(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-)
बाकी शिवकन्या तुमचे आभार!!)
सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर...
किती बाहेर??
टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे ....
ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात
डाएटच्या नादात
भरली होती तिला डब्यात....
करत राहते ती विचार की पाळेल का तो डाएट आजतरी...
घेत राहते ती वास त्याने दिवसभर खाल्लेल्या अबरचबर पदार्थांचे....
सामोश्यांचे... आणि वेळी अवेळी प्यायलेल्या कॉफीचे...
कोशिंबीर डब्यातून बाहेर येऊ शकत नाही..
त्याला सांगू शकत नाही की अरे मी आहे इथेच... बघ जरा...
मग ती शांतपणे बघत राहते...
कचऱ्याच्या डब्याकडे... जिथे आता कधीही रवानगी होईल तिची...
आणि बघतच राहते....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5042
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
=))
:)
मी कोशिंबिर झालो तर - १२ गुण
हाहाहा .
मस्त ... :) एक नवीन विषय - बंद बाटलीच्या बुचामागची शॅम्पेन
भारी
फसलेल्या डाएटची मस्त कविता!
कोशिंबीर आवडली
भारीये की कोशिंबीर !
आभार!