रस्ते
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.