१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!



भूयस्तु शरमुद्धृत्य कुपितस्तत्र राघवः।
सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥
संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद्बली।
तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥
मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्।
शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥
दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख.
२० मे २०२४ - ध्यानाचा पाहिला दिवस
काल इतका दमलो होतो त्यामुळे गाढ झोप लागली. पण इथे अतिषय कडक नियम असल्याने सकाळी सात वाजता ध्यानाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यात मला यायला काल उशीर झाल्याने स्वामीजींनी ध्यानविषयक रीतसर मार्गदर्शन केलेले नव्हते. त्यांनी मला आधी त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावले होते. ह्या सगळ्या विचारात खडबडुन पहाटे पहाटे जाग आली. हवेत नितांत सुंदर गारवा होता. अजुन सुर्योदय झाला नव्हता पण पुर्वेला ताम्बंड फुटलं होतं . इतक्या पहाटे उठण्याचा योग कैक वर्षांनंतर आला होता.
प्रस्तावना :
१. सदर लेखन हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असुन इथे कोणताही अभिनिवेषयुक्त प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नाही.
लिहुन ठेवलेल्या गोष्टी जास्त चांगल्या स्मरणात राहतात हा आजवरचा अनुभव आहे. शिवाय "if you can't explain it simply, you don't understand it well enough." हे लहानपणी शिकल्याने किमान आपलं आपल्याला कळेल इतकं तरी सोप्प्या शब्दात वर्णन करुन सांगता येणे गरजेचे वाटते . म्हणुन हा लेखनप्रपंच .
ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला,
"अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की.
आई,लवकर उठलीस, चहा घेणार?
नको ,तुला उशीर होतोय.
बरं निघतो मी".
क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली.
" आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय.
काय झालं.
काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. अर्धा कप चहा देतीस का म्हणाल्या. चहा पिऊन झोपल्या त्या आजून उठल्या नाहीत.
जेवायची वेळ झाली आहे ,म्हणून उठवतेय.
( याच नावाचा आधीचा लेख अपूर्ण आहे तो कृपया वाचू नये . संपूर्ण लेख इथे पुन्हा टाकत आहे . तसदीबद्दल क्षमस्व )
निळा समुद्र, गरम वाळू, छोटे मासे, खारी हवा, समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता..
मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . .