चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)
म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला?
डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||
उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी|
काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक||
अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक |
जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही ||
नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा |
आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त ||
तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल |
केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता ||
तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल?
फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना||