आज काय घडले .... मार्गशीर्ष व. ३० कौरवेश्वर दुर्योधन याचे निधन !
शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले.
शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले.
तिळाचे लाडू
सौ सरिता सुभाष बांदेकर
आलो परतुनी आणखी
जाहलो जुना जरी
अजून माझा जीव तरंगे
पाचूच्या पाण्यावरी
गारवा असा त्याचा की
भिडतो आत्म्यास थेट
वितळते जग अवघे
मीच एक तरंगते बेट
तिरप्या कोनातूनी येई
सुवर्ण प्रकाश शलाका
स्पर्षता पाण्यास गारठे
कवडसे जणू मूक हाका
बाजूस एका आत्ममग्न
संतत स्फटीकधार सांडते
घुमते गव्हारात उन्हाच्या
संगीत हाकांस लाभते
का अजून मी अडकलो
तिथेच मनाने ना कळे
बहुदा आठवती शांत ते
तुझे जलाशयासम डोळे
-अनुप
आज काय घडले...
"तिमिरातुनी तेजाकडे"
आपल्या देशात अश्या काही संकल्पना आहेत, ज्या चुकिच्या आहेत, हे माहित असुनही आपन त्या बदलू शकत नाही. यापैकिच एक आज मांडन्याचा प्रयत्न केला आहे.
सरपण
काही शब्द असतात मुके
उभे उन्हात जणु पोरके मुले
भूतकाळात ना भविष्यात डोकावत
सहज वर्तमानाच्या क्षणांत घुटमळत
वाटते समोरच्या मनी कराव घर
रेंगाळावे उशीशी कोणाच्या रात्रभर
पण होतात ह्रदयी कप्प्यात बंद बंद
हसतात डायरीच्या पानांतून मंद मंद
-भक्ती
११/०१/२०१७
आज काय घडले...
मार्गशीर्ष व. १३
धनुवीर कर्ण याचा वध !
शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजी पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला.
जेव्हा माझी गोष्ट ....
तुझ्या तोंडून सुरु होते होते ना ,
ती मी भान हरपुन ऐकते
तु म्हणतोस " स्विटु ..तुझा DP मी जेव्हाही zoom करुन बघतो तेव्हा तेव्हा जाणवतं तुझं वेगळेपण ....
भव्य कपाळ , त्यावर शोभणारी चंद्रकोर ...
डोळे ...बोलके नि काळेभोर...
नाकावरचा तीळ तर रेअर खुप रेअर ...
गुलाबी गुलाबी ओठ , हसलीस की त्यातुन एक साइडचा दात हळुच डोकावतो बाहेर ..."
मी हाताच्या तळव्यांनी चेहरा झाकुन , लाजुन चुर
शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ११ या दिवशी भारतीय युद्धांत कौरवांकडील प्रसिद्ध सेनापति द्रोणाचार्य यांचा वध झाला.