रेरणादायी कविता, ती आपसूकच प्रदान करत असतात

गोंधळी's picture

26 Apr 2019 - 2:12 pm | गोंधळी

छान

सोन्या बागलाणकर's picture

27 Apr 2019 - 4:13 am | सोन्या बागलाणकर

छान कविता!

रातराणी's picture

1 May 2019 - 1:14 pm | रातराणी

सुरेख!

शिव कन्या's picture

3 May 2019 - 8:25 am | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.

मराठी कथालेखक's picture

6 May 2019 - 12:14 pm | मराठी कथालेखक

छान..
आणि विडंबनाकरिता क्षमस्व :)

अनन्त अवधुत's picture

9 May 2019 - 10:41 am | अनन्त अवधुत

कविता आवडली.

काही माणसं, खरंच, कविता बनून येतात
आणि निघून जातात
अचानक् !

मागं रेंगाळत रहातात आठवणी
धूंसर, पुसट शब्द
अस्पष्ट . . .

तुमची कविता खूप आवडली.