दोन शशक--मधुसापळा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
10 May 2023 - 1:43 pm

अहो लक्ष कुठेय तुमचे? मी म्हणतेय मुलाकडे सिऍटलला जाऊया. पण तुमचे आपले काम आणि काम .सारखे मोबाईलमध्ये डोके खुपसलेले. जणू सगळ्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावरच.

नाही जमणार ग.या महिन्यात दिल्लीला क्वाडची मीटिंग आहे. त्यानंतर युरोपला जायचे आहे. सध्या तर बोलूच नकोस सिऍटलचे.

आता हे युरोपचे कुठून काढलेत? तुम्ही तर याआधी कामासाठी कधीच गेला नाहीत युरोपात? आणि आजकाल तुम्ही फारसे बोलतही नाही घरामध्ये. एनी प्रॉब्लेम?

आता कसे सांगू हिला? सिमरन मागच्यावेळी बँकॉक मध्ये भेटलेली तेव्हा काय मजा केलेली आम्ही. फोनमधले फोटो पहिले की त्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. आताही ब्रसेल्सला बोलावतेय. तिकीट ,व्हिसा सगळे पाठवले आहे. स्वर्गसुख उपभोगायची अशी संधी पुन्हापुन्हा थोडीच मिळणार?
===========================================
सलाम वालेकुम सिमरन! तुम्हे दिया हुवा मिशन कहातक पहुंचा?

वालेकुम अस्सलाम! बंदर फस गया है जनाब. इस बार ब्रसेल्स बुलाया है उसे. बस तारीख बताओ. दौडा चला आयेगा.

बहुत खूब. लेकिन पिछली बार बँकॉकमे कुछ सामान लेके नहीं आया था. पैसे और टाइम की बरबादी हुई. इस बार पुरी जानकारी मिलनी चाहिये.

आप बिलकुल चिंता ना करे जनाब. मेरे जाल मे पुरा फसा है वो. और इस बार हमारी ऑफरभी बहुत बडी है. फिर भी नही मानेगा, तो बँकॉक ट्रिपकी उसकी बहुत सारी न्यूड फोटोज और व्हिडीओज मेरे पास है. ब्लॅकमेल करेंगे.

आप बस कमांडरसे बात करके मेरे पती और बेटेको हिफाजतसे रखना.

धोरणविचार

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

10 May 2023 - 5:58 pm | विवेकपटाईत

दोन्ही आवडले. हनी ट्रपचे उत्तम वर्णन. बाकी सुरक्षा संबंधित अधिकार्‍यांना अश्या निजी विदेश यात्रा करणे अशक्यच असते.

तुषार काळभोर's picture

11 May 2023 - 4:19 pm | तुषार काळभोर

सध्याचं प्रकरण नसतं, तर कदाचित या शब्दाचा अर्थ कथा वाचल्याशिवाय लागला नसता.

चौथा कोनाडा's picture

11 May 2023 - 5:58 pm | चौथा कोनाडा

खतरनाकच सापळा.
लै भारी ... आवडल्या दोन्ही शशकज !

(हेरगिरीवरून पुण्यात एका संशोधकाला ताब्यात घेतले आहे हे प्रकरण ताजे आहे, त्यामागे असाच सापळा असावा अशी शक्यता व्यक्त होतेय !)

अमुक स्टोरी, तमुक स्टोरी
सगळीकडे स्टोरीच स्टोरी !

कर्नलतपस्वी's picture

11 May 2023 - 7:54 pm | कर्नलतपस्वी

संपेल का कधी हा खेळ सापळ्यांचा.