शुभेच्छा २०२२
या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या पिसाऱ्याचा गुलाम होत नाही. हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल.