.

अमूर फाल्कन उर्फ ससाणा - दिल आणि गर्दी खेचक पक्षी

Primary tabs

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in मिपा कलादालन
6 Jan 2021 - 10:24 pm

Amur F

Amur M

Lesser K

Indian Roller

नोव्हेंबर म्हटले कि आमच्या सारखे पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर्स स्थलांतरित पक्ष्यांची वाट बघायला लागतात. अशातच नोव्हेंबर मध्ये बातमी आली कि अमूर फाल्कन दिसायला लागलाय. ९ महिने झाले मी फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षणाला गेलो नव्हतो एक प्रकारचं नैराश्यदायक वातावरण होतं .
मग काय खडाक्टिंग केले आणि शोधात निघालो. पण आम्हाला त्या दिवशी दिसला नाही. तसा मी ८ एक वर्षांपूर्वी ह्याच ठिकाणी पाहिला होता पण तेंव्हा कॅमेरा नव्हता आणि नंतर एकदा दुसरी कडे पाहिला होता तेंव्हा कॅमेरा होता पण पक्षी तारेवर बसला होता. मग हे न विसरणारं वर्ष संपता संपता परत कळाले कि अमूर दिसायला लागले आहे. आता मात्र पूर्ण तयारीनिशी निघालो आणि दुपारी ३ च्या सुमारास पोहोचलो...आणि जेंव्हा अमूर ला पाहिलं तेंव्हा अक्षरशः धन्य झालो. ह्या पक्षाला आजूबाजूचं काहीच भान नव्हतं, इतके लोकं त्याला बघत होते, फोटो काढत होते आणि त्याचे आपलं खाण्याचं काम चालू होतं . तो दिवस संपला पण मन नाही भरलं . २ दिवसांनी परत त्याला आणि इतर पक्षी बघायला गेलो. एकतर हॅबिटॅट इतके सुंदर झाले आहे..सगळी कडे जांभळी मंजिरी ची फुलं आहेत , हिरवाई आहे..ह्या वेळेस आम्ही सकाळी ७.३० ला पोहोचलो. हळू हळू लोकांची गर्दी व्हायला लागली. गेल्या गेल्या आम्हाला फिमेल पक्षी दिसला मस्त पैकी अळ्यांवर, किड्यांवर ताव मारणे चालू होते. मग आम्ही अजून पुढे गेलो , मेल पक्षी नेहेमीच्या क्षेत्रात नव्हता . आम्ही अजून पुढे गेलो आणि तिकडे तो मस्त पैकी आरामात बसलेला दिसला . आम्ही शांतपणे गाडीतून उतरून झोपत झोपत थोडे पुढे जाऊन फोटो काढले आणि पुढे गेलो. एका ठिकाणी उभं राहून न्याहारी उरकली आणि परत इतर पक्षाच्या शोधात निघालो. दूरवर कापशी घार मस्त पैकी भक्ष्याच्या शोधात आकाशात हॉवर करत होती. थोडे फोटो आणि विडिओ काढून पुढे गेलो तर अजून एक सुंदर असा लेसर केस्ट्रेल नावाचा पक्षी (मेल) उन्ह खात बसलेला दिसला. शांतपणे अँप्रोच केले आणि फोटो काढले. तेवढ्यात इतर गाड्या आल्या आणि तो उडून गेला. पुढचे २-३ तास हा हवेतच उडत होता. फिरत असतांना थोड्यावेळाने परत हा पक्षी दिसला आणि ह्यावेळेस फोटो काढत असतांना लक्षात आले कि तो साप खातो आहे. हा पक्षी साप खातो पण असं दिसणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. अक्षरशः १ मिनिट मध्ये त्याने साप पकडला आणि ५ मिनिट्स मध्ये संपवला.
आम्ही परत अमूर च्या इकडे आलो. तेंव्हा फिमेल अमूर पक्षी मस्त पैकी जांभळ्या मंजिरीच्या फुलांमध्ये बसलेली होती. इतकी सुंदर फ्रेम होती कि बस्स. तशाच वातावरणात लांब आम्हाला इतर काही पक्षी पण दिसले जसे कि आयबीस, बगळे , खंड्या , लार्क , नीलकंठ , ब्राह्मणी घार वगैरे. संध्याकाळ व्हायला आली तसे आम्ही आता एका पक्षाची वाट बघत उभे राहिलो. हा पण युरोपातून येणारा पक्षी आहे sparrohawk "चिमणबाज" . तो आला आणि अक्षरशः ५ मिनिट्स मध्ये परत उडून गेला..
आता तुम्ही म्हणाल अमूर ससाण्याची एवढी काय क्रेझ तर ऐका . हा पक्षी साधारण पणे २२, ००० किमी अंतर पार करतो स्थलांतराच्या काळात . म्हणजे रशियात असलेल्या अमूर नदीच्या खोऱ्यातून निघून, मंगोलिया , चीन मार्गे नागालँड इथे भारतात येतो. नागालँड च्या इथे हजारोंच्या संख्येने येतात. साधारण २०१२ पर्यंत त्यांची खूप शिकार व्हायची खूप म्हणजे दिवसाला ३ ते ५००० वगैरे. मग अचानक सगळी सूत्र फिरवली गेली आणि नागालँड मधल्या लोकांना शिक्षण दिले गेले आणि त्यांना शिकारी पासून परावृत्त केले गेले. सध्या तिकडे एक पण शिकार होत नाही .
तर पुढे हा पक्षी हळू हळू भारतात पुढे पुढे येत राहतो. पुण्यात दर वर्षी येतो बऱ्याच ठिकाणी दिसतो. आणि मग २-३ आठवड्यांनी केरळ कडे जातो. तिथे परत काही दिवस मुक्काम करतो आणि मग निघतो विना थांबा प्रवासाला . पूर्ण अरबी समुद्र पार करतो (४००० किमी) आणि आफ्रिकेमध्ये स्थिरावतो . तिकडे ३-४ महिने राहून परत रिटर्न जातो. जातांना तो अफगाणिस्तान वगैरे मार्गाने अमूर च्या नदीच्या खोऱ्यात येतो. आहे कि नाही जोरदार पक्षी :).
lockdown नंतरचं एकूणच निराशाजनक वातावरण जाऊन एकदम पॉसिटीव्ह वातावरण निर्माण झाले हे नक्की
~ योगेश पुराणिक, जाने २०२१

प्रतिक्रिया

नुसता भटकायला काय जातयं यांच ?

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 2:43 pm | MipaPremiYogesh

हा हा ते बरोबर आहे . त्यांना तसले बंधन नाही

गोरगावलेकर's picture

7 Jan 2021 - 12:58 pm | गोरगावलेकर

अमूर ससाण्याबद्दलची माहिती आवडली

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 2:42 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jan 2021 - 1:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

ऐश करतात हे पक्षीलोक्स...

इकडे फोटो देता आले तर बघा,
चेहरापुस्तकावरचे पण सगळे फोटो दिसले नाहीत.
पैजारबुवा,

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 2:42 pm | MipaPremiYogesh

फोटो टाकले इकडे

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 2:41 pm | MipaPremiYogesh

Amur F

Amur F

Lesser Kestrel M

Roller

सौंदाळा's picture

7 Jan 2021 - 4:12 pm | सौंदाळा

जबराट
असे सुंदर फोटो मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
गेला आणि फोटो मिळाला असं कधी झालंय का?

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 8:32 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद. ह्या फोटो साठी मी पूर्ण दिवस होतो , नशिबाचा भाग बऱ्याच वेळेला असतो पण थोडा अभ्यास पण महत्वाचा आहे. कधी कधी पूर्ण सेशन (२-३ तास) अक्षरशः वाया जातात. एक पण फोटो मिळत नाही :)

खूप सुंदर आहेत फोटो. तिसऱ्या फोटोतील पक्षी मी मागच्या वर्षी जानेवारीत आमच्या किचनच्या खिडकीसमोरील जांभळाच्या झाडावर बसलेला पहिला होता, पण त्याचे नाव आत्ता हा लेख वाचल्यावर समजले 👍 फार देखणा आणि बिनधास्त पक्षी आहे हा!

प्रचेतस's picture

7 Jan 2021 - 4:17 pm | प्रचेतस

लै जबरदस्त फोटू आहेत.

सुबोध खरे's picture

7 Jan 2021 - 7:11 pm | सुबोध खरे

लै जबरदस्त फोटू आहेत.

बा डी स

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 8:33 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद वल्लीजी , सुबोधजी

कंजूस's picture

7 Jan 2021 - 6:24 pm | कंजूस

पण तुम्हाला कुठे दिसला?

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 8:34 pm | MipaPremiYogesh

लोणावळ्याला

कंजूस's picture

7 Jan 2021 - 6:58 pm | कंजूस

काळविंट बहुतेक दौंड श्रीगोंदा कोपरगाव मनमाड जाताना रेल्वेतून पाहिली आहेत.

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 8:34 pm | MipaPremiYogesh

काळविंट नाशिक औरंगाबाद रस्त्यावर

कंजूस's picture

7 Jan 2021 - 7:30 pm | कंजूस

हे छायाचित्रही आवडले. टैंमिंग!

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 8:35 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद. एक दुरुस्ती . त्या खारुताई आहेत

पॉइंट ब्लँक's picture

11 Jan 2021 - 7:09 pm | पॉइंट ब्लँक

जबरदस्त फोटो आहेत! उडणारा रोलर खासच आलाय :)

MipaPremiYogesh's picture

12 Jan 2021 - 4:39 pm | MipaPremiYogesh

फोटो आवडल्याची पोच पावती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

रंगीला रतन's picture

11 Jan 2021 - 10:06 pm | रंगीला रतन

एक नंबर आहेत फोटो.

MipaPremiYogesh's picture

12 Jan 2021 - 4:39 pm | MipaPremiYogesh

फोटो आवडल्याची पोच पावती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

12 Jan 2021 - 11:30 am | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर फोटो !

MipaPremiYogesh's picture

12 Jan 2021 - 4:39 pm | MipaPremiYogesh

फोटो आवडल्याची पोच पावती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

सौंदाळा's picture

12 Jan 2021 - 5:10 pm | सौंदाळा

आजच मटा मध्ये आलेली बातमी
अमुर फलकनच्या फोटोग्राफीवर बंदी
अमुर फलकन

MipaPremiYogesh's picture

14 Jan 2021 - 3:57 pm | MipaPremiYogesh

हो बरोबर आहे. बंदी आणली आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Jan 2021 - 5:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

तेव्हाच अंदाज आलेला कारवाई होणार! बाकि ते नाहिसे झाल्यावर बोर्ड लावला गेलाय ....