माझ्या मनातला गणपती
माझ्या मनातला गणपती
मूर्ती असावी धातूची!
विसर्जित नाही करायची!!
विसर्जनाचे शास्त्र करून!
ठेवून द्यावी तिला जपून!!
दुर्वा फुले चार वाहून!
हात जोडा मनापासून!!
भारंभार फुलांनी झाकू नका!
निर्माल्य कचरा करू नका!!
थर्मॉकोलची नको आरास!
पर्यावरणाचा होतो ह्रास!!
घरच्या घेऊन वस्तू चार!
मखर छानसे करा तयार!!
नको विजेची प्रखर अती!
रोषणाई ती झगमगती!!
शोभा न्यारी ज्योतीची!
निरांजनाची समईची!!
गोड सुस्वर गा आरती!
आरडा ओरडा नको अती!!