प्रेमकाव्य

"तू " अधिक " मी " किती ?

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
25 Jan 2019 - 3:25 pm

किती सोपा प्रश्न होता माझा

"तू " अधिक " मी " किती ?

तू उत्तर दिलेस "दोन"

अंतर्मुख होऊनि शोधू लागलो

आपण आहोत तरी कोण ?

मला अपेक्षीत “एक " होते

आपल्यात मुळी अंतरच नव्हते

दोन देण्यामागे कारण काय होते?

जर तू माझ्यात होतीस

मग मी तुझ्यात का नव्हतो ?

आणि मी तुझ्यात नव्हतो

तर मी कुठे होतो ?

गणित सोपे जरी वाटले दुरून

अवघड झाले उत्तरावरून

का दिलेस तू विचित्र उत्तर ?

कुढत गेलो पुढे निरंतर

जवळ घेतला मद्याचा प्याला

शोधत गेलो मला स्वतःला

इतिहासप्रेमकाव्यजीवनमानडावी बाजू

तुझी कविता

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
18 Jan 2019 - 7:55 am

तुझ्यापाशी जन्मलेली माझी
हट्टी, खोडकर, अल्लड
कविता
तू डोळ्यांत सांभाळून
घेऊन ये....

येता येता वाट चुकली
तर मला जागं कर...पण
मी माझ्याच तंद्रीत असेन
तर
माझ्या कवितेला वाट विचार....

अदभूतकविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितामुक्त कवितामांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

नाना करा व्हाटस ॲप गृप

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Dec 2018 - 10:58 pm

तुमच्या माझ्या दिलाचा करा व्हाटस ॲप गृप
मुक्यामुक्याने करु आपन दोघे चॅटींग ||

नाना हिचं लवकर ऐका अन गृपचं घ्या मनावर
पोर पार सुटली, था-यावर नाही हिचं मन ||को||

गुड मार्निंग करा सकाळी, उठल्यावरून
माझी आटवन काढा, विडीओ कॉल करुन
नका लावू...अहो नका लावू साधा कॉल,
खर्च करा डेटा, टाका सारा रिचार्ज संपवून ||

मी झाली मेंबर त्याचं अन तुमी आडमिन
दोघचं गृपमधी राहू नको तिसरं कोन
शेल्फी बघा तुमी अन तुमीच बघा स्टेट्स
प्रायव्हेट मेसेज टाका मीच ते वाचन ||

- पाभे

लावणीकविताप्रेमकाव्य

कारण तू

सिक्रेटसुपरस्टार's picture
सिक्रेटसुपरस्टार in जे न देखे रवी...
31 Oct 2018 - 9:43 am

हल्ली मी कुठेच जात नाही.
कारण काय विचारतेस?
कारण तूच.

सवय लागलीये मनाला,
नको तिथे तुझे संदर्भ शोधायची..
तुझ्या पाऊलखुणा,
पुन्हा पुन्हा शोधायची.
एक दिवस उबग आला तुझा,
तुझ्या आठवणींचा,
मग ठरवलं आता जायचंच नाही कुठे..

प्रेमकाव्य

हि सर पावसाची पुन्हा आज आली.

AjayRGodse's picture
AjayRGodse in जे न देखे रवी...
19 Oct 2018 - 12:53 pm

हि सर पावसाची पुन्हा आज आली

हि सर पावसाची पुन्हा आज आली
पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली
मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते,
क्षितिजावरी का तुला ते पहाते ?
पुन्हा पावसाशी तुझी बात झाली.

हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची.

हि सर पावसाची पुन्हा आज आली
तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली
मन बेभान होते, तुझे गीत गाते.
का मिलनाची तुला साद देते ?
तुला भेटण्याची का मना आस झाली ?

हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची.

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
2 Sep 2018 - 11:20 am

वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं!
पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं!

स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं
स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं!

माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं
कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं!

तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...
अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं!

वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार!
नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं!

- कुमार जावडेकर

gajhalकविताप्रेमकाव्यगझल

निघताना....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
23 Aug 2018 - 5:02 pm

मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....

आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण

मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे

सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल

कविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितासांत्वनाहट्टकरुणमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजप्रवास

भाळी लाल कुंकु

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Aug 2018 - 12:37 pm

भाळी लाल कुंकु
गळ्यात काळे मणी
अस्तित्व तुझे जाणवे
साजणे क्षणोक्षणी
*
अंगणी रोज शेणसडा
रेखते नाजुक रांगोळी
जोडव्याचा तो पदान्यास
भासे तू नाजुक कळी
*
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळते माझे जीवन
अकुकाका

प्रेमकाव्य

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
1 Aug 2018 - 10:28 am

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!

- संदीप चांदणे

eggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरसकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजा