भटकत होतो
भटकत होतो.
एक डोंगर दिसला. चढत गेलो.
हिरवी झाडं पाणी फुलं.
उन मरणाचं.
झळझळत गेलो.
भटकत होतो.
बोडकं माळरान. तुडवत गेलो.
कुसळं शेळ्या मेंढ्या कुत्री.
चप्पल तुटलं.
भळभळत गेलो.
आभाळाच्या कडेला लावून मी हात
बसलो या देवळात
मूर्तीच्या गाभाऱ्यात
ठोकळाच ठेवलेला
ही उदास छटा आता नको आहे
हे उनाड पाखरू आता नको आहे
ही गंजकी तलवार आता नको आहे
जगणं *** वगैरे नेहमीचंच