माझे युट्युबर्स वरील पाककृतींचे विडिओ!!
बर्याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, इथे आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.
गणपतीत तिच्या खुपच मागे लागले की, तु तुझ्या पाककृती टाक म्हणून. कारणही तसेच होते.
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. तिचा पुर्ण नकार होता.