शनिपीठ दर्शन

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 10:22 am

आपल्या महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तशीच भारतात शनि देवाची पण साडेसात शक्तीपीठं आहेत.
त्यातील साडेतीन शक्तीपीठं स्वतः प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेली आहेत.
एक मध्यप्रदेशातलं उज्जैन सोडलं तर बाकी अडीच नाशिक व बीड जिल्ह्यात. आम्ही तीघी मैत्रिणींनी हि अडीच पीठं तरी जाऊन येऊ असं ठरवलं.
तसंही लाॅकडाऊन पासून म्हणजे मार्च 2020 नंतर भटकंती बंदच होती. आताशा सगळं नाॅर्मल होतय हळुहळू तर आपण योग्य काळजी घेऊन जाऊन येऊ असं म्हणून निघालो.

लेख

सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
18 Jan 2021 - 9:59 am

सर्जेकोट किल्ला , सर्जेकोट बंदर , शिंपला बेट

तीन दिवसाच्या स्वर्गीय कोकणच्या रोडट्रीप मध्ये आज जातोय तिसऱ्या दिवसाच्या प्रवासावर, आज आम्ही जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेल्या सर्जेकोट या गावात. मालवण पासून ९ किलोमीटर असलेलं हे गाव. तळाशील नदी आणि अरबी समुद्राच्यावर संगमावर असलेलं हे गाव . इथे १६६८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सर्जेकोट किल्ला आहे तसेच सर्जेकोट बंदर , शिंपला बेट , कवडा बेट अशी ठिकाणे पाहायला मिळतात.

प्रवास भाग 3

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 5:54 am

भाग 2

https://www.misalpav.com/node/48089

प्रवास 

भाग 3

सगळे अंगणात गाद्या टाकून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत पडले होते. आजूबाजूची किर्रर्र झाडी; गुड्डूप्प अंधार आणि चांदण्यांनी भरगच्च आकाश! एक वेगळंच गूढ वातावरण तयार झालं होतं. सहाजिकच गप्पांचा ओघ भुतं या विषयावर घसरला. कोणी सुरवात केली ते लक्षात आलं नाही पण अनघा आणि मनाली बाहेर आल्या तर मंदार त्याच्या कोणा काकांचा अनुभव सांगत होता.

मंदार : अरे काका घरीच निघाले होते...

मनाली : नक्की कशाबद्दल बोलतो आहेस रे?

कथा

मराठी रेडिओ

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 12:50 am

माझी बायडी दररोज मराठी रेडिओ ऐकत असते. तिने नुकतेच एक पेज बनवले आहे ज्यावर महाराष्ट्रातील सर्व रेडिओ स्टेशन्सच्या लिंक्स आहेत. याचा उपयोग करून अगदी आरामात कुठेही रेडिओ ऐकता येतो. बाकी माहिती खाली तिच्याच शब्दांत वाचा:

संगीतचित्रपटमाहिती

वाटेकरी

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
17 Jan 2021 - 7:59 pm

वाटेकरी
------------------------------------------------------------------------------------------------
रात्रीची वेळ . अंधार . एक मोठा रस्ता .त्या रस्त्याला रात्रीच्या वेळी कोणी नसायचंच. त्यात पाऊस. शहराचा तो भाग रिकामा होता . तिथे ना दुकानं होती ना घरं . कारण तो कॅंटोन्मेंट हद्दीचा भाग होता . दिवसा मन प्रसन्न करणारी तिथली झाडं आत्ता मात्र भुतांची आश्रयस्थानं वाटत होती . मधूनच एखादी सर्र्कन पाणी उडवत जाणारी गाडी . त्या गाड्यांनाही कसली घाई ! एखादा मरून पडला तरी कोण बघतंय आणि कोण थांबतंय .

हे ठिकाण

आज काय घडले ... पौष शु. ४ प्रभू रामचंद्र-बिभीषण-भेट !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
17 Jan 2021 - 12:47 pm

ram bibhishan bhet
पौष शु. ४ या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ विभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली.

इतिहासप्रकटन

साखळीचा किल्ला (Sanquelim Fort), नानुस किल्ला / Nanuz Fort /Nanus Fort

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
17 Jan 2021 - 11:39 am

छ्त्रपती संभाजी महाराजांच्या गोवा स्वारीत अगदी सुरवातीलाच उल्लेख येतो, तो या साखळी किल्ल्याचा. वास्तविक संभाजी राजांची गोवा मोहीम होति, या गोमांतक भुमीतून फिरंग्याचे उच्चाटन करण्यासाठी, पण या मोहीमेला विरोध दाखविला तो आमच्याच लोकांनी, गोव्यातील देसायांनी, नाईलाजाने राजांना त्यांच्यावरही कारवाई करावी लागली. यामध्ये साखळीच्या रुद्राजी राणे आणि येसोबा यांनी आपली कुटूंबे पोर्तुगीज सरकारच्या आश्रयाला पाठवून संभाजी राजांविरुध्द बंड केले. साखळीचा किल्ला सावंतवाडीच्या खेम सावंतांनी बांधला असे इतिहासकार सांगतात. वाळवंटी नदीतून चालणार्‍या जलवहातुकीवर नजर ठेवण्यासाठी याची उभारणी केली असावी.

Injury ते SR

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
16 Jan 2021 - 9:49 pm

सदर लेख हा माझा लाईफ पार्टनर श्रीनिवास याने लिहिला आहे. मी फक्त शब्दांकन करण्यास हातभार लावला.

मुक्तकअनुभव

लागा चुनरी मे दाग..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
16 Jan 2021 - 9:31 pm

लागा चुनरी में दाग..

अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद रफी, लतादीदी, आशाताई, मेहंदी हसन, गुलाम अली ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्यात. त्या वयात ह्या प्रभुतींचं गाणं ऐकल्यामुळे 'चांगलं' काय असतं ह्याची उमज येऊ लागली.

कॅसेट्च्या त्याच संचात रुपकुमार राठोड ह्यांच्या गझल प्रोग्रॅमची एक कॅसेट होती. ती कॅसेट बाबा वारंवार लावायचे.

वो रस्मे तोड के घर मेरे आने वाले है... मैं डर रहा हू के जालीम जमाने वाले है..!

दुल्हनिया की डोली कहारो ने लुटी..

ये सिला मिला है मुझको तेरी दोस्ती के पिछे...के हजार गम लगे है मेरे जिंदगी के पिछे !

गझललेख

बेरी के बेर

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
16 Jan 2021 - 6:05 pm

संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी किक्रांत असते.बच्चे कंपनीचा मुरमुरे,बोर,रेवड्या,चॉकलेट लयलुटीसाठी बोरनहाणसाठीचा दिवस असतो.
आगगाडीच्या डब्यात बसल्यासारख एक घर झाल कि दुसर घर अस करत करत ५-६ घरी ह्या सोहळ्याची मौज होते.परीच्या घरी कन्येला घेऊन बोरनहाणसाठी गेले .परीभोवती सगळे बाल गोपाल गोलाकार जमले.काही नवखे तर काही तरबेज होते,एकमेकांना सांगत होते .. “हा असा पटकन पुढे हात करायचा आणि चॉकलेट पकडायचे...हे झाले कि दुसऱ्या घरी...पिशवी आणली का तू?..”

मुक्तकविरंगुळा