आजही स्वप्नात मी त्या बावऱ्या परीच्या
आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।।
आजही वेड्या मनाला याद येते तिची
आजही ओल्या सरीतून साद येते तिची
आजही हृदयात मी त्या लाजऱ्या कळीच्या
आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।।
आजही ते थेंब ओले झेलण्या आतुर मी
आजही ते क्षण गुलाबी छेडण्या आतुर मी
आजही प्रेमात मी त्या गोजिऱ्या परीच्या
आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।।
महेश नायकुडे